WhatsApp विकल्याचा पश्चाताप होतोय कारण आत्ता “प्रायव्हसी” राहिलेली नाही..

फेसबुकनं जेव्हा विकत घेतलं तेव्हा झुकरबर्गनं लागलीच एक गोष्ट केली. त्यानं लगेच व्हाटसॲपवर ‘फ्रॉम फेसबुक ‘अशी पाटी लावून दिली. अगदी पहिल्यापासूनच झुक्याला असा छपरीपणा करायची  सवय होतीच.

ज्या फेसबुकमुळं आज तो एवढा मोठा झाला आहे त्याचीही आयडिया त्यानं आपल्या हॉर्वर्डमधल्या मित्रांकडून चोरल्याचा आरोप झाला होता.

पण हे सगळं असताना आज फेसबुक, व्हाटसॲप, इंस्टाग्राम या टॉपच्या सोशल मीडिया साइडचा तो मालक आहे.

‘डेटा इज न्यू ऑइल’ या पॅरामीटरने जर श्रीमंती मोजली तर आज झुकरबर्गचा हात कुणी धरू शकणार नाही.

पण त्याच्या या श्रीमंतीवरही डाग आहे. तो म्हणजे लोकांचा डेटा त्यांच्या परवानगीशिवाय वापरून पैसा कमवणे. फेसबुकवरील लोकांचं ऑनलाइन ॲक्टिव्हिटी ट्रक करून त्यांना त्याच टाईपच्या जाहिराती देण्यास फेसबुकचा हात कोणी धरू शकत नाही. तुम्हा आम्हला मिळणाऱ्या फ्री फेसबुकचा नाद लावून मार्क झुकेरबर्ग असं करोडो छापतो.

झुकेरबर्गच्या पैसा कमावण्याच्या या मॉडेलमधून व्हाटसॲप पण सुटणार नाहीये. त्यामुळंच त्यांच्या फाउंडर्सना आता WhatsApp फेसबुकला विकल्याचा आता पश्चाताप होतोय. व्हाटसॲपचा माजी चीफ बिझनेस ऑफिसर नीरज अरोरा याने ट्विटरवर पोस्ट केलंय की २०१४ मध्ये फेसबुकला व्हाटसऍप विकण्याच्या वाटाघाटी करण्यात मदत केल्याबद्दल त्याला खेद वाटतोय.

या ट्विटमध्ये त्याने त्याला आणि इतर फाउंडर्सना पश्चाताप का होतोय याची डिटेल कारणं दिली आहेत.

व्हाटसॲपची स्थापना २००९ मध्ये जॅन कोम आणि ब्रायन ऍक्टन यांनी केली होती. 

त्यानंतर अरोराने फेसबुकमध्ये २ वर्षे चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून काम केलं. तो सांगतो २०१३-१४ मध्ये देखील आम्हाला फेसबुककडून ऑफर आली होती मात्र त्यावेळी मात्र व्हाटसॲपच्या फाउंडर्सनी ती ऑफर नाकारली होती. 

फेसबुकने मग २०१४ मध्ये पुन्हा ऑफर दिली. 

यावेळी मात्र व्हाटसॲपवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन कायम राहील,त्यावर कोणत्याही जाहिराती नसतील, व्हाटसॲपच्या प्रोडक्टवर पूर्ण स्वतंत्र राहील आणि फाउंडर जॅन कोम साठी बोर्ड सीट या ऑफरसह झुकरबर्गनं ही डील आणली होती. 

शेवटी मग

१) मायनिंगसाठी व्हाटसॲपचा डेटा वापरला जाणार नाही 

२) व्हाटसॲपचं कोणतेही क्रॉस-प्लॅटफॉर्म ट्रॅकिंग  केले जाणार नाही

३) व्हाटसॲपवर कोणतीही जाहिरात दाखवली जाणार नाही 

या व्हाटसॲप फाउंडरच्या अटींवर फेसबुकच्या व्यवस्थापनाने पण सहमती दर्शवली.

आणि मग फेसबुकने व्हाटसऍप २२ बिलिअन डॉलरला विकत घेतलं.

मात्र त्यानंतर फेसबुकने आपले खरे रंग दाखवायला सुरवात केली. 

यासाठी आपल्याला २०१८ मध्ये जावं लागेल. जेव्हा फेसबुकचा सह संस्थापक असलेल्या ब्रायन ऍक्टन याने डिलिट फेसबुक ही मुव्हमेंट चालू केली होती. केम्ब्रिज ऍनालिटिका या कंपनीनं फेसबुकचा डेटा वापरून अमेरिकेतले इलेक्शन प्रवभावित करण्याची ती घटना होती. त्या घटनेनंतर ऍक्टनने ही चळवळ चालू केली होती. 

 त्याआधी ऍक्टन २०१७ मध्येच फेसबुकचा राजीनामा देउन बाहेर पडला होता. फेसबुकनं व्हाटसॲप द्वारे पैसे कमवण्याच्या आखलेल्या प्लॅनशी असलेली असहमती हे  ऍक्टन याच्या व्हाटसॲप सोडण्यामागील प्रमुख कारण होतं.

ऍक्टनचा प्लॅन होता की जर फेसबुकला पैसेच कमवायचे आहेत तर त्यांनी सरळ वापरकर्त्यांकडून  पैसे मागावेत. 

उदाहरणार्थ महिन्याला एक डॉलर. 

मात्र फेसबुकच्या मॅनेजमेंटचं म्हणणं होतं की लोकांना जर असे पैसे मागतले तर व्हाटसऍप तेवढं वाढणार नाही. तसेच स्नॅपचॅट सारखे ॲप जे झपाट्याने वाढत होते त्याचीही फेसबुकला भीती होती.मग फेसबुकच्या मॅनेजमेंटने आयडिया आणली जाहिरातींची. 

मग लोकांना कोणत्या जाहरिता दाखवण्यात याव्यात यासाठी लोकांचा डेटा माईन केला जाणार होता. लोकांचा डेटा माईन केला जातो म्हणजे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन धोक्यात येणार होतं आणि त्यामुळं युजर्सची प्राव्हसी धोक्यात येणार होती.

मात्र यासाठी फेसबूकला व्हाटसॲप विकत घेण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्या मोडाव्या लागणार होत्या. मात्र फेसबुककडे असणारी कायद्यातली आणि टेकनॉलॉजी मधली तज्ञ मंडळी यातून आरामात काहीतरी पळवाट शोधतील हे ऍक्टनने ओळखलं आणि त्याने मग फेसबुक सोडलं.

त्यानंतर फक्त प्रायव्हसी डोळ्यासमोर ठेवून ब्रायन ऍक्टनने सिग्नल हे ॲप काढला होतं. 

ब्रायन ऍक्टनची भीती आता खरी पण ठरली आहे. फेसबुकने मध्ये व्हाटसॲपवर जाहिराती आणण्याची घोषणा केली होती. मात्र ती नंतर मागे घेण्यात आली. त्यानंतर व्हाटसॲप बिझनेसद्वारे वापरकर्त्यांचा डेटा वापरायला सुरवात केली आहे आणि यामुळं भविष्यात व्हाटसॲपचा पूर्ण डेटाचा मॉनिटाईझ करण्यात फेसबुक कमी करणार नाही अशी भीती तज्ञ व्यक्त करतात.

आज व्हाटसॲप हे फेसबुकचं सर्वात मोठं प्रोडक्ट आहे. जगभरात ते नंबर एकचं मेसेजिंग ॲप आहे.

मात्र अरोरा याच्या म्हणण्यासानुसार आम्ही ज्यासाठी व्हाटसॲप काढलं होती किंवा भविष्यात जे त्यांचे व्हाटसॲपसाठी प्लॅन होते ते याहून हे खूप वेगळे आहे.

 म्ह्णूनच माझ्यासह बाकीच्या फाउंडर्सला देखील व्हाटसॲप फेसबुकला विकल्याचा पश्चाताप होतोय.  

त्यामुळं जे फाउंडर्स लोकांना मदत व्हावी म्ह्णून एखादं इनोव्हेशन करतात त्यांनी ते इनोव्हेशन बिझनेसमनला विकताना शंभरवेळा विचार केला पाहजे हेच या घटनेतून दिसून येतंय.

हे ही वाच 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.