पुतीन यांना करोडो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या स्टॅलिनची कॉपी म्हटलं जातं कारण ..

युक्रेनचा सहज घास घेऊ या आवेशात निघालेल्या पुतीन यांना युक्रेनियन सैन्याने चोख प्रत्युत्तर देत आहे. झेलनस्कीच्या आर्मीने त्यांच्यापेक्षा कित्येकपटीने मोठ्या आणि सुसज्ज असणाऱ्या रशियन आर्मीला महिना झालं तरी थोपवून ठेवलं आहे. मात्र त्याचवेळी रशियन सैन्याने केलेले युद्धगुन्हेही समोर यऊ लागले आहेत. युद्धा कोणत्याही परिस्थिती जिंकायचंच असं ठरवून मैदानात उतरलेल्या पुतीन यांच्या आक्रमक  भूमिकेमुळे युक्रेनमधील सामान्य नागरिकही  मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. 

प्रमुख शहरांना वेढा घालून वेढा घालून त्या शहरांचा फास आवळने आणि मग त्या शहरांना शरण येण्यास भाग पाडणे हा याच स्ट्रॅटेजिचा भाग आहे. किव्हसह प्रमुख शहरांना आज रशियन वेढा पढला आहे. 

आणि पुतीन यांच्या या रूथलेस टॅक्टीक्समुळेच सध्या त्यांची रशियाचा आजून एक हुकूमशाह स्टालिन याच्याशी तुलना केली जात आहे. युक्रेनमध्ये “होलोडोमोर” म्हणजेच  “भुकेने मृत्यू” होणे म्ह्णून ओळखला जाणारा हा नरसंहार स्टॅलिनने युक्रेनियन आयडेंटिटी पुसून टाकणे आणि तिथल्या लोकांना त्याच्या सामूहिक शेती उपक्रमात सहभागी होण्यास नमवण्यासाठी घडवून आणली होती.

 २००३ मध्ये, ब्रिटीश इतिहासकार सायमन सेबॅग मॉन्टेफिओर यांनी किमान २ कोटी लोकांच्या मृत्यूसाठी स्टॅलिन जबाबदार आहे असं म्हटलं होतं . 

पण पुतीन आणि स्टालिन यांची तुलना फक्त या कारणांमुळेच होत नाहीये. 

तज्ज्ञांनी पुतिन आणि स्टॅलिन यांच्यातील देशात भितीचं वातावरण तयार करणे, फ्रिडम स्पीच आणि असोशिएशन यावर निर्बंध घालणे अशा अनेक समानतांवर बोट ठेवले आहे. स्टॅलिनचे बदनाम गुप्त पोलिस दल अजूनही अबाधित आहे आणि ते पुतिन यांचं एक प्रमुख हत्यार बनलं आहे.

स्वतः पुतीन यांनी त्यांचं नाव स्टॅलीन बरोबर जोडलं जाईल यासाठी अनेकवर्षांपासून प्रयत्न चालवले आहेत.

 रशियन अध्यक्ष सोव्हिएत हुकूमशहाची ईमेज सुधारण्याची शक्य होईल तेवढे प्रयत्न करताना दिसले आहेत. डिसेंबर २००८ मध्ये,  रशियन अधिकाऱ्यांनी सेंट पीटर्सबर्ग मेमोरियलच्या कार्यालयातून १२ हार्ड ड्राइव्हस् आणि इतर कागदपत्रे जप्त केली होती ज्यामध्ये एक नागरी हक्क गटाने १९८७ पासून स्टॅलिनिस्ट दडपशाहीवर संशोधन केले होते. त्याचबरोबर पुतीन यांनी स्टॅलिन याला एक मजबूत नेता ज्याने जगाला फॅसिझमपासून वाचवले असं प्रोजेक्ट करण्यास सुरवात केली होती. सामान्य रशियन लोकांच्या नजरेत पुतिन यांना स्वतःची “स्ट्रॉंग मॅन ” इमेज सेट करायची होती त्यासाठीच हा अट्टहास होता.

त्यामुळे दोघांच्यातल्या समानता अजूनच हायलाइट होतात.

आजच्या घडीला पुतिन यांनी स्टॅलिननंतरच्या कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त काळ रशियावर राज्य केले आहे. दोघेही सारख्याच तरुण वयात सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहचेल. पुतिन हे २००० मध्ये वयाच्या ४७ व्या वर्षी प्रथम अध्यक्ष झाले, तर स्टालिन हे १९२४ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी लेनिननंतर अध्यक्ष झाले आणि १९५३ मध्ये मृत्यूपर्यंत त्यांनी राज्य केले.

दोघांनीपण  युद्ध आणि सामाजिक अराजकतेतुन देशाला बाहेर काढून  स्थिरता आणण्याचे वचन दिले होते.  

दोघांनीही समान ऐतिहासिक प्रोपागंडाचा प्रचार केला तो म्हणजे रशियाला अंतर्गत अव्यवस्था टाळण्यासाठी आणि बाह्य आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी “मजबूत हाताची” आवश्यकता आहे. यासाठी दोघांनाही त्यांच्या सत्तेला आणि अधिकाराला आव्हान न देणारी राजकीय व्यवस्था तयार केली  केले. दोन्ही नेत्यांनी बाह्य जगाला एक शत्रुत्व आणि धोक्याची जागा म्हणूनच पाहिले, आणि बाहेरील  जगाने रशियाला शेजाऱ्यांसाठी धोका म्हणूनच पाहिले.

स्टॅलिन आणि पुतीन या दोघांचा सत्ता कायम करण्याच्या तत्त्वज्ञानाचं मुख्य भाग होते देशभक्ती,  रशियन/सोव्हिएत राज्याच्या दीर्घकालीन सुरक्षेचे रक्षण करणे,  वैयक्तिक हक्कांपेक्षा सामूहिक कर्तव्यांना महत्त्व देणे. आणि या सगळ्याचा अर्थ रशियाचा आवाका वाढवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करणे असाही होता. १९३९ आणि १९४५ मध्ये स्टॅलिनने आणि  १९९९ (चेचन्या), २००८ (जॉर्जिया) आणि २०१४आणि २०२२मध्ये  (युक्रेन) पुतिन यांनी हे प्रत्येक्षात दाखवून दिलं.

तसेच, युक्रेनियन सैन्याकडून अपेक्षेपेक्षा जास्त कडवा  प्रतिकार झाल्याने १९३९ मध्ये स्टालिनच्या फिनलंडवर झालेल्या कुचकामी हल्ल्याच्या आठवणींना उजाळा मिळू लागला आहे ज्यामध्ये रशियाला  खूप मोठी किंमत मोजावी लागली.

दोघांमध्ये काही फरक देखील आहेत. स्टॅलिनचा जागतिक स्तरावर भांडवलशाहीला पराभूत करण्याचा महत्त्वाकांक्षी अजेंडा होता, तर पुतिन आणि त्यांचा सत्ताधारी गट जगातील भांडवलदार वर्गात सामील होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण तरीही पुतिन यांना विचारधारेचा अभाव असलेले संधीसाधू असे लिहिणे चूक ठरेल. रशियन लोकांमध्ये पुतिनची विलक्षण लोकप्रियता दर्शविते की त्यांचे असे काही विचार आहेत के जे एवढ्या मोठ्या देशाच्या जनतेला अपील होतायेत. 

स्टॅलिनीज्म सारखा पुतीन यांचा पण एक स्वतःचा ब्रँड झाला आहे. व्हेनेझुएला ते हंगेरीपर्यंतचे हुकूमशाही नेते पाश्चात्य उदारमतवादाला पर्याय म्हणून  म्हणून ‘पुतिनवादाकडे’ पाहतात.

आणि यातूनच हुकूमशाही ब्रँडच्या लोकप्रियता वाढवणे, स्टॅलिनच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे यासाठी पुतीन एवढी एनर्जी खर्ची घालताना दिसतात. पुतिन  रशियामध्ये स्टॅलिनवरील हल्ला हा स्वत:च्या इमेजला धोका असल्याच मानतात.  २०१४ मध्ये, त्याच्या सरकारने रशियातील शेवटचे स्वतंत्र टीव्ही स्टेशन “रेन ”  बंद केल होते कारण  त्यांनी दर्शकांना विचारले होते की स्टॅलिनने लेनिनग्राडला ८७२ दिवसांच्या नाझी वेढा घालण्याऐवजी त्याला आत्मसमर्पण करायला हवे होते का? याच वेढ्यादरम्यान  पुतिनच्या मोठ्या भावासह १० रशियन नागरिक मृत्यमुखी पडले होते. मात्र पुतीन पॉवरच्या पुढे सगळंच सध्या तरी तुच्छ मानताना दिसतात. 

त्यामुळे आता युक्रेनच्या युद्धानंतर एवढी सगळे समानता असणारे पुतीन स्टॅलिनच्या धोरणांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांचा आकडा ही मॅच करतात का हेच बघायचा बाकी आहे. 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.