सगळं जग एका बाजूला आणि CD100 एका बाजूला ; हेच खरं आयुष्य होतं…

८० च्या दशकात गावातली पाटलाकडे, सरकारी नोकरी असणाऱ्यांकडे काही ठराविक गाड्या असायच्या. त्यात कावासाकी बजाज आर टी झेड, बुलेट, आर एक्स १००, यामाहा ३५० आणि येझदी सारख्या बाईक होत्या. तर त्यापूर्वी पासून बजाज स्कुटर हे फॅमिली बाईक बनली होती.

फ्लॅशबॅक मध्ये जाऊन मागच्या १० वर्षांपूर्वीचे रस्ते आठवून बघा. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती सगळ्या भारतात होती. त्यातही या बाईक सुसाट पाळायच्या.  

या सगळ्या बाईक मध्ये एक साम्य होतं. ते म्हणजे या बाईकचे इंजिन हे टु स्ट्रोक इंजिन होते. या बाईक ताकतवान होत्या. वाडी, वस्ती, डोंगरावर कुठंही न्या मागे येत नव्हत्या. 

आताही रस्त्यावर जातांना आरएक्स १०० दिसली की तिच्यात असणाऱ्या ताकतीची जाणीव होते. तेव्हा पण आता सारखाच एक प्रश्न विचारला जायचा ‘कितना देती है’. या विषयात या सगळ्या गड्यांना माघार घ्यावी लागायची. यांचे एव्हरेज कमी होते. 

ही गरज ओळखली हिरो होंडाने. 

१९८३ मध्ये हिरो कंपनीने जपानच्या होंडा कंपनी सोबत करार केला आणि हिरो होंडा कंपनी स्थापन झाली. या कंपनीची पहिली बाईक होती हिरो होंडा सीडी १००. पुढे जाऊन २०१० मध्ये दोन्ही कंपन्या वेगेळ्या झाल्या. मात्र, त्यापूर्वीच जगातील सगळ्यात जास्त बाईक विकणारी करणारी कंपनी म्हणून ओळख जाऊ लागली होती. 

१९८५ ला सीडी १०० बाजारात आणली.

ही साधी बाईक होती. चोकोनी आकाराचे हेड लाईट, मोनोलॉग स्पीडो मीटर, तीन जण आरामात बसू शकतील अशी सीट, वजनाने हलकी, स्पोक व्हील असणारी अशी साधी सुधी बाईक होती. मात्र इतर बाईक पासून सीडी १०० ला वेगळं बनविणारे होत तिचं इंजिन. बाईकचे इंजिन ९६ सीसी ४ स्ट्रोक होते. 

कंपनीला एक गोष्ट कळाली होती. इथली पब्लिक कितना देती है विचारणारी आहे. आणि सीडी १०० ची हीच खरी ओळख होती. टाकी फुल करा, सुरु करा आणि सगळं काही विसरा अशी जाहिरात हिरो होंडा  कंपनीकडून करण्यात येऊ लागली. 

सोबतीला जाहिरातीत सलमान खान होता. 

सलमान खानने अजून फिल्म इंडस्ट्री मध्ये इंट्री बाकी होती. मात्र त्याने यापूर्वी कॅम्पा कोला आणि अजून काही जाहिरात केल्या होत्या. त्यामुळे सलमान खानचं वलय तयार झालं होत. सीडी १०० ची जाहिरात सलमान खान झळकला आणि ही बाईक एका रात्री  सगळ्यांची आवडती झाली.   

तर टीव्हीवरची दुसरी जाहिरातीत ही एकदम साधी होती. त्यात सलमान आणि दुसरा एक मॉडेल होता. पोरींना इम्प्रेस करण्यासाठी शहरात झाक्यां मारत फिरतांना दाखवलं होत. सलमान खान म्हणतो, हिरो होंडा सीडी १०० सर्वोत्तम बाईक आहे, फक्त त्यावर नजर टाकणे आवश्यक आहे. तर दुसरा मॉडेल म्हणतो ही बाईक चालवतोय मला त्याचा अभिमान आहे. 

या जाहिरातीचा मुख्य उद्देश हा तरुण आणि मध्यमवर्गीयांना एकाच वेळी आकर्षित करण्याचा.

जाहिरातीत सन्नी आणि बन्नी नावाचे दोन पात्रे दाखविण्यात आली होती. एक ऑफिस मध्ये जाणारा आणि दुसरा कॉलेज मधला तरुण.  सलमान खान सूट आणि टाय घातला होता तर दुसऱ्या मॉडेल ने टी शर्ट घातला होता. ही संपूर्ण ऍड इंग्लिश मध्ये होती.   

तरुण आणि ऑफिस मध्ये जाणाऱ्यांसाठी ही बाईक कशी भारी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला होता. पुढे ही जाहिरात फार फेमस झाली.  

२००२ मध्ये हिरो होंडा कंपनी जगातील सर्वाधिक बाईक विकणारी कंपनी बनली होती. त्यात सीडी १०० आणि स्प्लेंडरचा मोठा वाटा होता. 

त्याकाळात इतर कंपन्यांच्या बाईक ५० ते ६० किलोमीटरचं एव्हरेज देत होत्या. अशावेळी सीडी १०० एक लिटर मध्ये ८० किलोमीटर धावत होती. याला काही जण तर काळी जादू म्हणू लागले होते. चालवायला एकदम मक्खन असल्याने लवकरच ही गाडी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचली. 

अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ही बाईक कधी ओव्हरफ्लो होऊन बंद पडली नाही. इतर बाईक पेक्षा मेंटेनंस सुद्धा कमी होता. त्यामुळे २० वर्ष हा बाईकने भारतीयांच्या मनावर राज्य केलं. २००४ मध्ये ही बाईक हिरो होंडा ने बंद केली.       

मात्र भारतातील सगळ्या बाईक ना सीडी १०० नंतरच ४ स्ट्रोक इंजिन बसविण्यात येऊ लागले. अजूनही २०-२२ वर्ष जुन्या CD 100 फुलराणी सारखी रस्त्यावर दिमाखात धावतांना दिसते.    

हे ही वाच भिडू       

Leave A Reply

Your email address will not be published.