१९६२च्या चीन युद्धावेळी महिला होमगार्डच्या देखील हातात शस्त्रे देण्यात आली होती.

१९६२ सालच चीनविरुद्धच युद्ध म्हणजे भारतासाठी भलभळती जखम. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनला आपलं भाऊ मानलं. त्यांच्यावर विश्वास ठेवला पण चीनने त्यांचा विश्वासघात केला.

चीनच्या बाबतीत नेहरूंचे धोरण सपशेल फसले होते.

त्यांचे संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांनी चीनच्यालगतच्या सीमा रेषेवर सुरक्षा वाढवण्याकडे लक्षच दिल नाही.

याचंच परिणाम युद्धात झाला. तुटपुंज्या भारतीय लष्कराला चीनकडून मार सहन करावा लागला आणि माघार घ्यावी लागली.

आसामची सीमारेषा चीनच्या लगत आहे.

तेथे सुद्धा धुमसचक्री सुरू होती. आसामचे एक मोठे शहर असलेल्या तेजपुर येथून जवळपास 150 किलोमीटरवर असलेले बोमडीला हे गाव पडले.

२० नोव्हेंबर १९६२ रोजी पंडितजींनी रेडिओवर देशाला संबोधित करणारे भाषण केले.

मात्र या भाषणात नागरिकांचे मनोबल वाढवण्याऐवजी परिस्थिती हाताबाहेर चालली आहे याची निराशा होती.

संकट आपल्या तोंडावर येऊन पोहचला आहे हे कळताच तेजपुरच्या नागरिकांची गडबड उडाली.

खास रेल्वे पाठवून तिथल्या रहिवाशांना हलवण्यात आलं, स्टेट बँकेच्या तेजपुरच्या मॅनेजरने चिन्यांच्या हातात आपली करन्सी जाऊ नये म्हणून नोटा जाळून टाकल्या.

यापूर्वीच तेजपुरमध्ये मिलिटरी कॅम्प उभारण्यात आली होती. होमगार्डस ना सशास्त्रदलाचे ट्रेनिंग देण्यात आले. यात महिला देखील होत्या.

पण सुदैवाने चिनी सैनिकांनी ब्रम्हपुत्रा नदी ओलांडली नाही.

तत्पूर्वी २१ नोव्हेंबरला युद्ध विरामीची घोषणा करण्यात आली. आपला मानहानीकारक पराभव झाला होता.

चिनी सैन्याच संख्याबळ आपल्या पेक्षा जास्त होते. ५ डिसेंबर १९६२ रोजी खुद्द नेहरू तेजपुर दौच्यावर आले, त्यांच्या सोबत नवीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण सुद्धा होते.

यावेळी केलेल्या भाषणात ते म्हणाले,

“आज पासून फक्त जवानांनी नाही तर देशातल्या प्रत्येक महिला किंवा प्रत्येक पुरुष सैनिक होऊन देशाच रक्षण करायची जबाबदारी उचलायची आहे. “

भारतीय संरक्षण धोरणात मूलभूत बदलाचे सूतोवाच केले गेले आणि याची जबाबदारी यशवंतराव चव्हाणांच्याकडे सोपवण्यात आली.

संरक्षण दलाच्या आधुनिकतेबरोबरच होमगार्डसची देशभरातील संख्या दीड ते दोन लाख इतपत वाढवण्यात आली.

होमगार्डस उर्फ गृहरक्षक दल ही भारतातील एक सैनिकीसम स्वयंसेवी पोलीस संघटना. भारतीय पोलीस दलाला साहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे. १९४६ मध्ये मुंबईत जातीय दंग्यांनी थैमान घातले होते, त्यांचे शमन करण्याच्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापण्यात आली.

दंगलीसारख्या आणीबाणीच्या वेळी तसेच प्रशासकीय दृष्ट्या आव्हानपर प्रसंगी पोलीस दलावर वारंवार जबरदस्त ताण पडत असे. परिणामी, प्रशासनाला निमलष्करी दलांना स्थानिक पोलिसांच्या दिमतीला तैनात करावे लागत असे.

या साऱ्या परिस्थितीचा विचार करून अशांत व अस्थिर परिस्थितीत प्रशासकीय वा पोलिसी प्रयत्नांना जनतेचा सहभाग आणि प्रयत्नांची पण स्वयंसेवी स्वरूपातसाथ मिळावी,

या उद्देशाने मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या संघटनेची स्थापना केली.

ती प्रारंभी मुंबईत व त्यानंतर अहमदाबाद शहरात स्थापन झाली. हिलाच पुढे होमगार्ड वा गृहरक्षक दलाचे स्वरूप प्राप्त झाले.

पुढे नेहरूंनी ६ डिसेंबर १९६२ रोजी भारत-चीन यांतील या संघटनेची राष्ट्रीय स्तरावर पुनर्बांधणी करण्यात आली.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिलांच्या हातात बंदुका दिसू लागल्या. भारतीय नारी कोणत्याही बाबतीत पुरुषांच्या मागे नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या साठी आभाळ खुले झाले होते.

आजही कोणते संकट येऊ दे हे होमगार्डस सर्वांच्या बरोबरीने उभे राहतात. आतासुद्धा कोरोनाच्या काळात पोलीस दल, डॉक्टर्स यांच्या सोबत कोरोना योद्धा बनून हे होमगार्डस गावोगावी लढाई लढत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.