जगभरातल्या देशांच्या झेंड्यामध्ये जांभळा रंग का नसतो……

प्रत्येक देशाची ओळख असते त्या त्या देशाचा राष्ट्रध्वज. देशाची शान म्हणजे देशाचा झेंडा. जगभरात आपापल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी झेंडा आसतो. झेंड्यांचे विविध रंग, त्यांची बांधणी ही कायम युनिक असते. देशांच्या झेंड्यातील रंग ही त्या त्या देशाची परंपरा आणि खासियत दाखवत असतात. झेंड्यांमध्ये दिसणारे रंग हे कशाचं तरी प्रतीक असतात. जसं की भारताचा तिरंगा ज्यात केशरी रंग हा शौर्याचं आणि बलिदानाचं प्रतीक आहे तर पांढरा रंग हा सत्य आणि शांततेचं प्रतीक आहे तर हिरवा रंग हा संपन्नतेचं प्रतीक मानलं जातो.

असं सगळ्यांचं देशाचं असतं पण तुम्ही जर निरखून आणि बारीक विचार केला असेल की सगळ्या रंगांचे झेंडे असतात पण जांभळ्या रंगाचा एकही झेंडा नाही की जांभळा रंग हा एकाही झेंड्यात नाही. पण जांभळा रंग हा झेंड्यात न वापरण्यामागे एक जबरदस्त कारण आहे. आता ते कारण काय आहे ते जाणून घेऊया.

Worldomiters च्या वेबसाईट नुसार जगात 195 देश आहे यात फक्त दोनच आहेत ज्यांच्या राष्ट्रध्वजावर जांभळा रंग आहे. पण बाकी जगातल्या कुठल्याही राष्ट्रध्वजावर जांभळा रंग नाही. याच्यामागच कारण सुद्धा तसंच आहे. 1800 च्या काळात जांभळा रंग बनवणे हे महाकठीण आणि महाग काम मानलं जायचं. राणी एलिझाबेथने तर घोषणाच केली होती की रॉयल फॅमिलीशिवाय कोणीही जांभळा रंग परिधान करणार नाही. त्यामुळे जांभळा रंग सामान्य लोकांना परवडेनासा झाला.

जांभळा रंग बनवणं महाग होतं आणि तो मिळवणं अजूनच महाग होतं. खरंतर त्या दिवसांमध्ये लॅबनॉनच्या समुद्रात बारीक बारीक गोगलगाय होत्या त्यापासून जांभळा रंग तयार केला जायचा. हा जांभळा रंग बनवण्यासाठी 1 ग्रॅमसाठी 10 हजारांहून जास्त गोगलगायीची शिकार केली जायची. आता त्यापासून डाय बनवण्यासाठी अजूनच जास्त मेहनत लागायची ज्यामुळे डायचा खर्चसुद्धा जास्त वाढायचा. त्या काळात 1 पाउंड जांभळी डाय खरेदी करण्यासाठी 41 लाख रुपये लागायचे.

आता एवढं महाग प्रकरण असल्याने अनेक देशांनी आपल्या देशाच्या झेंड्यात जांभळा रंग ठेवण्यास नकार दिला. नंतरच्या काळात 1856 मध्ये विलीयन हेन्री परकीन हे सिंथेटिक पर्पल डाय बनवू शकले ज्यामुळे जांभळ्या रंगाची किंमत कमी व्हायला सुरुवात झाली होती पण अनेक देशांनी जांभळा रंग झेंड्यातून वगळला होता त्यामुळे अनेक देशांच्या झेंड्यांमध्ये जांभळा रंग आढळून येत नाही.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.