टिळकांनी लिहलेल्या मसुद्याच्या आधार घेऊनच वुड्रो विल्सन यांनी शांततेचे नोबेल मिळविलं

स्वतंत्र असणे हे किती महत्वाचे आहे हे आज आपल्याला लक्षात येणार नाही. त्यातून आपले किती नुकसान झाले याचाही आपल्याला अंदाज नाही. परंतु इतिहासाची पाने चाळल्यास आपल्याला अशा गोष्टी लक्षात येतील कि, भारतीयांच्यात गुणवत्ता असून देखील निव्वळ पारतंत्र्यात असल्यामुळे ज्या गोष्टींचे श्रेय आपल्याला मिळायला हवे होते ते आपल्याला मिळाले नाही.

उदाहरण बघायचं झालं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांना १९१९ साली नोबेल शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला.

‘लीग ऑफ नेशन’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. पहिल्या महायुद्धांनंतर झालेल्या भीषण परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी फ्रांस येथील पॅरिस मध्ये जगातल्या सर्व जबाबदार राष्ट्रांची बैठक आयोजित केली होती. 

इतिहासात ती ‘पॅरिस शांतता परिषद ‘ म्हणून ओळखली जाते. या परिषदेतूनच लीग ऑफ नेशन या पहिल्या जागतिक संघटनेचा जन्म झाला. अश्या प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये, जागतिक शांतता कायम राहावी आणि आंतराष्ट्रीय सहकार्य प्रस्थपित व्हावे हि उद्दिष्टे या स्थापनेमागची होती.

आता तुम्हीं म्हणाल भारताचे पारतंत्र्य आणि नोबेल पुरस्कार, वूड्रो विल्सन, पहिले महायुद्ध, शांतता परिषद, लीग ऑफ नेशन यांचा काय संबंध.

तर तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की भारत पारतंत्र्यात असून देखील भारताचे प्रतिनिधी या शांतता परिषदेत सहभागी होणार होते.अधिकृतरीत्या भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून सर एस. पी. सिन्हा आणि बिकानेरचे महाराज गंगा सिंग हे सहभागी झाले होते. परंतु यांच्याबरोबरच लोकमान्य टिळक, हसन इमाम आणि महात्मा गांधी देखील सहभागी होणार होते. परंतु ब्रिटिश सरकारने दोघांच्याही पारपत्राला मंजुरी दिली नाही त्यामुळे प्रत्यक्षरित्या त्याना या परिषदेत सहभागी होता आले नाही.

परंतु अशा परिस्थितीतही हार मानतील ते टिळक कसले. त्यांनी एडगर वेलास यांच्या वतीने आपला ऐतिहासिक असं ‘शांततेचा मसुदा ‘ परिषदेचे अध्यक्ष जॉर्ज कलेमानसो यांच्याकडे पाठवला आणि त्याची एक प्रत अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्याकडेही पाठवली.

जागतिक राजकारणात भारताची काय भूमिका असेल तेही यात विशद केले होते. म्हणजे एकीकडे स्वातंत्र्याची मागणी करून ती का मिळावी याचे देखील तीन कारणे टिळकांनी याच मसुद्याच्या आधारे दिले होते.

पहिले, टिळकांच्या मते भारताचे स्वातंत्र्य हे ब्रिटिशांच्याच हिताचं असून त्याच्याच साम्रज्याला बळकटी निर्माण करेल. भारत वसाहतीत टिकवून ठेवण्यासाठी ब्रिटिशाना जी ऊर्जा खर्च करावी लागते, ती जर ब्रिटिशांनी युरोपात खर्च केली तर त्याचा फायदा हा ब्रिटिश साम्राज्याचे जागितक राजकारणात स्थान आणखी मजबूत करण्यासाठी होईल. याचे आणखी एक कारण म्हणजे स्वतंत्र भारत हा जागतिक संघर्षापासून अलिप्त राहील आणि त्याचा एक प्रकारे ब्रिटिशानाच फायदा होईल.

२५ वर्षांनंतर नेहरूंनी मांडलेल्या अलिप्ततावादी धोरणाची बीजे लोकमान्यांच्या मसूदात आढळतात.
दुसरे, भारत जर स्वतंत्र झाला तर त्याच्या भोगोलिक वैशिष्ट्ये आणि साधनसंपत्ती मुळे जागतिक राजकारणाचे नेतृत्व त्याच्याकडे आपोआपच चालून येईल. भारताचे नेतृत्व हे असून त्यात साम्राज्यवादाचा आणि वसाहतवादाचा लवशेष हि असणार नाही. तसेच भारत स्वतःहून कधीही आपल्या सैन्यशक्तीचा वापर आपली शक्ती दाखवण्यासाठी करणार नाही.

१९५४ साली भारताने अवलंबलेल्या पंचशील धोरणाची मूळे आणि भारताचे आण्विक धोरणाचे प्रतिबिंब या मसुद्यात दिसून येतात.

तिसरा आणि महत्वाचा जो कि आजच्या काळात देखील खूप महत्वाचा आहे. आहे. टिळकांच्या मते भारताच जागतिक राजकारणातल यश हे भारत आपल्या विविधतेचे कशाप्रकारे संवर्धन आणि संरक्षण करतो यावर अवलम्बून असेल. याचे अनुषंगाने त्यांनी हिंदू-मुस्लिम वादाचे यशस्वी निराकरण करणे गरजेचे आहे अशी मांडणी केली होती. एक अर्थाने जेव्हा प्रश्न भारताचा जागतिक प्रतिमेचा असेल तेव्हा त्यांनी अंतर्गत प्रश्नाला दुय्यम लेखले होते.

याशिवाय लोकमान्यांनी भारत, जपान यासारख्या आशियाई एकत्र राष्ट्रांनी येऊन पाश्च्यात्त संस्कृतीचा सामना करण्याचे आव्हान केले. तसेच भारताच्या स्वयंनिर्णयाच्या हक्कांची मागणी करताना त्यांनी पाश्च्यात राष्ट्रांचा ढोंगी पणावर देखील बोट ठेवले. त्यासाठी त्यांनी युरोपीय राष्ट्राच्या आणि आफ्रिकन राष्ट्रांच्या स्वयं निर्णयाच्या हक्काची मागणी करतांना भारतास कसे डावलले जाते हे सोदाहरण स्पष्ट केले.

इतकेच नव्हे तर आयर्लंडच्या स्वयंनिर्णयवरच्या मागणीवर विचार मांडताना त्यांनी अमेरिकेच्या दुट्टप्पी धोरणावर देखील आपल्या अग्रलेखात कडाडून टीका केली.स्वदेशी सारखा आर्थिक विचार, स्वराज्य सारखी राजकीय संकल्पना आणि होमरूल सारखी भारताच्या स्वातंत्र्याची कल्पना या सर्वांचा आधारित हा शांततेचा मसुदा असून त्यांनी या परिषदेत ‘स्वयं-निर्णयाचा’ हक्काची  मागणी केली. 

स्वदेशी सारखा आर्थिक विचार, स्वराज्य सारखी राजकीय संकल्पना आणि होमरूल सारखी भारताच्या स्वातंत्र्याची कल्पना या सर्वांचा आधारित हा शांततेचा मसुदा असून त्यांनी या परिषदेत ‘स्वयं-निर्णयाचा’ हककाची मागणी केली.

 टिळकांच्या स्वयं-निर्णयाच्या ‘ हक्काच्या या मागणीचे महत्व इतके होते कि आपल्या चौदा मुद्यांमुळे प्रसिद्धीस आलेल्या वुड्रो विल्सन याना याच मागणीसाठी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आणि टिळक असो वा गांधीजी वा हसन इमाम त्यांच्या नशिबी मात्र कार्याचे ‘विस्मरण’.

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.