‘इडियट’ सर्च केल्यावर गुगलवर डोनाल्ड ट्रंप यांचा फोटो का दिसतो…?
डोनाल्ड ट्रंप. आपले ट्रंप तात्या. जागतिक महासत्ता अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात ‘युनिक’ राष्ट्राध्यक्ष. ते सध्या फार म्हणजे फार परेशान. वैतागलेल्या ट्रंप तात्यांना सध्या एकंच प्रश्न छळतोय. वैताग इतका की ट्रंप तात्यांची रात्रीची झोप उडालीये.
ट्रंप तात्यांची झोप उडवलीये ती आपल्या ‘महाग्रु’ने (आता तुम्ही विचारणार की आपल्या ‘महाग्रु’नी पुन्हा असं काय केलं की थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची झोप उडालीये..? तर आपले म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे नाही हो, थोडा मोठा विचार करा. जगाचा ‘महाग्रु’ गुगल)
तर झालंय असं की सध्या गुगलवर इंग्रजीमधून ‘इडीयट’ (idiot) असं सर्च केलं की येणारे रिझल्ट हे ट्रंप तात्यांचे फोटोज आणि त्यांच्या संबंधित बातम्या दाखवतं. आता थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षालाच ‘इडियट’ ठरवायची डेरिंग गुगलने केल्यानंतर ट्रंप तात्यांचा चेहरा रागाने लाल झाला नसता तर नवलंच. मग काय थेट ‘व्हाईट हाउस’मधून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या नावे फर्मान धाडण्यात आलं आणि त्यांना अमेरिकन काँग्रेससमोर हजर होण्यास सांगण्यात आलं.
डेटा चोरी आणि इतरही अनेक प्रकरणांच्या सुनावणीसाठी सुंदर पिचाई हे अमेरिकन संसदेसमोर हजर झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. कॅलीफोर्नियाच्या डेमोक्रॅट सिनेटर झो लोफ्ग्रेन यांनी तर सुंदर पिचाई यांना प्रश्न विचारला की असं नेमकं का होतंय की ‘इडियट’ सर्च केल्यानंतर रिझल्टमध्ये प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रंप यांचे फोटोज दिसतात..? आपण नुकतंच सर्च करून बघितलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
गुगल आपल्या सर्च रिझल्टमध्ये राजकीय पक्षांच्या धोरणांनुसार भेदभाव करतं का, हे त्यांना अजून घ्यायचं होतं. झो लोफ्ग्रेन यांच्या प्रश्नावर उत्तर देताना पिचाई यांनी सांगितलं की गुगलचे सर्च रिझल्ट्स हे वेगवेगळ्या अशा लाखो कीवर्डच्या मदतीने समोर येतात.
एखाद्या कीवर्डला २०० पेक्षा अधिक वेगवेगळ्या निकषांच्या आधारे वेवेगळ्या वेबपेजेस आणि वेबसाईटशी मॅच करून त्यानुसार हे रिझल्ट्स तयार होतात. बऱ्याच वेळा लोकप्रियता आणि प्रासंगिकता याचा देखील या रिझल्ट्सवर प्रभाव असतो.
स्टीव्ह किंग नावाच्या अजून एका खासादाराने देखील पिचाई यांना असाच एक मजेशीर प्रश्न विचारला. किंग यांनी विचारलं की माझ्या नातीचा आयफोन व्यवस्थित चालत नाही, यामागे नेमकं काय कारण असावं..? त्यावर उत्तर देताना पिचाई म्हणाले की आयफोन हे गुगलचं उत्पादन नाही. गुगल आयफोन बनवत नाही.
हे ही वाच भिडू
- जीते तो राहूल जिंदाबाद, और हारे तो इंशाअल्लाह EVM तेरे तुकडे होंगे..
- फक्त एका रात्रीसाठी जगभरातल्या मुली भारतातल्या या खेड्यात येत असतात..!
- कॅनडात नाईट क्लबला गेलेल्या मोरारजी देसाईंसोबत काय झालं ?
- गेल्या ११७ वर्षांपासून सुरु असलेल्या या बल्बच्या फ्युजा अजून उडालेल्या नाहीत !