प्रभाकर साईलमुळे एनसीबीची समीर वानखेडे अडचणीत येतील का?

प्रभाकर साईलमुळे एनसीबीची समीर वानखेडे अडचणीत येतील का?

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात रोज नवे-नवे खुलासे बाहेर पडत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचीचे प्रमुख विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची माल लावली असताना आत पुन्हा एकदा प्रभाकर साईलमुळे समीर वानखेडेच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

समीर वानखेडे अडचणीत आले ते प्रभाकर साईल आहेत तरी कोण?

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर एनसीसीबीचा मुख्य साक्षीदार असणारा किरण किरण गोसावी हा सर्वाधिक चर्चेत आला होता. एनसीबीच्या अधिकाऱ्या ऐवजी किरण गोसावी याने आर्यन खानाला पकडून एनसीबीच्या कार्यालयात आणले होते. आणि त्यानंतर सेल्फी काढून तो फोटो व्हायरल केला होता.

यावर एनसीबीने किरण गोसावी हा आपला अधिकारी नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. इथून पुढे खऱ्या वादाला सुरुवात झाली.

तसेच किरण गोसावी हा पुण्यातील एका गुन्हात पाहिजे असलेला आरोपी असल्याचे समोर आले होते. गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीस सुद्धा काढण्यात आली आहे. अशा वादग्रस्त व्यक्तीचा आपण बॉडीगार्ड असल्याचा डावा प्रभाकर साईल याने केला आहे. आपण किरण गोसावीकडे जुलै महिनापासून कामाला असल्याचे प्रभाकर साईल सांगितले आहे.

प्रभाकर साईल समीर वानखेडे यांच्यावर काय आरोप केले आहेत?

ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीने शाहरुख खानकडे २५ कोटींची मागणी केली, त्यात १८ कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा प्रभाकर साईल यांनी केला आहे.  प्रभाकर साईलने असे सांगितले की, एनसीबी रेडचे पंच क्रमांक १ म्हणून प्रभाकर साईल याची पंच म्हणून सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लँक होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलवलं आणि त्यानंतर साईल यांनी गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं.

समीर वानखेडे यांच्यावर साईल कशाच्या आधारावर आरोप करत आहे?

क्रुझवरील ड्रग्स पार्टीनंतर एनसीबीनी केलेल्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ताब्यात घेण्यात आले होते. ही कारवाई करतांना एनसीबीच्या कार्यालयात अधिकाऱ्या ऐवजी किरण गोसावी हा आर्यन सोबत उपस्थित असल्याचे फोटोवरून दिसून आले होते. याच वेळी प्रभाकर साईलने साईल यांनी गोसावीचा चोरून लपून एक व्हिडीओ शूट केला आहे. त्यात गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावलं असं दिसतंय.

हा फोन शाहरुख खानाला लावण्यात आला होता आणि यावेळी २५ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यावर १८ कोटींवर हे डील झाले. हे सर्व संभाषण मी ऐकल ऐकलं असून त्यात समीर वानखेडेंना ८ कोटी द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं, असा दावा देखील साईल यांनी केला आहे.

प्रभाकर साईल याने एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात घटनेच्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात किरण गोसावी सुरवातीपासूनच वानखेडेंसोबत होता. तसंच कशा प्रकारे आर्यन खानसह इतरांना पकडण्यात आलं. याची सर्व माहिती त्याने दिली आहे. किरण गोसावी अहमदाबावरून आल्यानंतर थेट मुंबई दाखल झाला. एनसीबीच्या कार्यालयातून ते क्रूझ ठिकाणी गेले. साडेदहा पावणे अकरा वाजता क्रूझमधील अनेकांना पकडण्यात आलं होतं. आर्यन खानही त्यात होता. त्याला वेगळं बसवण्यात आलं होतं. आणखी ७ ते ८ जण तिथे होते. मी यासर्वांचे आपल्या मोबाइलमध्ये गुपचूप फोटोही काढले. किरण गोसावी आर्यन खानला घेऊन एनसीबीच्या कार्यालयात गेले, असा दावा या प्रभारकर साईलने केला या व्हिडीओत केलाआहे.

पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून आपली सही कोऱ्या कागदांवर घेतली गेली. नऊ ते दहा कागदांवर आपल्या सह्या घेतल्या गेल्या. आपल्याकडून आधार कार्ड मागितल्यावर. पण ओरिजनल आधारकार्ड नसल्याने समीर वानखेडेंनी त्यांचा नंबर दिला आणि आपण आधार कार्ड व्हॉट्सअॅप केलं. त्यावेळी रात्री अडीच पावणे तीन वाजता आम्ही एनसीबीच्या कार्यालयातून खाली उतरलो.

त्यावेळी किरण गोसावीना सॅम नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. एनसीबी ऑफिसपासून ५०० मीटर अंतरावर एका डाव्याबाजूला त्यांची मिटींग झाली. मिटींगमध्ये त्यांची काहीतरी डील झाली, असं साईलने सांगितलं.

लोअर परळच्या ब्रीज खाली पहाटे साडेतीन पावणे चारच्या सुमारात सॅम, किरण गोसावी आणि एसआरकेची मॅनेजर होती. त्या तिघांमध्ये मिटिंग झाली. यानंतर त्यानी कारमधूनच आपल्याला फोन केला ‘२५ कोटींचा बॉण्ड’ करायला सांगितला. त्याती ल ८ कोटी समीर वानखेडेंना द्यायचेत आणि १० आपल्याला वाटायचे आहेत, असं ते म्हणाले.

पैशांसाठी आम्ही पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मंत्रालयासमोर रस्त्यावर थांबलो. पण न मिळाल्याने आम्ही वाशीला घरी निघून आलो. यानंतर काही वेळाने लगेच किरण गोसावीनी आपल्याला महालक्ष्मी स्टेशनजवळ ताडदेवजवळ इंडियाना हॉटेलजवळ थांबायला सांगितलं. यानुसार आपल्याला एका कारमधून ५० लाख रुपये घेण्यास सांगितलं. ५१०२ असा या कारचा क्रमांक होता, असा दावा साईलने केला आहे.

परत संध्याकाळी साडेचार वाजता गोसावीचा फोन आला. त्याने वाशी पुलाजवळ बोलावलं. त्यानंतर इनॉर्बिट मॉलजवळ बोलावलं. त्यांनी आपल्या कारमधील पैशाची पिशवी दिली. सॅम नावाच्या व्यक्तीला चर्चगेटला ती परत देण्यास सांगितलं.

सॅमने पैसे मोजले तर ते ३८ लाख रुपयेच निघाले. यात ३८ लाख रुपये आहे, असं सॅमने सांगितलं. तर हे किरण गोसावींशी बोला. आपल्याला यातलं काही माहिती नाही. त्यांचं बोलणं झालं आणि किरण गोसावीनी बाकिचे पैसे दोन दिवसात देतो असं सांगितलं. यानंतर किरण गोसांच्या पुण्यातील प्रकरणाचे व्हिडिओ आपण बघितले, असं दावा साईलने केला आहे.

एक व्हिडिओ जारी करून प्रभाकर साईल याने हा दावा केला आहे. सामीर वानखेडेंची आपल्याला भीती वाटतेय. कारण पत्नीला पोलिसांचे चौकशीसाठी फोन आले होते. तिने आपल्याला हे सांगितलं. यामुळे कुटुंबाला काही झालं, तर मी कुणासाठी जगायचं. म्हणून मी हा व्हिडिओ जारी केलाय. यामर्फत सर्वांना सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रभारकर साईलने म्हटलं आहे.

इतके दिवस तू गप्प का होता असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर साईलने सांगितलं की,

माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूर येथे १० ते १२ दिवस राहिलो. असा दावा साईल ने केला आहे. यावर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली असून योग्य वेळी उत्तर देणारं असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.