दंगलने चीनमध्ये १३०० कोटी कमावले होते, चीनमध्ये भारतातले पिक्चर तुफान चालतात कारण…

वांग झी चेंग लाँग- माझ्या पोराला ड्रॅगन झालेलं मला बघायचंय

चिन्यांच्या देशातली एक जुनी म्हण आहे. आपल्याकडं जसं स्वतःच्या  शेमड्या पोरात पण बापाला उद्याचा वाघ दिसतो त्याच अर्थाची ही म्हण. मग नुसता रांगायला लागल्यापासून त्या पोराला इंजिनिअर किंवा डॉक्टर बनण्यासाठी आईबाप हाथ धुवण लागतात तसेच चीनमधले पण माय बाप त्यांच्या पोरांच्या मागे लागतात.

हे यासाठी सांगायचं आहे की वरतून जरी हिंदी आणि चिनी वेगळी दिसत असली तरी आतमधून माणसं सेमच आहेत. आणि हेच पाहिलं आणि मेन कारण आहे भारतातल्या पिक्चर्सनी चीनमध्ये धुमाकूळ घालण्यामागचं.

तर हा विषय निघाला आहे,

अजय देवगणचा २०१५ चा द्रुश्यम हा  सुपरहिट पिक्चर आता चीनमध्ये रिलिज होणार आहे.

या कारणामुळं.

जसं बॉलीवूडवाल्यांनी साऊथची कॉपी करून हा पिक्चर काढला होता तशीच या पिक्चरची कॉपी चीन मध्ये करण्यात आली होती. मात्र त्यात तेवढी मजा आली नाही असा चीनमधल्या प्रेक्षकांचा सूर होता. त्यामुळं आता बॉलिवूडमधला द्रुश्यम चीनमध्ये रिलिज होणार आहे असं सांगण्यात येत आहे.आतापर्यंत तुम्हाला चीनमध्ये भारतातले पिक्चर रिलिज होतात आणि तुफान चालतात एवढं तर माहित असेलच.

तसं बघायला गेलं तर बॉलिवूडचे पिक्चर चीनमध्ये रिलिज होवून हिट होणं हि काय अलीकडची गोष्ट नाहीये.

चिनी  बाजारात मोठी कमाई करणार्‍या सुरुवातीच्या भारतीय चित्रपटांपैकी एक म्हणजे राज कपूरचा १९५१ चा कल्ट क्लासिक आवारा. ज्या काळात समाजवादी संरचना आणि राष्ट्र-निर्माण हे  शिखरावर होते, त्या वेळी कपूरचे ऑन-स्क्रीन नायक आणि त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष चिनी जनतेला चांगलाच भावाला होता.

जितेंद्र आणि आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नासिर हुसैन यांच्या १९७१ च्या कारवाँ या पिक्चरनेही अशीच  छाप सोडली होती. १९८० मध्ये शांघाय फिल्म डबिंग स्टुडिओद्वारे चीनी भाषेत डब केलेले, कारवानच्या मेलेडीयस साउंडट्रॅकने (आरडी बर्मन यांनी संगीत दिलेले) चित्रपटाच्या लोकप्रियतेत अजूनच  भर पडली होती.

आजच्या काळामध्ये चीनमध्ये आमिर, शाहरुख आणि सलमान खान हे तिघेही चांगलेच हिट आहेत. अक्षय कुमारचे  राष्ट्रप्रेमाने कुटून भरलेले टॉयलेट: एक प्रेम कथा, आणि पॅडमॅन यांसारखे चित्रपटही चांगले चालले होते.

मात्र या सगळ्यात एकच सुपरस्टार चीनमध्ये सुपरहिट आहे तो म्हणजे आमिर खान.

मिशू (काका)या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या आमिरचा चीनमध्ये मोठा फॅन बेस आहे . २००१ च्या लगान-वन्स अपॉन अ टाइम इन इंडियामधला आमिरचा भुवन चिनी लोकांच्या डोळ्यात भरला होता. मात्र तो चांगला रडारवर येयला आजून १० वर्षे जावी लागली.

त्याच्या ३ इडियट्सने २०११ मध्ये चीनी बॉक्स ऑफिसवर एकूण १४ दशलक्ष युआन कमावले आणि अमीर चीनमध्ये सुपरहिट झाला. त्याच्या धूम ३ , PK  या पिक्चर्सनी पण चांगला गल्ला जमावाला पण राडा केला तो त्याच्या दंगलनेच.

दंगलने चीनमध्ये तब्बल १३०० कोटींचा गल्ला जमावाला होता. तो आतापर्यंत चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे.

मग एकदा मार्केट ओपन झालं तर मग मात्र मग पिक्चरची लाइनच लागली.

यामागे आधीच सांगितल्याप्रमाणे दोन्ही देशातल्या लोकांमध्ये अनेक गोष्टी समान आहेत.

शिक्षणाचाच घ्या ना.  दोन्ही देशांमध्ये ‘शिक्षणा’ ला समान महत्व दिले जाते.

चीनमध्ये हे आपल्यासारखाच  वर्गात जाण्यासाठी शिक्षण हा एक प्रमुख मार्ग आहे असं मानण्यात येतं. आणि त्यामुळे तिथंही पोरांवर शिक्षणासाठी तेवढाच दबाव आहे. त्यामुळे तिथल्या पोरांनाही त्यांचा स्ट्रगल  ३ इडियट्स, हिंदी मीडियम , सीक्रेट सुपरस्टार या पिक्चरमध्ये दिसतो.

पिक्चरमधले इमोशनल सिन बघून रडणारे लोक फक्त आपल्या भारतातच नाहीत तर चीनमध्ये आहेत.

त्यामुळे भारतीय चित्रपटांमधील इमोशनल अँगल तिथल्या लोकांच्या हृदयाला भिडतो. त्यामुळेच सिक्रेट सुपरस्टार सारखा सिनेमा तिथं लाखोंची कमाई करतो आहे. घरच्यांपासून लपून टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्या पोरींना सिक्रेट सुपरस्टार त्यांची स्टोरी वाटत होती.

आजू एक फॅक्टर आहे रेलटेबेलिटी.

आता कुठे श्रीमंती पाहत असलेले भारत आणि चीन हे दोन देश गरिबीतूनच पुढे आले आहेत. दोन्ही देशात मिडलक्लास देखील मोठा आहे. तसेच पितृसत्ताक समाज, थोरा मोठ्यांचा आदर या गोष्टी तिथं पण आहे. त्यामुळे समाजाच्या विरोधात जाऊन पोरींसाठी जीवाचं रान करणारा दंगलमधील महावीर फोगट चीन मधल्या लोकांनी डोक्यावर घेतला होता.

भारतीय चित्रपटांची वर्ल्ड क्लास क्वालिटी हेही आज काल भारतीय पिक्चर चीनमध्ये तुफान चालण्यामागचं कारण आहे.

चीनमध्ये परकीय पिक्चरांचा एक कोटा असतो. त्यामुळे भारतीय  पिक्चर्सना हॉलिवूडवाल्यांशी फाईट द्यावी लागते. आणि तरीही आपले पिक्चर चालतात यामागचं कारण आहे बॉलिवूड पिक्चरच्या स्टोरी टेलिंग, प्रोडक्शन, अभिनय यांचा वर्डक्लास दर्जा. त्यासाठी उदाहरण घेता येइल आयुषमान खुराणाच्या अंधाधूनचं.

चिनी प्रेक्षकांमध्ये सस्पेन्स चित्रपट खूप लोकप्रिय आहेत परंतु चीनमध्ये बनवलेले बरेच सस्पेन्स थ्रिलर्स त्या क्वालिटीचे नसतात.

बरेच चिनी थ्रिलर्स उगी अब्बास मस्तानच्या पिक्चरसारखे गरज नसताना ट्विस्टचा भडीमार केलेले असतात अशी तिथल्या लोकांची ओरड असायची. आणि मग त्यावेळी अंदाधूनसारखे टॉप क्वालिटीचे चित्रपट सुपरहिट होतात.

 “एक सस्पेन्स चित्रपट म्हणून अंधाधुन केवळ भावना किंवा हॉट टॉपिक्सवर अवलंबून राहत नाही, तर तो स्क्रिप्टच्या आणि चित्रपट निर्मितीच्या उत्कृष्टतेमुळे हिट आहे.”

असे निरीक्षण एका प्रख्यात चिनी चित्रपट समीक्षकाने अंधाधुन बद्दल नोंदवले होते.

भारतात फक्त ७० कोटी कमावणाऱ्या अंदाधूनने चीनमध्ये १४० कोटींची कमाई केली होती.  

आजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे चीनची झालेली आर्थिक प्रगती.

सरासरी उत्पन्न वाढलं असल्याने चिनी माणसाची खर्चायची ताकद वाढली आहे. त्यात थिएटर्स,मल्टिप्लेक्स यांचं मोठं सुसज्ज नेटवर्क आहे. त्यामुळे एकदा माऊथ टू माउथ पब्लिसिटीने पिक्चर चालला तर त्याला त्याला पडदा लगेच भेटून जातो.

चिनी सरकरणारे लोकांना जग त्यांच्या नजरेने दाखवले हे ही एक महत्वाचे कारण आहे.

तिथल्या सरकारने  बाहेरच्या जगाशी चिनी लोकांचा संबंध मर्यादितच ठेवला आहे. चीनमधील इंटरनेट पण सेन्सॉर होतं. त्यामुळे तिथल्या लोकांच्या मनात न पाहिलेलं जग पहाण्याची उत्सुकता आहे. विशेषतः शेजारी भारताचे लोक कसे राहतात, कसे जगतात हे त्यांना बघायचं असतं. त्यामुळे ते भारतीय चित्रपटांना गर्दी करताना दिसतात असं चित्रपट विश्लेषक सांगतात.

या सर्व कारणांमुळे भारतीय चित्रपटांना चीनमध्ये गर्दी होते. मात्र आत मोठ्या प्रमाणात चित्रपट रिलिज होत असल्याने आणि पिक्चरमध्ये तोचतोचपणा असल्याचंही चिनी प्रेक्षकांना वाटू लागला आहे. त्यामुळे स्वतःच वेगळेपण मेण्टेन ठेवणे आणि नवीन काही तरी दाखवणे हे इथून पुढे भारतीय चित्रपटांपुढील एक प्रमुख चॅलेंज असणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.