खरंच मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंना सोडून जातील का ?

“उपमुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदन करण्यासाठी आपल्याकडे आलो होतो, त्याच दरम्यान मिलिंदजी आपल्याकडे गेले होते असं मला आदित्यजींकडून कळलं. कोण पुढच्या दारानं कोण मागच्या दारानं हेच माझ्या लक्षात राहिलं.” राज्यातल्या सत्तांतरानंतर झालेल्या विधानसभा अधिवेशनात बोलताना धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे स्पष्टीकरण दिलं आणि सगळ्या सभागृहात हशा पिकला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांच्या घेतलेल्या भेटीची मोठी बातमी झाली, पण मिलिंद नार्वेकर फडणवीसांना का भेटले हे कारण मात्र गुलदस्त्यातच राहिलं.

आता पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे, ते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या, ‘थापा गेले, आता मिलिंद नार्वेकर आमच्याकडे येतायत’ या विधानामुळं.

आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आता शिंदे गटात जाणार का या चर्चांना उधाण आलंय. पण उद्धव ठाकरेंची सावली, मातोश्रीवरचा सीसीटीव्ही अशी ओळख असणारे नार्वेकर सेनेला रामराम ठोकतील अशा चर्चा होण्यामागं नेमकी कारणं काय आहेत ? ठाकरे आणि नार्वेकरांमध्ये अंतर कसं पडत गेलं ? हे समजून खाली दिलेला व्हिडीओ पूर्ण पहा

Leave A Reply

Your email address will not be published.