जसप्रीत बुमराहच्या दुखापतींमागचं खरं कारण बॉलिंग ऍक्शन आहे की आयपीएल ?

वर्षभराआधी शोएब अख्तर बोलला होता, जसप्रीत बुमराहचा वर्कलोड मॅनेज केला नाही, तर त्याला पाठीची दुखापत होऊ शकते. आपण अख्तरला येड्यात काढत बसलो आणि आता टी-२० वर्ल्डकप तोंडावर आलेला असताना, पाठीच्या दुखापतीमुळंच बुमराह टीमच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. आधीच भारताकडे जडेजा नाही, त्यात १९ व्या ओव्हरमध्ये काय हाल होतात, हे वेगळं सांगायला नको.

त्यामुळं ज्याच्या बॉलिंगच्या जोरावर भारतीय संघाची मिजास होती तो बुमराहच संघात नसल्यानं वातावरण टेन्शनचं असणारे.

एशिया कपमध्येही बुमराह दुखापतीमुळेच संघात नव्हता, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन टी२० मॅचेस खेळल्यानंतर आता त्याच्या पाठीच्या दुखापतीची बातमी आली. फ्रॅक्चर नसलं तरी बुमराहला काही महिन्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

या सगळ्यात प्रश्न पडतो, तो म्हणजे बुमराहला सारखीच दुखापत कशी काय होते ? ज्या ऍक्शनमुळं बुमराहची बॉलिंग इतकी भेदक बनली, ती ऍक्शनच बुमराहच्या दुखापतीला कारणीभूत आहे का ? आणि खरंच बुमराह आयपीएलमध्ये जास्त आणि भारताकडून कमी खेळतो का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओमधून जाणून घेता येतील…

 

Leave A Reply

Your email address will not be published.