कुलभूषण जाधव केसवेळी पाकिस्तानच्या वकिलाने डोक्यावर पांढरा विग का घातलेला?

पिक्चरमध्ये आपण अनेकदा बघतो न्यायालयात खटला चालू असतो अत्यंत गंभीर वातावरण असते. आरोपी वरती आरोप लावले जातात साक्ष दिले जाते हे सर्व अत्यंत गांभीर्याने चालेले असते. या सर्वातून एक गोष्ट आपल्या नजरेतून चुकत नाही आणि ती म्हणजे सारखं ऑर्डर ऑर्डर किंचाळनाऱ्या जज साबच्या डोक्यावरचा पांढर्या केसांचा विग.

आपल्याला अनेकदा वाटते हे का म्हणून घालत असतील? दिसायला ही ते अत्यंत मजेशीर  दिसते. परवा आमच्या एका भिडूला म्हणजेच रोहन बोत्रेला नेमका हाच प्रश्न पडला. परवा कुलभूषण जाधव यांच्या खटल्यादरम्यान पाकिस्तानी वकील विग घातलेला दिसला त्यावरून त्याने आम्हाला प्रश्न टाकला.

सवयी प्रमाणे आम्ही शोध घेतला आणि हाती लागले ते हे.

त्याच झालं असं सोळाव्या शतकात फ्रांस मध्ये राजा लुई तेरावा याचे राज्य होते. राजा म्हणजे काय साधी सोपी गोष्ट आहे काय ? त्यात फ्रान्सचा राजा म्हणजे मोठी गोष्ट.  लुई तेरावा दिसायला स्मार्ट होता त्याला ही नटायला आवडायचे.त्याकाळी पुरुष ही लांब केस ठेवत, सरंजामदारी व्यवस्थेत सधन असल्याचे ते एक प्रतीक होते. लुईला सुद्धा त्याचे केस अत्यंत प्रिय होते पण तो त्याचे प्रेम जास्ती दिवस दाखवू शकला नाही. त्याचे कारण की वयाच्या विशीतच त्याचे केस गळू लागले अल्पावधीतच त्याला टक्कल पडले. (तुम्हाला म्हणून सांगतो, राजाने शंभर लफडी केलेली त्यातन रोग होऊन त्याला टक्कल पडलेलं )

राजाचं टक्कल पडल्याने त्याची अडचण झाली. राजाला लोकांपासून दूर राहता येत नसते त्यामुळे लुई व्यतिथ झाला. त्याने  पंचेचाळीस विग बनवणार्या कामगारांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून अनेक रुबाबदार विग त्याने बनवून घेतले व त्याचं उघड पडलेल साम्राज्य झाकून घेतले.

आज फ्रान्सची फॅशन इंडस्ट्री जगभराचा ट्रेंड सेट करते, त्याप्रमाणे त्याकाळीही होतं. तेराव्या लुईच्या विगची फॅॅशन जगभर फेमस झाली.

त्यानंतर सतराव्या शतकातच इंग्रज आणि फ्रेंच समाजातील उच्चकुलीन लोक विग घालू लागले. ते हळू हळू एक प्रतिष्ठेच प्रतिक बनू लागलं. समाजात मान सन्मान असणारे लोक नेहमीच विग मध्ये वावरू लागले. हा विग बनवणार्याचा  धंदा चांगलाच चालू लागला.मग त्यांनी पण लगेच निरनिराळ्या पद्धतीचे विग बनवण्यास सुरवात केली.

कामगाराचा विग साधा, राजकारण्याचा रुबाबदार , जज चा मोठा आणि आकर्षक असे नाना प्रकारचे विग त्याकाळी दुकानात विकले जाऊ लागले.

जज आणि वकिलांनी १६८० चा दरम्यान विग घालण्यास सुरवात केली. पुढे दीडशे वर्ष हे असेच चालू राहिले. विग ला हे लोक पांढरी पावडर लावत असत. त्यामुळे प्रामुख्याने ते पांढरे किवा राखाडी दिसत.

त्याकाळी विग घोडा,मेंढी आणि याक यांच्या केसांपासून बनवण्यात येई. नंतर मात्र महागडे विग माणसांच्या केसांपासून ही बनवण्यात येऊ लागले. हे विघ प्रचंड लोकप्रिय झाले कारण ते अत्यंत मुलायम असत आणि नैसर्गिक वाटत. ही फाशन हळू हळू अमेरिकेत पण पसरली. समाजात आपण प्रठीस्थित आहोत हे दाखवण्यासाठी अमेरिकन लोक ही विघ घालू लागले. काहींनी तर त्यांच्या गुलामांसाठी ही विशिष्ट प्रकारचे विग बनवून घेतले.

१८२२ मध्ये ह्म्प्रे रेव्हनक्राफ्ट या माणसाने पांढर्या केसांपासून विग बनवला. हा विग पूर्ण पांढरा असल्याने त्याला जास्ती पावडर वगेरे लावयाची गरज पडत नव्हती. हाच विग नंतर न्यायालयात सर्वत्र वापरला जाऊ लागला.  

अमेरिकेचे जे काही सात संस्थापक होते ते सर्व शिक्षित उच्च वर्गातले होते. त्यांचे फोटो पहिले तर तुमच्या लक्षात येईल की विग घालण्याला ते किती महत्व देत. सात पैकी पाच जण नियमित विग घालत. पुढे औद्योगिक क्रांती नंतर हे प्रमाण अत्यंत कमी झाले. हळू हळू तर बंदच झाले आणि लोक परत त्यांच्या नैसर्गिक केसांवर प्रेम करू लागले. पण ब्रिटीश न्यायव्यवस्थेने मात्र हा विग काही उतरवला नाही. जज किंवा बॅरिस्टर यांना कोर्टात ओळखता यावे हे त्या मागचे एक कारण होते. जज लांब विग घालत तर वकील लहान विग घालत.

न्याय व्यवस्था किती महत्वाची आहे हे अधोरेखित करण्यासाठी हे विग तसेच ठेवण्यात आले.  इंग्रजांनी अनेक देशांवर राज्य केले त्या कार्यकाळात इंग्रज जज आणि बॅरिस्टर तिथे न्याय देत. त्या देशांमध्ये ही त्यांनी ही विग घालायची पद्धत चालू ठेवली.

२००७ साली इंग्लंड च्या मुख्य न्यायाधीश बेरोन फिलीफ यांनी कोर्टातील हा पेहराव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याचा प्रचंड विरोध झाला. त्यानंतर काही बदल करण्यात आले. प्रत्येक कोर्टाच्या चढत्या क्रमाने तेथील परिधाने निश्चित  केली गेली. वकिलांनी गळ्याभोवती पांढर्या रंगाचा बँन्ड घालण्यास सुरवात केली आज वकिलांच चिन्ह याच बँन्डनी बनवलेला असतं. जुना काळा गाऊन जाऊन त्या ठिकाणी काळा कोट आणि काळी पँट आले.

भारत, पाकिस्तान हे सुद्धा एकेकाळी ब्रिटीशांच्या गुलामगिरीत अडकलेले. आपणसुद्धा त्यांच्या अनेक परंपरा आहे तशा डोळे झाकून स्वीकारल्या. पण नंतर नंतर थोडा प्रॅक्टिकल विचार करून या गुलामगिरीच्या निशानीतून बाहेर पडत चाललोय. भारतात सत्तरच्या दशकापासून जज लोकांच्या डोक्याला ताप देणाऱ्या विगला काढून टाकण्यात आले.

पण पाकिस्तानमध्ये बरीच वर्षे ही प्रथा चालू होती. आता तिथले जज विग घालत नाहीत पण जे बॅरिस्टर्स असतात ते अजूनही अभिमानाने विग घालतात.

या मागे कारण म्हणजे तिथे शिक्षण जास्त नसल्यामुळे डॉक्टर इंजिनियरचं प्रमाण जास्त नसते, त्यांच्या दृष्टीने कोर्टात वकील म्हणजे लई शिकलेला. त्यात बॅरिस्टर म्हणजे तर अभिमानाची गोष्ट. (मोहम्मद अली जीना बॅरिस्टर होते) आता आपल्या इथे पद्धत आहे न की काहीजण एफबी प्रोफाईलवर नावापुढे प्रोफेशन लावतात तसच पाकिस्तानी कोर्टात आपण साध्या वकीलापेक्षा भारी आहे हे दाखवायसाठी विग घालतात.

आता कुलभूषण जाधव यांच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या केसमध्ये भारताचे वकील होते हरीश साळवे आणि पाकिस्तानचे वकील होते खवर कुरेशी. हायत तर दोघेपण बॅरिस्टरचं. पण कुरेशी साहेबानी केस लढताना विग घातला. पण डोक्याला विग घातला म्हणून आपल ज्ञान वाढत नाही, केस जिंकता येत नाही, त्यासाठी विग खाली डोकं लागतं जे भारताच्या वकिलांनी दाखवून दिल असं लोक म्हणत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.