वेस्ट इंडिजची माणसं आपल्यासारखी नावं का ठेवतात याचं कारण ऊसाच्या फडात सापडतं..

वेस्ट इंडिजसोबत मॅच असली की मला कायम हा प्रश्न पडायचा की ही एवढ्या लांबची लोकं आपल्या पोरांसारखी नावं का ठेवत असतील ब्वा !

हे तिकडलं कुठलं हिंदुराष्ट्र आहे ज्याच्यात शिवणारायन, सुनील नारायण हे लोकं राहतात. बरं, असं असलंच तर मग ब्रायन लारा आणि आंद्रे रसेल ह्यांची नावं एवढी इंग्रजाळलेली का असत्याल?

काहींच्यात तर सगळंच भेसळ केल्यासारखं एकीकडं निकोलस अन मागं पुरण असली भानगड का आहे?

तर ह्याची उत्तरं उसात मिळतील.

WhatsApp Image 2020 10 15 at 8.21.07 PM
ऊसाचे महत्व

हो, टिंगल नाय, आजच्या काळात जे काही उसात किंवा उसावरून होतं त्याच्या कितीक पण मोठ्या घडामोडी जगात उसाने घडवल्या आहेत.

वेस्ट इंडिज म्हणजे पश्चिमेला निघालेल्या कोलंबसाने भारताचा शोध घेत घेत शोधलेली काही बेटं होती. तो भारतातच पोचला असं त्याला वाटलं म्हणून त्याने ह्याच जागेला इंडिज म्हणून संबोधलं.

नंतरच्या काळात या बेटाचा ताबा इंग्लंड कडे गेला आणि इंग्लंडने जगभरात जिथे म्हणून आपल्या वसाहती असते असतील तेथून स्थानिक गरीब माणसांना उचलून या जागेवर ती आणून सोडले आणि त्यात वरचा क्रमांक होता तो म्हणजे भारतीयांचा…

त्या काळी गोरगरीब घरची जनता पैसा मिळावा म्हणून कामाच्या शोधात सगळीकडं हिंडत होती. त्यातही महाराष्ट्राच्या कोकणातील तसेच उत्तर भारतातील काही लोक पैशांसाठी ब्रिटिशांकडे पेठ बिगारी काम सुद्धा करतात पद्धत म्हणजे जवळपास गुलामी सारखीच होती आणि मालक सांगेल त्या जागी पडेल ते काम लोकांना करावे लागेल आपल्या गावांमधून मुंबई-मद्रास-कलकत्ता अशा मोठमोठ्या शहरांमध्ये येत.

तिथं अशा एखाद्या मालकाच्या हाताखाली नोकरी पत्करायची जो आपल्याला वेठबिगारी म्हणून ठेवून घेईल आणि त्याच्यासोबत सांगेल तिथे जाऊन काम करायचं का तेव्हाचा सरळसोट उद्योग होता ही त्या काळाची खरी रोजगार हमी होती, कारण दुष्काळात गावाकडची सगळी जनता एकीकडे अन्नान दशा होऊन मरत होती तर दुसरीकडे शहरात आल्यावर किमान नोकरी आणि खाण्याची हमी होती.

पण एवढ्यावर म्हणतील तर ते साहेब लोक कुठले !

त्यांनी त्याही परिस्थितीत भारतीयांना पिळून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून आपल्या हाताखाली आजन्म वेठबिगारी म्हणून राहण्याची एग्रीमेंट करून घेतली. या एग्रीमेंट मधलं गरीब गावाकडून आलेल्या शेतकऱ्यांना काही कळत नव्हतं.

सांगेल तिथे अंगठा लावून हे लोक जहाजात बसत आणि ब्रिटिश ज्या देशात उतरवतील त्या देशात जाऊन काम करत. कामाचा पगार मागितला किंवा आपल्या देशात घरच्यांकडे परत जाण्याची अनुमती मागितली की हे इंग्रज लोक या कामगारांवर पिसाळून धावून येत आणि तू एग्रीमेंट कामगार आहेस तुला जाता येणार नाही असे म्हणत.

ह्या एग्रीमेंट ला मराठी लोक गिरमिट असे म्हणत असत आपल्या सुताराच्या लोकल देशी ड्रिल मशीनला गावाकडं हे नाव त्यांनी ऐकलं होतं आणि म्हणून देशोदेशी गेलेल्या ह्या सगळ्या भारतीय लोकांनाच गिरमिट्या हे नाव पडलं ते आजतागायत टिकून आहे जहाजातून येणारे लोक म्हणून यांना जहाजी असेही म्हटले जाते वेस्टइंडीज मध्ये गेलेले असे लोक या एग्रीमेंट मधून पिढ्यानपिढ्या मुक्त झाले नाहीत आणि जे गेले ते कायमचे तिकडचे राहिले त्यांचा येथील देशाशी असणारा संबंध तुटला.

या कामगारांची नोंद करताना सुद्धा ब्रिटिश लोक दयामाया दाखवत नसत आणि शेतावर ला ह्या नंबरचा एक मजूर एवढीच त्यांची ओळख असे त्यामुळे त्यांची नावे लिहिताना त्यांना ओळीने रांगेत उभे करून एक अधिकारी शक्य तिथे नाव हाताने लिहून घेई भारतीयांची नावे लांबसडक असत त्यामुळे लिहिणारा इंग्रजी अधिकारी वैतागून आपल्याला ऐकू येईल आणि जमेल तसे हे नाव लिहून घेत असे,

उदाहरणार्थ वेस्टइंडीज मध्ये प्रसिद्ध असलेली भारतीय मजूर आणि इंग्लंडच्या मुलीची प्रेम कहानी सदूराम कृष्णाजी पिंगळे आणि ऍना या दोघांची भन्नाट लव स्टोरी.

या सदुरामला मुंबईच्या बंदरा मधून गिर मिठाचा करारावर मजुरीसाठी वेस्टइंडीज मधल्या उसाचा शेतांमध्ये शेतमजूर म्हणून देण्यात आले तिथं आपल्या आईपासून आणि कुटुंबापासून दुरावलेला सदू राम जाऊन मोलमजुरी करू लागला त्याच्या गिरमटावर नाव लिहिताना इंग्रज अधिकाऱ्याने त्याला त्याचे पूर्ण नाव विचारले आपले लांब सडक नाव सांगताच त्या अधिकाऱ्याने साधू कृष्णा एवढेच कागदावर लिहिले आणि त्याला पुढे पाठवून दिले.

अशाप्रकारे साधुराम कृष्णाजी पिंगळे याचा सॅदू क्रिष्णा झाला !

हीच नावं त्यांनी आपल्या पोराबाळांना दिली अन तिथं ही नावं रूढ झाली.

आपल्या सगळ्यांच्या आवडता पट्ट्यांवाला चंदरपॉल पण ह्यातलाच. पवनकुमार चंद्रपाळ नावाचा माणूस 1873 मध्ये मजुरी करण्यासाठी बिहारबंगालच्या सीमेवरील पूर्णिया जिल्यामधून निघाला. त्याला खबरबात कळाली की जिल्ह्याचा गोरा कलेक्टर मजुरांना बाहेर पाठवतोय. गरिबीने पिचलेल्या पवनकुमार याने आपलं नाव जिल्हा दफ्तरखान्यात नोंदवलं आणि त्याला कलेक्टरने गयाना बेटावर आपल्या उसाच्या वावरात राबण्यासाठी पाठवून दिलं.

त्याचं नाव गयानाच्या गिरमीटात लावताना फक्त कुमार चंदरपॉल एवढंच लिहिलं. ह्यांचाच पणतू म्हणजे आपला तिरपी बॅट धरणारा शिवनारायण चंदरपॉल.

कित्येक वर्षे वेस्ट इंडिजचा कॅप्टन असणारा रामनरेश सारवान, वर्ल्डकप जिंकून देणारा शेरदिल अल्विन कालीचरण, जगावेगळा बॉलिंग ऍक्शन घेणारा सुनील नारायण, रोहन कन्हाई, ह्या आयपीएलला प्रीती झिंटाचा लाडका झालेला निकोलस पुरण ही सगळीच आपल्याच रक्तामांसाची लांब नांदलेली मंडळी…

ह्या लोकांनी आपली वेगळी संस्कृती तिथं बसवली. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जातीधर्माच्या लोकांनी एकमेकांशी लग्न केली आणि ह्या बेटांवर स्वतःची वेगळी संस्कृती तयार झाली. आपल्या दिल्या घरात ते आता सुखानं जगत आहेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.