राम नावाने ओळखले जाणारे थायलंडचे राजे आणि थायलंडच्या अयोध्येचा इतिहास

रात्रीचा एकंच गोंधळ उडाला, शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या आक्रमकांनी ‘अयोध्येचा विनाश’ हा एकमेव उद्देशाने अयोध्येवर हल्ला केला होता.  त्यांनी शहर लुटायला सुरवात केली. किमती कलाकुसरी, ग्रंथालये, रामायणाच्या मूळ ,आवृत्तीसह प्राचीन हस्तलिखिते, धार्मिक ग्रंथ,राजवाडे त्यांनी नष्ट केले. जे दिसतील त्या नागरिकांची हत्या केली, अनेकांना बंदी बनवलं. मंदिरे पडली. पूजेच्या मुर्त्यांची डोके व अंगं उडवून त्यांची नासधूस केली. शक्य होतं तेवढ्या सोन्याच्या मुर्त्या मग ते वितळवून का होईना त्यांनी आपल्याबरोबर घेतल्या. आणि शेवटी एवढ्यावरच न थांबता त्यांनी अयोध्येला आग लावली आणि तिचा पूर्ण विध्वंस झाल्यावर विजयाचा उन्माद करत ते निघून गेले.

अयोध्या जाळली.

हे होते ‘आयुथय दहनम्’

७ एप्रिल १७६७ च्या रात्री थायलंडमध्ये ही घटना घडली होती. त्या रात्री थाई लोकांशी विळी कोयत्याचं वैर असलेल्या बर्माने(आत्ताच म्यानमार) थाई राज्याची राजधानी असलेल्या अयुथाया शहरावर निर्दयीपणे अत्याचार केले होते. थाई भाषेमध्ये अयुथाया म्हणून उच्चारलय जाणाऱ्या शहराचा नाव अयोध्या होतं. 

होय थाईलँडमध्येही एक अयोध्या आहे. बुद्धिस्ट बहुसंख्यिक असलेल्या या देशात हिंदू धर्माच्या अनेक खुणा तिथे आजही सापडतात. राजधानी बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव सुवर्णभूमी विमानतळ आहे. आणि त्या विमानतळावर समुद्रमंथनाचा देखावा आजही लक्ष वेधून घेतो.

 

थाईलँडमध्ये आजही अशा खुणा आहेत ज्यामुळे तिथं एकेकाळी हिंदू धर्म किती मोठ्या प्रमाणात पसरला होता. पण इतिहासाचा जास्त क्लास नको. आपण आपल्या मेन मुद्यावर येऊ.

राम आणि अयोध्या.

थाईलँडची अयोध्या असलेलं अयुथया शहर बँकॉकच्या उत्तरेस ७० किमी अंतरावर आहे. राजा रामथिबोधी याने हे नाव भगवान रामाच्या जन्मस्थानावरून १३५० मध्ये ठेवले होते. त्याला आपल्या राज्यात रामराज्य बनवायचं होतं. तो स्वतःला  “देवराजा” म्हणून घेत असे.

जसं आग्नेय आशियाचा उल्लेख आपल्या पुराणात सुवर्णभूमी असा सापडतो तसाच अयुथया शहरचा रुबाब होता. मात्र बर्मीज लोकांच्या हल्ल्याने ते पार पालटून गेलं होतं. मात्र एवढं होऊनही थाई लोकांचं दैव बलवत्तर होतं. आणि म्यानमारच्या राजाला थाईलँड पुर्णपणे जिंकता आलं नाही. त्याला चीननं केलेल्या म्यानमारवरील आक्रमणामुळे त्याच्या सैन्यला परत परतावा लागलं. 

आता राज्यात हे दूरदृष्टी असलेलं आणि धाडसी नेतृत्व हवे होते ज्याच्याकडे उद्ध्वस्त झालेल्या अयुथयाला पुन्हा उभारण्याची जबाबदारी होती. ही जबाबदारी राज्याच्या  जनरलनेच स्वीकारली. 

तोच  थाईलँडच्या “चकरी” घराण्याचा संस्थापक. संस्थापकाचं नाव होतं  राम I. 

रामायणाच्या रामासारखा राज्य करण्याचं वचनच आपल्या नावातून या राज्याने थाई जनतेला दिलं होतं.

आजपर्यंत चक्री घराण्याने थायलंडवर राज्य केले आहे. थाईलँडमध्ये आज जरी कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की असली तरी या इथले राजकडे पण जबदस्त पॉवर आहे.  आणि हेच आपलं आजचा किस्सा सांगण्यामागचं कारण आहे.

महा वजिरालोंगकॉर्न हा दहावा राम सध्या थाईलँडच्या गादीवर आहे.

पण आपल्या रामायणातल्या मर्यादापुरोषोत्तमासारखं एकही गुण त्याच्या अंगात नाहीये. हा राजा कधी आपल्या अतरंगी शिक्षांमुळे लक्षात असतो तर कधी त्याच्या राण्यांमुळे. आता हेच घ्याना निदर्शन करताना राजच्या पोस्टरवर एक स्टिकर लावला म्हणून या राजाने एक थाई नागरिकाला ३५ वर्षे जेलची हवा खायला पाठवलंय.

महा वजिरालोंगकॉर्न जेव्हा सत्तेत आला तेव्हाच थाई लोकांनी डोकं आपटून घेणंच बाकी होतं. कारण होतं या राजचा राजकुमार म्हणून असणारा इतिहास

4363392 screenshot20161015225021 jpegd391336d79f09a7b3d2f31154a398820

थाईलँडमध्ये राजा देवासमान असल्याने लोकांना राजाला या अवतारात बघणं सहन होत नव्हतं. मात्र थाईलँडच्या कडक कायद्यांत राजावर टीका करणं मोठा गुन्हा मानण्यात येतो. राजचा मॉलमधला क्रॉपटॉप घातलेला फोटो लाईक केला म्हणून ६८ जणांना तुरुंगात जावं लागलं होतं. मात्र कोणताही पर्याय नसल्याने शेवटी या बिघडेल प्रिन्सलाच लोकांना राजा म्हणू स्वीकारलेलं आहे.

१०० वर्षांपूर्वीच बहुपत्नीत्व बॅन झालेल्या या राजाने आतपर्यंत चार राण्यांशी असलेल्या त्याच्या संबंधामुळे चर्चेत असतो. 

चर्चेत यासाठी की यातल्या तीन राण्यांना राजाने जेलचा रस्ता दाखवला आहे. AP 19294515880569

२०१९ मध्येही त्याने आपल्या एका लफड्याला रॉयल कॉन्सोर्ट बनवलं होतं. आणि तीही आता गायब आहे.

आता एवढा राजा रंगेल आहे म्हटल्यावर त्याची सत्तेत एवढी पक्कड नसणार अशी लोकांना अपेक्षा होती मात्र राजानेही तीही अपेक्षा खोटी ठरवली आहे. राजसत्तेच्या विरोधात थाईलँडमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं झालं आणि दहाव्या रामाच्या सत्तेलाही त्यात अपवाद नव्हता मात्र त्याने ही सर्व आंदोलने चिरडून टाकली आहेत.

त्यामुळं थाईलँडमध्ये सध्या लोकशाही असली तरी राजाचा डामडौल मात्र तेवढाच आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात वजिरालोंगकॉर्न  अजून कोणते कंद करतो की थायलोकं त्याला सत्तेतून पायउतार करतात हे बघण्यासारखं असणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.