महिलांना उद्योग उभा करण्यासाठी या सात ठिकाणाहून आर्थिक मदत मिळू शकते.

कोणत्याही राज्याच्या सर्वांगिण विकासाचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा महिला सक्षमीकरण हा महत्वाचा भाग असतो. महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय सर्वांगिण विकासाची व्याख्या करता येत नाही. 

आज महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण देशभरात महिला विविध क्षेत्रात नाव गाजवत आहेत. घरी बसणाऱ्या महिला उद्योग व्यवसाय उभा करून बिझनेसवूमन होत आहेत. मात्र अनेकदा अडचण असते ती पैशांची. कित्येक आयडीया मनात असतात पण सुरवात म्हणून लागणारे भांडवल उभा करण्याऐवढे पैसे महिलांकडे नसतात. 

म्हणूनच “बोल भिडूच्या” माध्यमातून आम्ही तुम्हाला अशी आठ ठिकाणे सांगत आहोत जिथून आपल्या उद्योग व्यवसायासाठी तूम्ही आर्थिक मदत मिळवू शकता. 

अन्नपुर्णा स्कीम : 

केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या, करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी ही स्कीम आहे. यात भारत सरकार ५० हजारांपर्यन्त कर्ज देते. ही रक्कम तुम्ही केटरिंगच्या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी वापरू शकता. तीन वर्षांचे अर्थात ३६ महिन्यांचे हफ्ते करून हे पैसे तुम्ही परत करू शकता. सर्वसाधारण कर्जाच्या व्याजदराहून या स्कीममधून तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळते. सध्या भारतीय महिला बॅंक आणि स्टेट बॅंक मधून या स्कीमअंतर्गत कर्जपुरवठा होत असून लवकरच स्टेट बॅंक ऑफ इंडियामार्फत अन्नपुर्णा स्कीमअंतर्गत कर्जपुरवठा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. 

स्त्री शक्ति पॅकेज: 

स्टेट बॅंक ऑफ इंडियामार्फत महिला सबलिकरणाच्या हेतून महिला उद्योगांना कर्जामध्ये सुट देण्यात येत. ज्या उद्योगामध्ये महिलांच्या नावाने ५० टक्याहून अधिक शेअर्स आहेत अशा लघु उद्योगांना कर्जामध्ये सूट देण्यात येते. तसेच छोट्या उद्योगांसाठी ५ लाख रुपयांपर्यन्तच्या कर्जाला कोणत्याही गॅंरेटीची गरज लागत नाही. 

सेंट कल्याणी स्कीम:

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या या स्कीमनुसार जून्या आणि नव्या उद्योग व्यवसायासाठी अप्लाय करू शकतात. यामध्ये फूड प्रोसेंसिंग, कपडे व्यवसाय, ब्युटी कॅंन्टिन, मोबाईल दुकान, रेस्टॉरंट, झेरॉक्स मशीन अशा अनेक व्यवसायांचा समावेश आहे. 

या स्कीमअंतर्गत २० टक्के मार्जिन रेट नुसार १ कोटी रुपयांपर्यन्तचे कर्ज मिळू शकते. या कर्जासाठी कोणत्याही जामीनदाराची अथवा तारणाची गरज नसते. ७ वर्षांपर्यन्त कर्जाची मुदत असून व्याजदर मात्र मार्केट रेटनुसारच असतो. 

मुद्रा योजना :

प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत राष्ट्रीयकृत बॅंकेद्वारे दिल्या जाणाऱ्या या कर्जाअंतर्गत तुम्ही ब्यूटी पार्लर, टेलरिंग, ट्यूशन असे अनेक व्यवसाय करू शकता. या योजनेअंतर्गत ५० हजारांपासून ते ५० लाखांपर्यन्तचा कर्ज पुरवठा केला जातो. १० लाखांहून कमी कर्जासाठी कोणत्याही जामिनदाराची अथवा गॅंरेटीची आवश्यकता नसते. 

मुद्रा योजना ही अनेकदा वादात आली असून या योजनेबाबत अनेक तक्रारी आहे. त्यामुळे गरजू लोकांनी त्याबाबत स्थानिक बॅंक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करावी. 

महिला उद्योग निधी स्किम :

पंजाब नॅशनल बॅंक आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बॅंक ऑफ इंडिया (SIDBI) मार्फत महिलांनी उद्योग व्यवसाय सुरू करावे म्हणून ही स्कीम आहे. १० लाख रुपयांपर्यन्तच कर्ज या स्कीमअंतर्गत देण्यात येत. कर्ज परतफेड करण्याचा कालावधी देखील १० वर्षांचा देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ऑटो रिक्षा(महिलांसाठी) ब्यूटी पार्लर, टू व्हिलर (व्यावसायिक कामांसाठी) यांच्यासह अनेक उद्योगांसाठी कर्जपुरवठा केला जातो. 

ओरियंट महिला विकास योजना : 

ओरिंएटल बॅंक ऑफ कॉमर्स च्या स्किमनुसार बिझनेसमध्ये ५१ टक्यांहून अधिक मालकी असणाऱ्या महिलांना या स्कीमचा लाभ घेता येतो. या १० लाख रुपयांपासून ते २५ लाख रुपयांपर्यन्तचा फायदा या स्किमअंतर्गत मिळतो. सोबतच कोणत्याही तारणाची आवश्यकता नसते. कर्ज परतफेड करण्याचाी मुदत ही सात वर्षांची असते. सोबतच व्याजदरात २ टक्क्यांची कपात असते. 

भारतीय महिला बॅंक बिझनेस लोन : 

भारतीय महिला बॅंकेद्वारे सुरू करण्यात आलेली ही क्मी सध्या स्टे बॅंक ऑफ इंडियामार्फत राबवण्यात येते. मॅन्युफॅक्चर एंटरप्राईजेस साठी २० कोटी रुपयांपर्यन्तचे कर्ज देण्याची सोय या अंतर्गत करण्यात आली आहे.  

यासह स्थानिक बॅंकेत जावून आपण इतर सवलतींच्या कर्जाची चौकशी करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.