KGF, रजनीकांत यांना पण कळलंय खरा पैसा NFT मध्ये आहे, जाणून घ्या कसं ते ?

दुनिया में सब कहते हैं की पैसे के बिना चेन से जी नहीं सकते… लेकिन ये कोई नहीं कहता की बिना पैसे के चेन से मर भी नहीं सकते.

सगळ्यांनी रॉकी भाईचे वेगवेगळे डायलॉग मोटिव्हेशन म्हणून घेतले. आपल्याला मात्र ह्योच डायलॉग भिडला. KGF च्या पहिल्या चाप्टरचं किमान १०-१२ वेळा तरी पारायण केलं असेल. आता दुसऱ्या पार्टच्या ट्रेलरचा पण तेच चालूय. पिक्चरची एक ना एक अपडेट फॉलो करत असताना मध्येच रॉकीभाईंनी KGF ची  NFT आणल्याचं आणि KFG मधली जमीन पण NFT ने विकत काढल्याचं कळलं. आता रॉकीभाईचं पोस्टर तर मागच्यावेळी घेतलं होतं.पण आता हे NFT चं फॅड मात्र काय कळायचं नाव घेत नव्हतं. त्यात NFT मध्ये पैसा आहे एवढंच कळलं होतं.

पण आपल्या भिडूची एक गोष्ट आहे तो काही कळत नाही म्हटल्यावर शांत बसत नाही. लागलीच विषयाला भिडतो.मग सगळी माहिती काढायला सुरवात केली. आणि सगळी तुम्हाला जशीच्या तशी अगदी इतंभूतपणे सांगतो. 

सुरवात करू NFT काय आहे इथपस्नं.

सुरवात फुल फॉर्म पासून करू. 

Non Fungible Tokens एवढा सोप्पा फुल फॉर्म आहे.

पण ह्यातनं काय घंटा कळत नाय. त्यामुळं एका एका शब्दाचा अर्थ विस्कटून बघू.

नॉन फंजीएबल म्हणजेच एकदम युनिक ज्यांची कॉपीच नाही होणार किंवा त्या तोडीची दुसरी वस्तूच नसते. उदाहरण देऊन बघू . समजा तुमच्याकडं पैसे असतील तर तुम्ही त्याला तेवढ्याच पैशाने रिप्लेस करू शकता. म्हणजे १००ची असेल तर ५० च्या दोन नोटा किंवा १०च्या १० नोटा त्या बदल्यात तुम्ही देऊ शकता. पण तीच तर एम एफ हुसेनची पेंटिंग असेल तर तिला तुम्हाला कशानं रिप्लेस करता येत नाही.  म्हणजेच ती नॉन फंजीएबल आहे. 

आता राहिला टोकनचा अर्थ.

त्यासाठी हे NFT कशासाठी आणलंय ते आधी बघू. पुन्हा एम एफ हुसेनच्या पेंटिंगकडे येऊ. आज त्याची पेंटिंग एक कलेक्टेबल आयटम आहे. आज ह्या पेंटिंग असेट्स म्हणून करोडो रुपयांना विकत घेतल्या जातात. पण हे झाले फिजिकल असेट्स. म्हणजे ज्यांना तुम्ही हात लावू शकताय. विकत घेतलं तर त्या तुमच्या हातात येतात. असे अनेक कलाविष्कार करोडोंच्या किंमतीत विकले जातात.

पण हेच मात्र डिजिटल असेट्सच्या बाबतीत होत नव्हतं. मग तिथं येतं NFT.  डिजिटल असेट्स ज्यामध्ये इमेजेस, म्युझिक, मिम्स ,व्हिडिओ आणि इतर डिजिटल असेट्सची विक्री करण्यासाठी मग NFT आलं. आत डिजिटल असेट्सची डेफिनेशन पण फिक्स नाहीये. यात कशाचा पण समावेश होऊ शकतोय. म्हणजे अगदी ट्विटरच्या संस्थपकाचं पाहिलं ट्विट असू दे की एकाधी क्लिप आर्ट आणि आणखी बरंच काही.

नवीन आहे समजायला वेळ लागेल पण पुढं चला आणि नीट वाचा.

मग या असेट्ला एक टोकन दिलं जातं. आणि  NFT तयार होते. हे NFT मग ओपेनसी किंवा इतर प्लॅटफॉर्म वर ट्रेड केलं जातं.  ही NFT सिस्टिम पूर्णपणे बिटकॉइनसारखी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजिवर चालते. त्यामुळे त्या NFT चा मालक कोण होता ही माहिती जनरेट झाली का ती कायम त्या NFT बरोबर राहते.

NFT आणि बिटकॉइन वेगळं आहे बरं. NFT नॉन फंजिबल आहे तर बिटकॉइन फंजिबल.

एवढं सोपं आहे. कळलं नसेल तर पुन्हा एकदा वाचा. नाहीतर पुढं उदाहरणं देऊन सांगतो तेव्हा कळलंच.

अमिताभच्या वडिलांची म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांची का कविता आहे मधुशाला.  मग अमिताभने काय केलं ती कविता स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केली. आता हे कॉम्बिनेशन किती युनिक आहे तुम्हीच सांगा. 

त्याने याची NFT काढली. त्यामुळं ब्लॉकचेन वर माहिती स्टोअर झाली की ही कलाकृती स्वतः अमिताभची आहे. 

मग पुढे समजा सुरेशने हा NFT विकत घेतली तर त्याची लगेच ब्लॉकचेन वर नोंद होणार की अमिताभची NFT सुरेश कडे गेली. पुढे रमेश ने ती विकत घेतली तर लगेच मग माहिती स्टोअर होणार अमिताभची NFT सुरेशकडे आणि मग ती आता रमेशकडे आली. आणि आता हे प्रत्येक ट्रँजॅक्शनच्या वेळी हे रेकॉर्ड ब्लॉकचेनवर अपडेट होतं आणि यात कुठलीही अफरातफर करता येत नाही. या पूर्ण प्रोसेसमध्ये काय झालं तर डिजिटल असेट्सची पण मालकी ठरवता येते हे सिद्ध झालं.

आणि याचाच उपयोग करून आज हिरो हेरॉईन करोडो छापतायेत. 

अमिताभने स्वतःच  NFT कलेक्शन आणत  ७.५ करोड छापण्याची कमाई केली होती. यात त्याने म्हटलेल्या कवितांचे रेकॉर्डस्, त्यांना साइन केलेले त्याच्या पिक्चरचे जुने पोस्टर्स यांचा समावेश होता. 

सुपरस्टार रजनीकांत देखील एनएफटीच्या या क्रेज मध्ये सामील झाला होता. त्याच्या सुपरहिट  अॅक्शन थ्रिलर ‘शिवाजी द बॉस’ वरील NFT कलेक्शन तुफान चाललं होतं. 

पण यात एक इंटरेस्टिंग नवा आहे जॉनी लिव्हर.

 जॉनी लिव्हरच्या NFT ने एक वेगळीच हवा केली आहे. त्याची आधीपासूनच असेलली कॉमेडी इमेज आणि त्यात त्याच्या नावाने काढलेले क्वर्की NFT मार्केट मध्ये जोरदार चालले.

आता असेच NFT काढण्यात आलेले आहेत KGF २ या पिक्चरचे.  रॉकीचे वेगवेगळे अवतार सुरवातीला NFT म्ह्णून विकण्यात येत आहेत. तसेच KFG चं मेटाव्हर्स  देखील बनवण्यात आलं आहे. जे KGF व्हर्स या नावाने लाँच करण्यात आले आहे. या मेटाव्हर्स मध्ये तुम्हाला जमीन विकत घेण्याचा पण ऑप्शन देण्यात आला आहे. KGF चे टोकन लाँच झाल्या झाल्या हातो हात विकले गेले आहेत.

भारतात चित्रपटांचा मोठा फॅन बेस आहे. याआधीही पिक्चर्सबद्दलच्या ज्या दुर्मिळ गोष्टी होत्या जसं की पिक्चर्सचे पोस्टर्स, गाण्याचे ओरिजनल रेकॉर्डिंग्स इत्यादी. आणि आता हीच जनता चित्रपटाबद्दलच्या NFT ला जोरदार प्रतिसाद देत आहे असं जाणकार सांगतात.

त्यामुळे येणाऱ्या काळातही बॉक्स ऑफिस एवढीच कमाई या पिक्चर्सनी NFT मध्ये केली तर आश्चर्य वाटायला नको.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

  

Leave A Reply

Your email address will not be published.