आदिपुरुष तर निम्मित, पण बॉलिवूडचं VFX एवढं का गंडतंय ?

युगो साको आणि राम मोहन. याआधी तुम्ही ही नाव कदाचित ऐकली असतील किंवा नसतीलही. युगो साको हे जपानचे आणि राम मोहन आपल्या मुंबईचे. १९९३ मध्ये या दोघांनी आणि त्यांच्या टीमनं मिळून एक पिक्चर काढला, रामायण: द लेजंड ऑफ प्रिन्स राम. आता जवळपास ३० वर्ष होत आली, तरी यातलं ऍनिमेशन, स्क्रिप्ट कितीही वेळा बघितलं तरी कंटाळवाणं वाटत नाही. आत्ता या १९९३ मधल्या सिनेमाची आठवण येण्याचं कारण सोप्पय. आदिपुरुषचा टिझर आणि त्याच्यावरून सुरू असलेला राडा. 

रावणाकडं पुष्पक विमान होतं हे आपण वाचत आलोय, पण याच्यात रावण वटवाघुळावर बसून येतोय, श्रीरामांकडे वानरसेना होती, पण याच्यात तर गोरीला दिसतायत, बरं सगळं सोडा रावण स्पाईक्सवाला हेअरकट कसा काय करेल ? असे प्रश्न लोकांना पडले आणि यामुळं आदिपुरुषच्या VFX ला खच्चून शिव्या बसल्या. 

काही दिवसांपूर्वी VFX वरुन ब्रम्हास्त्रची मापं निघत होती आता आदिपुरुषचा नंबर लागलाय. पण कसंय मापं काढायच्या आधी बॉलिवूडचं VFX नेमकं गंडतं तरी कशामुळे हे माहीत पाहिजे. तेच या व्हिडीओमधून जाणून घ्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.