अंतर फक्त ५४ किलोमीटर तरी श्रीलंका भारताचा भाग झालाच नाही कारण …
आज श्रीलंका अभूतपूर्व अशा आर्थिक आणि राजकीय संकटातून जात आहे. पेट्रोल डिझेल ते अगदी गहू तांदळाचा देखील देशात तुटवडा जाणवत आहे. इतक्या दिवस ज्या चीनच्या जीवावर उड्या मारल्या त्यानेही ऐन टायमाला कल्टी हाणलेय. मात्र भारत वेळोवेळी लंकेला या परिस्तिथीत मदत करत आला आहे. जानेवारीपासून भारताने श्रीलंकेला २.४ अब्ज डॉलरची मदत केली आहे. लंकेला होत असलेल्या एवढ्या मोठ्या मदतीला भारतातून कोणताच विरोध होत नाहीये.
आपली जनता श्रीलंकेच्या लोकांबद्दल सहानभूती दाखवताना दिसत आहे. त्यात याचवेळी लंकेच्या परिस्तिथीत देशात कोणती ढवळाढवळ भारताने केलेली नाहीये, राजपक्षे बंधू पळून गेल्यानंतर देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र राणील विक्रमसिंघे यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यावर लंका यातून बाहेर पडेल अशी अपेक्षा आहे.
भारतापासून अवघ्या ५४ किलोमीटर दूर असलेला हा श्रीलंका आपला शेजारी. भारताचा मेनलॅन्ड आणि अंदमान निकोबार यांचे अंतर हे १४०० किलोमीटर पेक्षा जास्त आहे.
मग एवढा सगळं विचार करताना विचार आला की भारताला एवढ्या जवळचा असणार हा भूभाग भारताचाच हिस्सा का नाही?
म्हणजे फक्त इमॅजिन करा.
सचिन,सेहवाग आणि मग जयवर्धने. स्पिनमध्ये अनिल कुंबळे आणि मुरलीधरन यांची जोडी एकाच टीममध्ये. नुसता विचार करूनच भारी वाटतंय. आता तुम्ही म्हणणार भिडू तू लगा एकदा वाहत गेला तर थांबायचं नावच घेत नाही.
पण तुम्हाला एक एक करून सांगतो की भारतात आणि लंकेत किती समानता आहे म्हणजे इशू तुमच्या नीट डोक्यात बसंल.
पाहिलं हे लक्षात घ्या की समान इतिहास, संस्कृती ,धर्म आणि भाषा असेलेले लोकं एकत्र येतात आणि देश बनतो. अशी देश बनण्याची एक ढोबळमानाने प्रक्रिया सांगितली जाते.
तर येऊ आपल्या मुद्यावर श्रीलंका भारताचाच पार्ट असायला पाहिजे होता असं काहीजणांना वाटतं त्याबद्दल. आता पहिला कारण तुम्हा आम्हला माहित असलेलंच देण्यात येत ते म्हणजे रामायणाचं.
रामायणात रावणाची लंका म्ह्णून श्रीलंकेचा उल्लेख आहे.
पान आता रामायण हे पुरणाचा प्रकार असल्याने त्याला काय पुरावा मानता येणार नाही. त्यामुळं आपण इतिहासाचा आधार घेऊ. अगदी सुरवातीला जेव्हा मानव प्रजाती आफ्रिकेतून स्तलांतरित होऊन भारतात स्थायिक झाली आणि त्यांनंतरच त्यांनी श्रीलंकेची वाट धरली.
आजही जे श्रीलंकेतील मूलनिवासी वेद्दा आदिवासी आहेत त्यांचे वंशज भारतातूनच गेल्याचे पुरावे दिले जातात.
त्यानंतर मध्य आशियातून जे भारतात आर्यन्स आले होते. त्यातल्याही काही टोळ्यांनी भारतातल्या वास्तव्यानंतर श्रीलंकेची वाट धरली होती.
एवढंच नाही तर आज श्रीलंकेत ज्या सिंहलीज वंशाची लोकं बहुसंख्येने आहेत त्यांचा मूळ पण भारतातील बंगाल, ओडिसा या राज्यात असल्याचं सांगण्यात येत.
श्रीलंकन ग्रंथ महावंसा आणि दीपवंसा याबद्दल सांगतात कि बंगाल मधून राजकुमार विजय हा आपल्या ७०० अनुयायांसह बंगलामध्ये स्थायिक झाला. हा राजकुमार विजयचं श्रीलंकेचा पाहिला सिंहली राजा असल्याचं सांगण्यात येतं.
लंकेत जाणारे बहुसंख्य लोक हे भारतीय वंशाचेच होते हे सांगणारं अजून एक उद्धरण देता येइल ते म्हणजे हजारो वर्षांपासून तामिळ लोकांनी लंकेत केलेलं स्थलांतर.
आज जवळपास श्रीलंकेचे १५% लोक हे तामिळ वंशाचे आहेत. तामिळ लोक नुसते स्तलांतरितच नव्हते तर त्यांनी श्रीलंकेला अनेकदा भारतातल्या साम्राज्याला लंकेचा मोठा भूभाग जोडला होता. त्यामध्ये चोल साम्राज्य आणि पंड्या साम्राज्याचा समावेश होता.
भारत आणि श्रीलंका या देशांना सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे बौद्ध धर्म. बौद्ध धर्म हा श्रीलंकेतील आज प्रमुख धर्म आसू देशाचे ७०% लोकसंख्या बौद्ध धर्माचे पालन करत. सम्राट अशोकाचा पुत्र महिंदा यानेच श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार केला होता.
आणि एवढ्या सगळ्या समानता असून देखील हे दोन देश एकत्र होऊ शकले नाहीत ही सत्य परिस्तिथी आहे. यामागची महत्वाची कारणं बघायची झाल्यास…
जरी श्रीलंकेचा भारताशी जवळचा संबंध आला असला तरी काही अपवाद वगळता श्रीलंका एक वेगळाच प्रदेश राहिला.
भारतातली बहुसंख्य साम्राज्ये अगदी मौर्य साम्रज्यापासून मुघल साम्राज्यापर्यंत ही उत्तेरत शक्तिशाली राहिली. त्यांनी साऊथ इंडियावर तेवढे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्याच्या दक्षिणेला जाऊन लंकेला आपल्या साम्राज्याला जोडण्याचा प्रश्नच नव्हता.
आजच्या तामिळनाडू मधल्या चोल साम्राज्याच्या राजेंद्र चोलने १०१७ मध्ये अनुराधापुरा हे लंकेच्या उत्तरेतील राज्य जिंकले आणि तमिळ सैन्याने बेटावर कब्जा केला. चोल राजवट पण श्रीलंकेत केवळ १०७० पर्यंतच टिकली . पंड्या राजवंशानी लंकेचा काही भाग जिंकला असला तरी या राजांच्या वतीने सिंहलीज राजांनीच तिथे राज्य केले.
फक्त ५४ किलोमीटरचं अंतर होतं पण मध्ये समुद्र आहे.
श्रीलंकेला स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यात त्यांच्या भौगोलिक परिस्थितीचा देखील फायदा झाला. श्रीलंकेचा बेट असण्यामुळे त्यांना अनेक परकीय आक्रमणापासून संरक्षण मिळालं, त्यात भारतातल्या आक्रमणांचा देखील समावेश होता. त्यामुळे सिंहलीज लोकांची एथनिक आयडेंटिटी कायम राहिली.
ब्रिटिशांनी भारतासारखंच श्रीलंकेवर आपला अंमल ठेवला होता पण ..
नौकानयनात पारंगत असलेल्या युरोपियन राष्ट्रांनी जसं जग पादाक्रांत करायला सुरवात केली तशीच लंकेला पण जिंकलं. ब्रिटिशांनी जेव्हा लंका जिंकली तेव्हा त्यांचा भारतावर पण अंमल होता. खरंतर इथं भारत आणि श्रीलंका एकत्र येणायची अशा निर्माण झाली होती. मात्र ब्रिटिशांनी पण लंका आणि भारत यांच्यावर दोन वेगवेगळे देश म्हणूचच प्रशासन चालवलं. त्यामुळं पुन्हा देश पारतंत्र्यात जरी असला तरी त्याच वेगळं अस्तित्व कायमच राहिलं.
दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यानंतर तर मामला अजूनच कॉम्पलीकेटेड होत गेला.
दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यानंतर हे शेजारी चांगले संबंध ठेवून होते. मात्र संबंध बिघडले जेव्हा लिट्टे संघटनेच्या नेतृत्वाखाली श्रीलंकन तामिळ जनतेने स्वतंत्र ईलम म्हणजेच देशाची मागणी करत गृहयुद्ध छेडलं. या युद्धात भारताने तामिळ टायगर्सना मदत केल्याचाही आरोप त्यावेळी श्रीलंकेने केला होता. जर भारताने तेव्हा तामिळ बंडखोरांना पाठीशी घातला असतं तर आज जसा सायप्रसचा तुकडा टर्कीने बळकावला आहे तसा तो भारतालाही मिळाला असता. पण भारतानं तसं नं करता शेजार धर्म पाळला.
श्रीलंकेच्या या वादात भारतानं आपला सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधींना गमावलं देखील होतं.
तरीही भारतानं शेजारी राष्ट्राच्या ढवळाढवळ नं करण्याचं धोरण पाळलं.
आता दोन्ही देशांत लोकशाहीवर चालणारी स्वतंत्र सरकारे आहेत. दोन्ही सार्वभौम देश समान पातळीवर येऊन एकमेकांशी संबंध ठेवून असतात. त्यामुळॆ भविष्यातही आपला भारत या शेजारील राष्ट्राला आपल्या सीमेला जोडेल अशी कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाही.
हे ही वाच भिडू :
- एकाच कुटुंबाच्या हातात सत्ता आल्यास देशाचं कसं वाटोळं होतं याचं उदाहरण आहे श्रीलंका
- चक्रीवादळ आलं आणि हसतं खेळतं धनुषकोडी भुतांचं गाव बनलं…
- देशाची तर वाट लागल्याच, पण श्रीलंकन क्रिकेटही खड्ड्यात गेलंय
- हनी ट्रॅपमध्ये अडकून ‘रॉ’ च सगळ्यात जास्त नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्याची गोष्ट?