भारतातली लोकं “दुधाचा” चहा का पितात यालाही मोठा इतिहास आहे भिडू….

चहा म्हणल्यावर हजार गोष्टी आठवतात. चहाचे प्रकार, चहाच्या किमती, चाय पे चर्चा, चहावर कविता अशा सतरा भानगडी. बाकी ऑफिसच्या कामाने दमून चहा पिणारी जमात वेगळी तर करायला काहीच नाहीये म्हणून चहा पिणारी लोकं वेगळी.

ब्लॅक टी, लेमन टी पासून ते दुधाचा घट्ट चहा, बासुंदी चहा अशा सगळया व्हरायटी पाहायला मिळतात. ठायी ठायी असलेले अमृततुल्य आपल्याला हेच सांगत असतात की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच.

आता लय झालं चहाचं गुणगान पण एक निरीक्षण केलंय का तुम्ही की बहुतांशी लोकं दुधाचाच चहा प्यायला प्राधान्य देतात. कोरा चहा वैगरे हे वेगळ्या सेक्शनचा विषय. पण विषय काय आहे की भारतीय लोक दूधाचाच चहा का पितात ?

तर याच्यामागं एक इतिहास आहे तोही मार्केटिंगचा. 

कधी कधी लाईफ आपल्याला शॉक करून टाकत की भिडू तूझ्या दुधाच्या चहा पिण्यामागे मार्केटिंगचा फंडा त्याकाळी आलेला होता. दूधाचा चहा पिण्यामागे टी ब्रँडची मार्केटिंग आहे ना की भारतीय लोकांनी शोधलेला चहा पिण्याचा swag. द सीइओ फॅक्टरी या पुस्तकाचे लेखक सुधीर सितापती यांनी लिहिलेलं आहे की भारतीय लोकं चहात दूध का घालतात.

आधी पुस्तकात जाण्यापेक्षा आपण चहाचा इतिहास एका घोटात म्हणजे थोडक्यात जाणून घेऊया.

ब्रिटिशांच्या काळात त्यांना चहा आवडायचा पण तो मिळायचा केवळ चीनमध्ये. यावर उपाय म्हणून ब्रिटिशांनी काय केलं भारतातली अफू चीनला दिली मग चीनवाले अफूच्या नादी लागले. मग ब्रिटिशांनी काय केलं तर तिथून चहाचे रोप भारतात आणून लावले.

आता जेव्हा ब्रिटिशांनी चहा प्यायला तेव्हा त्यांच्या सोबतच इथल्या राजांनी, जमीनदारांनी आणि बाबू लोकांनीही प्यायला. ब्रिटिशांनी जो चहा केला तो गरम पाण्याचा होता म्हणजे थोड्क्यात तो कोरा चहा होता. तेव्हा जास्तीचं चहाचं उत्पादन हे एक्सपोर्ट केलं जायचं. 

आता पुस्तकात काय सांगितलंय तर,

1903 साली लॉर्ड कर्झनने चहाच्या व्यापारावर कर लावला. त्याचं मत होतं की सगळया भारतात चहा लोकप्रिय झाला पाहिजे आणि त्याला जबाबदार लीप्टन आणि ब्रुक बाँड हे ब्रँड पाहिजे. आता भारत तर सगळा चहाला पसंती देत होता. त्यामुळे कंपन्यांनी माल उचलायला सुरवात केली. यामुळे भारतीय चहाचा एक ब्रँड तयार झाला.

मार्केटिंग जोरात करायची म्हणून यात दूध जास्त प्रमाणात आणि साखर जास्त प्रमाणात घालून एक न्युट्रिशन मिळणार पेय म्हणून चहाकडे बघितलं जाऊ लागेल. तसं पाहिलं तर HUL ने भारतीय चहा घराघरात पोहोचवला.

लिप्टन आणि ब्रुक् बाँड यांनी काय केलं की हा दूधाचा चहा सगळीकडे पोहचला पाहिजे म्हणून हावडा ब्रिजवर आणि स्टेशनवर त्यांनी जो दिसेल त्याला चहाचे कप वाटण्याचं काम सुरू केलं. जेणेकरून माऊथ पब्लिसिटी होत राहील.

जागोजागी दूधाचा चहा कसा बनवायचा याचे डेमो देण्यात येऊ लागले. इतका काळ लोटून गेला पण दुधाच्या चहाची सवय काय गेली नाही. लीप्टन आणि ब्रुक बँक या दोन कंपन्यांनी आपल्या जितक्या मार्केटिंग शक्ती असतील तितक्या सगळया वापरल्या का तर दूधाचा चहा सगळीकडे पोहचला पाहिजे म्हणून.

आता इतकं सगळं करुनही भारतीय लोकांना चहा काय पचनी पडलेला नव्हता मग मात्र या दोन कंपन्यांचं डोकं सटकलं. 1930 साली ब्रिटस लोकांनी एक वेगळी खेळी खेळली. त्यांनी काय केलं तर सगळं मार्केट हातात घेतलं.

द इंडियन टी मार्केट एकस्पांशन बोर्ड ( ITMEB ) यांनी एक मोठं कँपेन लॉन्च केला आणि त्यात असं सांगितलं की गोऱ्या ब्रिटिशांनी आपल्या सामान्य लोकांकरिता हा ब्रॅण्ड आणला आहे. शेकडो लोकांनी ते चहा पॅकेट विकत घेतले. रस्त्यापासून ते स्टेशन पर्यंत सगळीकडे याचं चहाची माऊथ पब्लिसिटी सुरु झाली.

महिलांनी एकत्र येऊन पिण्याच पेय म्हणजे चहा असंही जाहीर करून टाकलं.

1947 साली एक भारतीय प्रत्येकी 181 ग्रॅम चहा प्रतिवार्षिक पीत होता. 1953 साली ITMEB ग्रुप स्वदेशी चहाचा ब्रॅण्ड एम्बेसिडर झाला. 1960 नंतर मात्र या चहाने गती घेतली. लीप्टन आणि ब्रुक बाँड यांनी वाटचाल सुरू केली. गेमचेंजर मॉमेंट म्हणजे घरात बायकांची माऊथ पब्लिसिटी तर बाहेर स्टेशनला असणारे विक्रेते. 

चहा बनवण्याच्या पद्धतीत बदल होत होत आज आपण जो चहा पितो तिथपर्यंत आला आहे. 1960- 70 च्या काळात लिप्टन आणि ब्रुक बाँडने जो जोर पकडला तो आजवर सुरूच आहे. यानंतर मात्र रेल्वे स्टेशन, बाजार, बस स्टॉप सगळीकडे चहाच चहा झाले. अद्रक चाय पासून ते मसाला चहा पर्यंत चहात उत्क्रांती घडत गेली.

मात्र भारतीयांनी दूधाचा चहा पिण्यामागे असं काही खास कारण नाही पण लीप्टन आणि ब्रुक बाँड यांच्या मार्केटिंगच्या नादामुळे भारतीयांना चहाचा नाद लागला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.