मुंबईचा आयकॉन असणारी २००० कोटींची एअर इंडियाची बिल्डिंग महाराष्ट्र सरकारला का हवीये ?

असं म्हणतात रात्रीची मुंबई फार भारी दिसते. इथं दिवसा लोकलच्या प्रवासातली, माणसांच्या गर्दीतली धावपळ असली तरी रात्रीची शांतताही तितकीच निराळी असते. ही शांतता फील करण्याचं एक भारी ठिकाण म्हणजे नरिमन पॉईंट.

इथं शांतताही असते आणि श्रीमंतीचा झगमगाटही. इथल्या श्रीमंतीमध्ये भर घालतात त्या मोठमोठ्या टोलेजंग इमारती. नरिमन पॉईंट भागातच ओबेरॉय हॉटेल आहे, मित्तल टॉवर आहे, महाराष्ट्राचं विधानभवन आहे आणि 

एअर इंडियाची ‘पोस्ट मॉडर्न आर्ट’ समजली जाणारी बिल्डिंगही. 

ही एयर इंडियाची बिल्डिंग सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली आणि ही एयर इंडियाची बिल्डिंग राज्य सरकारला मिळावी यासाठी मागणी केली.

पण राज्य सरकारला ही इमारत का हवीये ? या इमारतीचा नेमका इतिहास आणि महत्त्व काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ शेवटपर्यंत बघा…

Leave A Reply

Your email address will not be published.