अशाही एक मुख्यमंत्री होत्या ज्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सायनाइड घेऊन फिरायच्या

आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली मजबूत पकड निर्माण केलीये. असं कुठलंच क्षेत्र नाही, जिथे महिला मागे नाहीत. अगदी राजकारणात सुद्धा, आमदार खासदारापासून ते पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी मजल मारलीये.

पण नाही म्हंटल तरी सुरक्षेचा प्रश्न हा आजही ऐरणीवर असतो. बलात्कार, विनयभंग अश्या कित्येक घटना आपण रोज ऐकतो किंवा वाचतो. ज्यावर अजूनही मात करू शकलेलो. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी महिलांनचं हातपाय हलवणं भाग आहे.

यातचं होत्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री यांचे आयुष्यही असेच होते. असं म्हणतात कि त्यात सोबत ‘सायनाइड’ घेऊन फिरायच्या.

आता अनेकांना वाटत असेल उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणजे मायवती. पण भिडूंनो त्याआधी सुचेता कृपलानी ह्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहून गेल्या आहेत.

सुचेता यांचा जन्म २५  जून १९०८ चा. हरियाणातील अंबाला हे त्यांचं जन्मगाव. सुचेताने इंद्रप्रस्थ आणि सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर बनारस विद्यापीठात इतिहास शिकवण्याची त्यांना संधी मिळाली. जवाहरलाल नेहरूंच्या ट्री विथ डेस्टिनी भाषणापूर्वी त्यांनीचं वंदे मातरम गायले होते.

पुढे १९३६ मध्ये जे.बी. कृपलानी अर्थात आचार्य कृपलानी यांच्याशी सुचेता यांचे लग्न केले, जे एक समाजवादी नेते होते.  लग्न झाल्यानंतर दोघांनी उत्तरप्रदेशात काम करायला सुरुवात केली.

सुचेता कृपलानी याही स्वातंत्र्यसैनिक होत्या. १९४२ मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला. नोआखली येथील दंगलीच्या वेळी त्यांनी महात्मा गांधींसोबतही मोर्चा काढल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर इंग्रजांविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल त्या अनेकदा तुरुंगाची हवाही खायला लागलीये.

१९५२ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाविरुद्ध निवडणूक लढवली होती.  मात्र त्यांनतर १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि काही वर्षातच पक्षात जम बसल्यानंतर  १९६३ ते १९६७ या काळात त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली.

दरम्यान, त्यांच्याबाबतीत एक गोष्टीचा उल्लेख आवर्जून केला जातो, तो म्हणजे असं म्हणतात कि, सुचेता कृपलानी यांच्या आयुष्यात एक वेळ अशीही आली जेव्हा त्यांना सायनाइड सोबत घेऊन फिरायला लागत होतं.

‘ग्रेट वुमन ऑफ मॉडर्न इंडिया’ नावाच्या पुस्तकात असा उल्लेख आहे. नोआखली येथील दंगलीच्या वेळी सुचेता कृपलानी यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हा त्यांना बऱ्याच ठिकाणी जायला लागायचंय. या दंगलींच्या वेळी मोठा हिंसाचार माजला होता. दंगलखोर महिलांसोबत खालच्या ठरला जाऊन वागत असे.

अश्यात सुचेता कृपलानी यांनाही ही भीती होती कि, आपल्यावर असा प्रसंग ओढवण्याआधी आपणच स्वतः निकाल लावलेला बरा. म्हणून सुचेता आपल्यासोबत नेहमी सायनाइड ठेवायच्या.  असं म्हणतात कि, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्यानंतरही ही असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात निर्माण व्हायची. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.