म्हणून राज ठाकरे दसरा मेळाव्यापासून चार हात लांबच आहेत…
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यावर त्यांच्या गटाला कुठल्यातरी पक्षात विलीन व्हावं लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तेव्हा एक पर्याय पुढं आला होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटी, मनसेनं सभागृहात दिलेला पाठिंबा या सगळ्यामुळे विलिनीकरण किंवा युतीच्या चर्चा सुरु झाल्या.
शिवसेनेच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या दसरा मेळाव्यातच या नव्या राजकीय समीकरणाचा मुहूर्त साधला जाणार आणि राज ठाकरे शिंदे गटाच्या व्यासपीठावर दिसणार असं सांगितलं जात होतं.
मात्र या दसरा मेळाव्याच्या चर्चा शिगेला पोहोचल्या तेव्हा मात्र राज ठाकरेंचं नाव यात कुठंच नव्हतं.
राज ठाकरेंनी दिलेला स्वबळाचा नारा, दसरा मेळाव्याच्या वादात पडू नये असा एकनाथ शिंदेंना दिलेला सल्ला या गोष्टींमुळे राज ठाकरे दसरा मेळाव्याला हजेरी लावणार नाहीत हे स्पष्ट झालं. त्यात मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी दसरा मेळाव्यात विचार नाही, नाटकं बघायला मिळतील अशी टीका केली.
पण राज ठाकरे दसरा मेळाव्यापासून आणि पर्यायानं शिंदे-मनसे या समीकरणापासून लांब राहण्याची कारणं जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.