५०० वर्षांपासून एकत्र असणाऱ्या कोरियाचे दक्षिण आणि उत्तर कोरिया असे तुकडे कसे झाले ?

रशिया कोरियन युद्धामध्ये आता एक नवीनच शक्यता बोलून दाखवली जात आहे. युक्रेनचेही दोन कोरियांसारखे तुकडे होतील असे अंदाज तज्ञांकडून बोलवून जात आहे. झेलेन्स्की यांनी रशियाला पूर्णपणे हाकलून देणे शक्य नाही हे ओळखले आहे. त्यामुळे ते सध्या रशियाशी डील करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे ते तह करून रशियाच्या ताब्यातील डोनेस्क आणि लुहानस्क या प्रदेशाचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करू शकतात.

त्यामुळे युक्रेनचे तुकडे पडतील आणि त्याची अवस्था कोरियासारखीच होईल अशी ती शक्यता आहे.

आता आपल्याला नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया हे दोन कोरिया अस्तित्वात आहेत हे माहित आहे. पण एकाच द्वीपकल्पावर असलेल्या या प्रदेशाचं अगदी पट्टीने लाइन मारून केल्यासारखे दोन तुकडे कसे झाले हा खरा आपल्यापुढला प्रश्न आहे. अशीच सरळ रेषा मारून देशांची करण्यात आलेली विभागणी तुम्हाला आफ्रिका खंडात पण पाहायला मिळेल. तर असे नुसते नकाशे पुढे ठेऊन एक लाईन मारून देशाचे तुकडे करण्याची करामत केलेली असते या देशांवर वसाहतवाद लादणाऱ्या परकीय शक्तींनी.

आणि अशीच गोष्ट आहे या दोन कोरियांची.

सोळा तासांपूर्वी एका अमेरिकन विमानाने हिरोशिमा या जपानी लष्कराच्या महत्त्वाच्या तळावर एक बॉम्ब टाकला आहे. त्या बॉम्बमध्ये 20,000 टन T.N.T पेक्षा जास्त पॉवर होती. ज्यामध्ये युद्धाच्या इतिहासात आतापर्यंत वापरण्यात आलेला सर्वात शक्तिशाली बॉम्ब ब्रिटीश “ग्रँड स्लॅम” पेक्षा दोन हजार पटींनी जास्त होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बची जबाबदारी घेतली होती. 

या बॉम्बमुळे जपानची युद्ध करण्याची पूर्ण ताकदच निघून गेली होती. जपानची दुसऱ्या विश्वयुद्धात सरेंडर होण्याची फक्त औपचारिकताच बाकी होती.

या अणुबॉम्बमुळे जपानची अतोनात हानी झाली असली तरी तरी एका देशाने मात्र सुटकेचा निःश्वास सोडला असेल आणि तो म्हणजे कोरिया. 

पूर्ण कोरियन द्वीपकल्प हा जोसेन राजवंशाच्या राजवटीखाली  होता ज्याने १३९२ पासून कोरियावर ५०० वर्षांहून अधिक काळ राज्य केले होते. मात्र  १९१० मध्ये जपानने कोरियाची ही राजवट संपुष्टात आणत, या द्वीपकल्पावर राज्य करायला सुरवात केली. जपानची वसाहत म्हणून, कोरिया ३५ वर्षे (१९१०-१९४५) क्रूर जपानी शासनाखाली होता.

आमचीच संस्कृती श्रेष्ठ आहे असं म्हणत जपानने जबरदस्तीने कोरियन संस्कृती पुसण्यास सुरुवात केली होती. 

कोरियाचे  जपानीकरण सुरू केले होते. कोरियातील लोकांना त्यांची भाषा, त्यांचा इतिहास, त्यांची जंगले, त्यांची झाडे, वनस्पती यापासून दूर करण्याचे प्रयत्न चालू होते. त्यांना लाखोंच्या संख्येने कोरियन नागरिकांना जपानला नेऊन गुलाम बनवले होते. कोरियन महिलांना सेक्स स्लेव्ह बनवण्यात आले होते.  जपानी क्रूरतेचा हा इतिहास अजूनही कोरियाच्या दोन देशांमधील एक समान धागा आहे.

त्यामुळे आता दुसर्‍या महायुद्धात जपानच्या पराभवानंतर, कोरियन लोक स्वतंत्र राष्ट्र बनण्याची आकांक्षा बाळगत होते परंतु त्यांना आपल्या पुढं काय वाढून ठेवलं आहे याची जाणीव नव्हती.

जपानच्या तावडीतुन सुटल्यानंतर हा देश अडकला दोन महासत्तांच्या शीतयुद्धत. १९४५ मध्ये जपान शरणागतीच्या मार्गावर होता आणि जपानच्या शरणागतीची बातमी येताच यूएसएसआरने जपानी सैन्याला चिरडून कोरियापर्यंत आले होते. त्या वेळी अमेरिकेचा कोरियामध्ये तळ नव्हता आणि सोव्हिएत सैन्याने द्वीपकल्पाचा संपूर्ण ताबा त्यांना  भीती वाटत होती. जपान कधी शरणागती पत्करेल याचा ट्रुमन यांचा अंदाज चुकल्यामुळे अमेरिकन सैन्याची अनुपस्थिती होती.

मग  जुलै १९४५ मध्ये मित्र राष्ट्रांच्या तीन मोठ्या प्लेयरची कॉन्फरन्स झाली. 

हे तीन देश होते – अमेरिका, सोव्हिएत आणि ब्रिटन. आणि कॉन्फरन्सचे ठिकाण होते- जर्मनीचे पॉट्सडॅम शहर. येथील परिषदेत तिन्ही देशांनी पुढे काय करायचे यावर चर्चा केली. कोणते क्षेत्र आपल्या संरक्षणात घेणार यावर खलबतं झाली. मग या परिषदेत कोरियाची विभागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३८ अंश उत्तर अक्षांश रेखा कोरियाच्या मध्यभागी जाते. अमेरिका आणि सोव्हिएत यांनी त्यालाच  सीमारेषा बनवली. या रेषेच्या उत्तरेकडील भागात जपानी सैन्याचे शरणागती सोव्हिएतने  स्वीकारायचे.

अमेरिकेने दक्षिणेला जपानची  शरणागती पत्करण्याची असं मान्य करण्यात आले. आणि अशा प्रकारे एक टेबलावर बसत आणि नुसता एक मॅप समोर ठेवत दोन्ही महासत्तांनी देशाचे भवितव्य निश्चित केले.

म्हणजे कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली आला नॉर्थ कोरिया आणि अमिरेकेच्या कॅपिटॅलिस्ट ब्लॉकच्या प्रभावाखाली. मात्र या टप्प्यावर हे  विभाजन म्हणजे तात्पुरती प्रशासन व्यवस्था असल्याचं मान्य करण्यात आलं आणि कोरियाला पुन्हा नव्या सरकारच्या अंतर्गत एकत्र आणायचं असं ठरवण्यात आलं.

१९४७ मध्ये मग एक लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार स्थापन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी उत्तर आणि दक्षिण दोन्ही प्रदेशात निवडणुका घेण्याचं ठरवलं. संयुक्त राष्ट्रच या निवडणुकांवर देखरेख ठेवणार होतं. मात्र या निवडणुकांवर कम्युनिस्ट ब्लॉकचा विश्वास नव्हता.आणि त्यामुळे नियोजित निवडणूक यशस्वीपणे होऊ शकली नाही.

उत्तरेमध्ये सोव्हिएट्सने निवडणुका रोखल्या होत्या, ज्यांनी त्याऐवजी कम्युनिस्ट नेता किम सुंग II  यांना डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (DPRK) चे प्रमुख म्हणून पाठिंबा दिला होता. दक्षिणेकडील परिस्थिती फार वेगळी नव्हती, जिथे सिंगमन री यांना कोरिया रिपब्लिक ऑफ कोरिया (ROK) चे नेते म्हणून अमेरिकेने पाठिंबा दिला होता. 

अश्याप्रकारे १९४८ मध्ये दोन वेगवेगळी सरकारे इथं स्थापन झाली.

एक वर्षानंतर, संयुक्त राष्ट्रांच्या कराराचा एक भाग म्हणून, अमेरिका आणि सोव्हिएत दोन्ही द्वीपकल्पातून त्यांचे सैन्य मागे घेतले. मात्र या दोन्ही देशांवर या दोन महासत्तांचा प्रभाव होताच.

त्यातच नव्याने वेगळे झालेले हे दोन देश अनेकदा चकमकींमध्ये गुंतले होते. १९५० च्या मध्यात, सोव्हिएट्सच्या पाठिंब्याने, डीपीआरकेने म्हणजेच नॉर्थ कोरियाने संपूर्ण कोरिया द्वीपकलपला कम्युनिस्ट राजवटीत एकत्र करण्याची संधी पाहिली आणि साऊथ कोरियावर हल्ला केला.

 चार महिन्यांच्या आतच किम सुंग II  यांच्या डीपीआरके सैन्याने जवळपास संपूर्ण द्वीपकल्प जिंकत आणला होता.

तेवढ्यात मग साऊथ च्या बाजूने संयुक्त राष्ट्रांनी या युद्धात हस्तक्षेप केला. पोलीस कारवाई या नावाखाली संयुक्त राष्ट्रे युद्धात उतरलं. तास बघायला गेलं तर संयुक्त राष्ट्राच्या सैन्यात अमेरिकेचाच सगळ्यात मोठा सहभाग होता. त्यामुळे आता सोव्हिएत युनिअन आणि अमेरिका या दोन्ही महासत्ता युद्धात उतरल्या. त्यात चीनच्या कम्युनिस्ट क्रांतीच्या दरम्यान नॉर्थ कोरियाने केलेल्या मदतीमुळे चीनने पण नॉर्थच्या बाजूने उतरण्याचा इशारा दिला होता. 

युद्ध अनेक वर्षे चालले. अखेरीस, जुलै १९५३ मध्ये, सुमारे ३० ते ४० लाख लोकांच्या मृत्यूनंतर कोरियन युद्ध थांबले. युद्ध थांबले, पण संपले नाही. 

का?

कारण उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात करार होऊ शकला नाही. देशाची फाळणी मान्य नाही, असे दक्षिण कोरियाने म्हटले होते आणि त्यांची आजही तीच भूमिका आहे. किम जोंग ऊन याची प्रत्येकवेळी नवीन मिसाइल लाँच केल्यानंतर हीच पॉसिबिलीटी बोलून दाखवतात.

नॉर्थ कोरियाने तेव्हा शांतता करारावर स्वाक्षरी केली नाही. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या हे  कोरियन युद्ध आजही संपलेले नाही.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.