कोहली आणि ज्यो रूट यांच्याकडून पहिल्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या हौतात्म्यास सलाम !!!

ओव्हलच्या मैदानावर सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानचा पाचवा आणि अंतिम कसोटी सामना सुरु आहे. भारताने ही मालिका आधीच गमावलिये, पण या सामन्यादरम्यान एक आगळीवेगळी घटना घडली जी सध्या चर्चेत आहे.

भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि इंग्लंडचा कॅप्टन ज्यो रूट यांना गांधीजींच्या खादीपासून बनवलेल्या खाकी रंगाच्या कपड्यांमध्ये बघण्यात आलं. निमित्त होतं पहिल्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या योगदानाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनीय सामन्याचं.

पहिल्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या योगदानाला सलाम करण्यासाठी रॉयल ब्रिटीश लिजन आणि सरे यांच्याकडून या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी ओवल टेस्टच्या लंचच्या वेळेदरम्यान  हा सामना खेळविण्यात आला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात रॉयल मँचेस्टर रेजिमेंट आणि भारतीय सैन्याची सिख रेजिमेंट यांच्यादरम्यान देखील सामना खेळविण्यात आला.

पाचव्या टेस्टच्या सुरुवातीलाच कोहली आणि रूट यांच्या ब्लेझरवर खादीपासून बनविण्यात आलेलं पॉपीचं फुल लावण्यात आलं होतं. त्यावेळी हे प्रतिक वापरणारे कोहली आणि रूट हे पहिलेच व्यक्ती ठरले होते. मर्यादित स्वरुपात असलेल्या या प्रतीकाचं ‘रॉयल ब्रिटीश लिजन’कडून ब्रिटीश आशियायी समुदायात वितरण करण्यात येणार आहे.

पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहिली होती. ब्रिटीश सत्तेखालील भारतीय सैन्य या महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने लढलं होतं. महायुद्धात जवळपास ६२००० भारतीय सैनिक शहीद झाले होते आणि ६७००० सैनिक गंभीररित्या जखमी झाले होते.

इंग्रजांच्या राजवटीखालील राष्ट्रकुल देशांनी विशेषतः भारताने पहिल्या महायुद्धात दिलेल्या योगदानाचा व्हिडीओ देखील रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये खुदादत खान यांच्या शौर्याची आठवण काढण्यात आली आहे. ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ जिंकणारे पहिले मुस्लीम म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.