आरएसएसचे स्वयंसेवक भगव्या ध्वजाची पूजा का करतात ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कोणत्याही व्यक्ती किंवा पुस्तकाऐवजी भगव्या ध्वजाला आपला मार्गदर्शक आणि गुरु मानतात. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी व्यास पौर्णिमा (गुरु पौर्णिमा) च्या दिवशी सर्व स्वयंसेवक संघाच्या ठिकाणी एकत्र येऊन भगवे ध्वजाची विधिवत पूजा करतात.

पण असं का?

खरं तर डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केला तेव्हा अनेक स्वयंसेवकांची हेडगेवारांनी या संस्थेचे गुरु व्हावे अशी इच्छा होती. कारण डॉ. हेडगेवार यांच व्यक्तिमत्त्व संघाच्या स्वयंसेवकांसाठी अत्यंत आदरणीय व प्रेरणादायी असं होतं. स्वयंसेवकाचा आग्रही दबाव असूनही, डॉ. हेडगेवार यांनी भगवा ध्वज हा हिंदू संस्कृती, ज्ञान, संन्यास यांचे प्रतीक म्हणून गुरू मानावा असा निर्णय घेतला.

संघाने १९२८ मध्ये पहिल्यांदा गुरुपूजा आयोजित केली होती. तेव्हापासून ही परंपरा अखंडित सुरू आहे आणि संघात भगवा ध्वज सर्वोच्च स्थानी आहे.

संघाने भगव्या झेंड्याला आपल्या व्यवस्थेत सर्वोच्च स्थान का दिले? हा प्रश्न अनेकांसाठी कोडं राहिलंय.

भारतात अशा अनेक धार्मिक-आध्यात्मिक संस्था आहेत आणि ज्यांच्या संस्थापकांची गुरु म्हणून उपासना करण्याची परंपरा आहे. भक्ती चळवळीच्या समृद्ध परंपरे दरम्यान एखाद्या व्यक्तीला गुरु म्हणून स्वीकारण्यात त्याकाळी कोणतीही अडचण नव्हती.

पण प्रचलित प्रथेपासून दूर जाताना, संघात डॉ. हेडगेवार यांच्याऐवजी भगवा ध्वज अवलंबण्याची कल्पना जगातील समकालीन इतिहासातील एक अनोखा उपक्रम होता. जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था बनलेल्या संघाचा सर्वोच्च गुरु ध्वज असल्याने चर्चेचा विषय होता. संघाच्या अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांनी या रोचक पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह आणि प्रख्यात विचारवंत म्हणून ओळखले जाणारे एच. शेषाद्री यांनी आपल्या ‘आरएसएस: ए विज़न इन एक्शन’  या पुस्तकात लिहिले आहे,

‘भगवा ध्वज हे शतकानुशतके भारतीय संस्कृती आणि परंपरेचे एक प्रतिष्ठित प्रतीक आहे. जेव्हा डॉ. हेडगेवार यांनी संघ सुरू केला, तेव्हापासून त्यांनी हा ध्वज सर्व राष्ट्रीय आदर्शांचे सर्वोच्च प्रतीक म्हणून स्वयंसेवकांसमोर सादर केला. आणि नंतर व्यास पौर्णिमेच्या दिवशी गुरु म्हणून भगवा ध्वजाची पूजा करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघा व्यतिरिक्त काम करणाऱ्या कामगारांमध्ये भगवा झेंडा सर्वसाधारणपणे प्रचलित करणे किती आव्हानात्मक होते याबद्दल शेषाद्री सांगतात कि,

देशात कम्युनिस्ट चळवळीचा आणि त्याच्या लाल ध्वजाचा बराच काळ प्रभाव होता. भारतीय मजदूर संघानेही कामगारांच्या झेंड्याला मान्यता दिली, जे जागतिक कल्याणाचे प्रतीक आहे. पण जेव्हा भारतीय मजदूर संघाने सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनात मार्च १९८१ मध्ये कलकत्ताच्या कम्युनिस्ट-प्रभावित महानगरांच्या रस्त्यावर विशाल मिरवणूक काढली तेव्हा पारंपारिक लालऐवजी हजारो हातात भगवे झेंडे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. कलकत्ताच्या अग्रगण्य वृत्तपत्रांना ही त्यावेळी कामगारांमध्ये ही नवीन केशरी शक्ती उदयास येत असल्याचे जाणवले होते.

या युनियनचे महाराष्ट्र प्रांत कार्यकर्ते एन.एच. पालकर यांनी भगव्या ध्वजावर एक पुस्तक लिहिले आहे. मराठीत लिहिलेल्या या पुस्तकात पान नंबर ७६  वर सनातन धर्मात वैदिक काळापासून भगवा ध्वज फडकवण्याची परंपरा आढळली असल्याचं लिहिलं आहे.

पालकर यांच्या म्हणण्यानुसार,

‘वैदिक साहित्यात अरुणकेतू म्हणून वर्णन केलेले हे भगवे ध्वज हिंदु जीवनशैलीत नेहमीच प्रतिष्ठेचा भाग होता. हा ध्वज हिंदूंना परकीय हल्ल्यांविरुद्ध लढा देण्यासाठी आणि सर्व काळात विजयी होण्यासाठी प्रेरणा देत आहे. हिंदूंमध्ये राष्ट्राच्या बचावासाठी संघर्ष करण्याची भावना जाणीवपूर्वक वापरण्यासाठी याचा उपयोग केला गेला आहे.

याचा परिणाम म्हणून, गेल्या ९६ वर्षांत संघटनेचा पाया विविध क्षेत्रांमध्ये व्यापक झाला आणि संघातील सर्वोच्च पदाबद्दल कधीही वाद झाला नाही. अशा संघटनेत शीर्ष नेतृत्त्वाच्या वारसाबद्दल मतभेद नसणे हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे भगव्या ध्वजाचा गुरु म्हणून स्वीकार करण्याच्या आणि वाद टाळण्याच्या निर्णयाचे श्रेय मुख्यत्वे डॉ. हेडगेवार यांनाच दिले पाहिजे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.