म्हणून २६ जानेवारीच्या परेडमध्ये नेहरूंनी संघाला आमंत्रण दिलं होतं 

२६ जानेवारी १९६३ साल.

या दिवशी राजपथवरून निघणाऱ्या परेडमध्ये वेगळेपण होतं. या परेडमध्ये खास संघ सहभागी झाला होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ३००० हजार स्वयंसेवक या परेडमध्ये सहभागी झाले होते.

भारतीय सेना, पोलिस बल, अन्य पॅरामेलेट्री फोर्सेस यांच्यासोबत खुद्द संघाचे स्वयंसेवक शिस्तीने परेडमध्ये सहभागी झाले होते. ते ही खुद्द पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या निमंत्रणावरून…. 

आजकालचा इतिहास वाचला तर नेहरू आणि संघ यांच्यामधून विस्तव देखील जात नसल्याचा इतिहास आहे. नेहरूंनी संघाचे पाळेमुळे खोदून काढण्याचा कार्यक्रम राबवला होता इथपासून ते संघावर बंदी आणली होती इथपर्यन्तचा इतिहास सांगितला जातो. दूसरीकडे नेहरू कसे व्यभिचारी होते, नाकर्ते होते असे आरोप उजव्या संघटनेकडून व संघाच्या स्वयंसेवकांकडून होत असतात हे देखील उघड सत्य आहे. 

अशा वेळी नेहरूंनी संघाला थेट राजपथच्या परेडमध्ये आमंत्रण दिलं आणि संघाने देखील ते स्वीकारलं हे पचवणं अवघड होवून जातं… 

तर झालेलं अस की, 

दोनच महिन्यापूर्वी भारत-चीन युद्धबंदी झालेली. या युद्धात भारताचा पराभव झाला होता. चीनने एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली होती पण या घटनेमुळे हिंदी-चीनी भाई भाई पॉलिसीला सर्वात मोठ्ठा धक्का लागलेला. दलाई लामा यांनी भारतात शरण घेतली होती. 

दूसरीकडे संघाची याबाबत नेमकी भूमिका काय होती तर संघ पहिल्यापासून चीन ला विरोध करत राहिला होता. भारताचे परराष्ट्र धोरण हे भूतान, नेपाल, सिक्कीम व तिबेट यांना उदासिन करत आहे अस संघाच मत होतं. जेव्हा हिंदी-चीन धोरणाला धक्का लागला तेव्हा संघाचे मत काही अंशी का होईना बरोबर होतं अस म्हणणं होतं. 

दूसराकडे काही महिन्यापूर्वीचं भारत-चीन युद्ध संपुष्टात आल्यानंतर आत्ता उत्तरादायित्व निभवण्याची वेळ नेहरूंवर आली होती.

संघाने १९६२ च्या युद्धात केलेल्या कामाची पोहचपावती म्हणून नेहरूंनी संघाला आमंत्रण दिलं होतं. संघासोबतच इतर सामाजिक संघटना व संस्थांना देखील हे आमंत्रण होतं पण नेहरूंच्या विदेशी धोरणांचा निषेध करण्यासाठी व चीनच्या युद्धाला नेहरूच जबाबदार असल्याची जाणीव करुन देण्यासाठी इतर संस्था, संघटना या परेडमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या अस सांगितलं जातं.. 

या संबधित अधिक सांगायचं झालं तर पांचजन्य या संघाच्या मुखपत्रात दिनांक ३१ मे २०१८ साली छापून आलेल्या के.एल.पठेला यांच्या मुलाखतीबाबत सांगता येईल. ते स्वत: या परेडमध्ये सहभागी झाले होते. पांचजन्यचे सहाय्यक संपादक आलोक गोस्वामी यांनी ही मुलाखत घेतली होती. 

या मुलाखतीत पठेला म्हणतात, 

आज मी ८७ वर्षांचा असलो तरी मला १९६३ सालचा २६ जानेवारीचा तो दिवस पुर्णपणे आठवतो. मला आठवत त्या दिवशी जनकपुरीच्या आमच्या शाखेतरी स्वयंसेवकांना बातमी मिळाली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दस्ता २६ जानेवरीच्या राजपथ परेडमध्ये सहभागी होणार आहे. 

त्यावेळी चारीबाजूला एकच चर्चा होती ती म्हणजे नेहरूंनी १९६२ च्या युद्धात संघाने केलेले राष्ट्रनिष्ठेचा सन्मान केला. 

ते म्हणतात जनकपुरी शाखेवरून दोघांना परेडमध्ये सहभागी होण्याचा सन्मान मिळाला होता. त्याचसोबत देशभरातील विविध भागातील स्वयंसेवक यात सहभागी होणार होते. ही माहिती आम्हा खूप उशीरा समजल्याने तयारीसाठी फक्त दोनच दिवस होते. 

२६ जानेवारीच्या दिवशी आम्ही संघाचा गणवेश परिधान केला. साधारण ३००० ते ३२०० स्वयंसेवक या परेडमध्ये सहभागी झाले होते. ही परेड इंडिया गेटपर्यन्त केली.. 

१९६२ च्या युद्धात आम्ही संघामार्फत सैनिकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. जीव धोक्यात घालून संघाने ही कामगिरी केली होती व नेहरूंनी देखील याचा सन्मान केला होता… 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.