शून्य भांडवलावर किताबवाला सुरू केलं, गेल्या वर्षभरात २० हजाराहून अधिक पुस्तके विकली
कविता, कहानियाँ, किस्से लाया हूं..
यादों के पन्ने बाँटने मैं किताबवाला आया हूं..
दोनवर्षांपूर्वी लॉकडाऊन लागलं. अनेक उद्योग-व्यवसायांना फटका बसला. सगळीकडेच निराशेचं वातावरण पसरलेलं. अशा वातावरणात एक पोरगा उठतो, नवीन व्यवसाय करण्याची हिंमत दाखवतो आणि वर्षभरात तो यशस्वीरित्या स्वतःला सिद्ध करतो. अविश्वसनीय वाटावं अशी वाटचाल करणाऱ्या पुण्यातल्या एका तरुणाची ही ‘सक्सेस स्टोरी’..
संपूर्ण महाराष्ट्रात ‘किताबवाला’ या नावाने सुप्रसिद्ध असणाऱ्या सिद्धार्थ शेलारची ही गोष्ट आहे.
मागच्या वर्षी आलेल्या कोरोनाने संपूर्ण राहणीमानच कोलमडून पडले. दोन-दोन महिने सर्वांना सक्तीने घरात बसावं लागलं. याच काळात लोकांच्या हाती पुन्हा एकदा पुस्तके पडली. धकाधकीच्या जीवनात पुस्तक वाचायला वेळ मिळत नसल्यामुळे कित्येकांची ही आवड मागे पडली होती. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांना ही संधी पुन्हा चालून आली.
पुस्तकांना मागणी वाढू लागली. अशातच, सिद्धार्थने या व्यवसायाकडे लक्ष वळवले. गडकिल्ले संवर्धन चळवळीत खंबीरपणे कार्य करणाऱ्या सिद्धार्थला आधीपासूनच पुस्तक वाचण्याची आवड होती. त्यातच, सोबतच्या मित्रांचेही पुस्तके लवकरच प्रकाशित होणार होती.
लॉकडाऊनमुळे त्याच्याही व्यवसायाला फटका बसला. मित्रांसोबत चर्चा व्हायच्या. यातूनच त्याला पुस्तक विक्रेता म्हणजे ‘Distributor’ बनण्याची कल्पना सुचली.
९ ऑगस्ट २०२१ या दिवशी त्याने या नवीन व्यवसायाचा प्रारंभ केला.
सुरुवातीला शरद तांदळे लिखित ‘रावण : राजा राक्षसांचा’ या कादंबरीच्या पुस्तक वितरणाची जबाबदारी त्याच्याकडे होती. अतिशय कमी वेळातच त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. एक-एक करत त्याच्याकडे पहिल्या तीन महिन्यात पाच-सहा टायटल्स विक्रीसाठी उपलब्ध झाले.
सोशल मीडियाला आधुनिक जगातील एक क्रांतीच म्हणलं पाहिजे. या सोशल मीडियावर असलेला आपला संपर्क आणि मित्रपरिवार याची सांगड घालत सिद्धार्थने व्यवसायात अतिशय भक्कमपणे पदार्पण केले आणि अविश्वसनीयरित्या स्वतःला सिद्ध करून दाखवले.
या व्यवसायात उडी मारण्याआधी बऱ्याच मित्रांनी या रस्त्याला न जाण्याचा सल्ला दिला. हल्लीच्या जमान्यात कोण एवढी पुस्तके वाचत किंवा विकत घेतंय? असा चिंतायुक्त प्रश्न त्यांना भेडसावत होता. पण मित्रांची साथ आणि स्वतःची मेहनत यावर सिद्धार्थ ला पूर्ण विश्वास होता. त्यातच त्याचे मित्रसुद्धा दमदार लेखक होते. ज्यात शरद तांदळे, प्रकाश कोयाडे, अभिषेक कुंभार, स्वप्नील कोलते पाटील, केतन पुरी यांची नावे प्रमुख्याने घेता येतील.
रावण, प्रतिपश्चंद्र, द आंत्र्यप्रन्योर या पुस्तकांसाठी त्याच्याकडे जबरदस्त मागणी होती. यात अजून एका पुस्तकाची भर पडली, ती म्हणजे स्वप्नील कोलते पाटील लिखित ‘मुकद्दर’ पुस्तकाची..
नवीन व्यवसाय सुरू केल्याच्या अवघ्या सहा महिन्यातच सिद्धार्थ तुफान वेगाने पुस्तकाच्या दुनियेत दौडू लागला.
‘रावण’ या पुस्तकावरून सुरू झालेला सिद्धार्थ चा प्रवास आज तब्बल 100 पेक्षा जास्त पुस्तकांच्या घरात जाऊन पोचलाय.. ‘न्यू इरा पब्लिशिंग हाऊस’ या प्रकाशनसंस्थेने फुटलेले व्यवसायाचे नारळ आज पार्श्व प्रकाशन, ऋचित प्रकाशन, ग्रंथाली प्रकाशन, मेहता पब्लिशिंग हाऊस, रोहन प्रकाशन, पुरंदरे प्रकाशन यांसारख्या मातब्बर प्रकाशन संस्थांचा विक्रेता म्हणून तो महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांमध्ये प्रसिद्ध झालाय. मित्रांच्या साथीने आणि जिद्दीच्या जोरावर आज संपूर्ण महाराष्ट्रात ‘किताबवाला’ पुस्तकांची घरपोच विक्री करतोय.
कोरोनासारख्या नकारात्मक वातावरणात सुद्धा परिस्थितीशी झगडत सिद्धार्थ सारख्या तरुणाने व्यवसायात यश मिळवले. गेल्या दिड दोन वर्षात त्याने शून्य भांडवलामध्ये सुमारे २० हजाराहून अधिक पुस्तके विकली आहेत
आज तो एक सक्षम आणि सर्वात उत्तम पुस्तक विक्रेत्यांपैकी एक म्हणून सुप्रसिद्ध झालाय. सिद्धार्थसारखे तरुण आज या समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत.. त्याच्या मेहनतीला आणि सकारात्मकतेला सलाम.
तर मित्रांनो, तुम्हालासुद्धा कोणतं पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर आपल्या एक फोन करायचा आणि निवांत बसायचं..
सिद्धार्थ शेलार – 9921982828
हे ही वाच भिडू…
- कोरोनाच्या काळाला संधी मानली आणि स्वतः च हेल्थकेअर स्टार्टअप सुरू केल
- थेट घरपोच मटण मासे पुरवून कंपनी वर्षाला ४२० कोटींचा गल्ला करतेय
- पुरस्कार जिंकले, पुस्तकं लिहिली पण गडी लॉकडाऊनमध्ये भारतीयांचं पोट भरायला विसरला नाही