अन् त्या घटननेनंतर शरद पवार दाढीवाल्यांना उमेदवारी देणं टाळू लागले..

राजकारणात आणि समाजकारणात दाढीवाल्यांचा नाद करु नये. आत्ता हे कोण म्हणतं आम्ही सांगू शकत नाही, पण हे म्हणणारा निश्चितच दाढीवाला असणार हे फिक्स.
कारण एक दाढीवालाच इतका डिपमध्ये अभ्यास करुन असली वाक्य सांगू शकतो.
आत्ता दाढीवाले आणि शरद पवार यांचे असे एकत्रित किस्से सांगायचे झाले तर चटकन डोळ्यासमोर उभा राहणारी निवडणुक म्हणजे कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या लोकसभेची. कोल्हापूरात शरद पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून मंडलिकांना टाळलं होतं.
शरद पवारांनी आपलं माप छत्रपती संभाजी महाराजांकडे टाकलं होतं. तर हातकणंगल्यात राजू शेट्टी नावाचं वादळ देखील घोंघावत होतं. शरद पवार आणि पर्यायाने कारखानदारांवर राजू शेट्टींचा चाबूक फिरत होता.
२००९ सालचा प्रचार सुरू झाला. मंडलिकांना टाळणं आणि तिकडे राजू शेट्टींचा असणारा पवार या गोष्टी एकत्र आल्या. या दोघांना देखील दाढ्या. प्रचार सुरू झाला तो दोन दाढीवाले. मग या दाढ्याचं प्रस्थापितांची वाट लावल्याशिवाय राहणार नाहीत इथून ते मतदानाच्या दिवशी दाढीवरुन हात फिरवून मतदान कोणाला करायचं हे सांगण्यापर्यन्त लोकांनी दाढी उचलून धरली. निकाल असा लागला की, कोल्हापूरात राष्ट्रवादीचे संभाजी महाराज आणि हातकणंगल्यात निवेदिता माने पडल्या. दोन दाढ्या निवडून आल्या.
पण हि पहिली वेळ नव्हती. शरद पवारांनी दाढीचा धसका घेण्यासाठी आपणाला इतिहासात जायला लागतं.
ते साल होतं १९९० चं.
पुण्याच्या राजकारणात तीन दाढीवाल्यांची क्रेझ होती. गिरीष बापट, अंकुश काकडे आणि शांतीलाल सुरतवाला. अंकुश काकडे आपल्या एका लेखात सांगतात की मी, ९९८५ साली दाढी राखायला सुरवात केली. त्यानंतर आम्हा तिघांना लोक दाढीवाले म्हणूनच ओळख लागले. महानगरपालिकेतील अधिकारी दत्ता टोळ यांनी आमच्या तिघांच्या अद्याक्षरावरून “गॅस” अस नाव पाडलं होतं.
थोडक्यात तिघांची ओळख दाढीवाले अशीच होती. पुढे १९९० ची इलेक्शन लागली. या निवडणुकीत शरद पवारांनी तीन दाढीवाल्यांना उमेदवारी दिली. कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी असल्याने गॅसच्या त्रिकुटातील गिरीष बापट गेले आणि तिथे विजय कोलते आले.
१९९० साली शरद पवारांनी शिवाजीनगर मधून अंकुश काकडे, कसबा पेठेतून शांतीलाल सुरतवाला यांना तर पुरंदर मधून विजय कोलते यांना उमेदवारी दिली. आत्ता या तिन्ही लोकांची ओळख म्हणजे त्यांची दाढी.
निकाल लागला आणि हक्काच्या तिन्ही सीट कॉंग्रेसला गमवाव्या लागल्या. आत्ता या इलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर पुन्हा शरद पवारांना आपल्याच पक्षाच्या दाढीवाल्यांमुळे हार पत्करावी लागली.
याबद्दल शरद पवार अंकुश काकडे यांच्या एकसष्टीनिमित्त पुण्याच्या बालगंधर्व मध्ये झालेल्या कार्यक्रमात म्हणाले होते,
या तिन दाढीवाल्यांच्या पराभवामुळे मी ठरवले, दाढीवाल्यांना संधी द्यायची नाही. उल्हास यांचा पण आम्ही लोकसभेसाठी विचार केला होता. पण त्यांना देखील विधानपरिषेदच पाठवायचा निर्णय घेतला तो दाढीमुळे.
पण यात भारत भालके यांच्यासारखे नेते अपवाद ठरले. मागावून दाढी वाढवलेले छगन भुजबळ देखील अपवादच म्हणावे लागतील. राहता राहिला प्रश्न सध्याच्या राजकारणाचा तर असाच निर्णय उद्धव ठाकरे देखील घेवू शकतील..
हे ही वाचा.
- शरद पवारांचा #prank.
- शरद पवारांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आलं !
- शरद पवारांपासून ते सुशिलकुमार, भाई वैद्य, राम नाईक…. सर्वांनी मिळून कस फसवलं ?
- १९६८ साली सांगलीचा माणूस बनवलां ठाण्याचा नगराध्यक्ष शरद पवारांची अशीही करामत.
Bharat bhalake ….pandharpur