कामगार संपावर जातो म्हंटले अनं टाटांनी पगारासकट त्यांना पाठिंबा दिला

टाटा ग्रुप हा देशातला सगळ्यात मोठ्या आणि विस्तारलेल्या उद्यागांपैकी एक. टाटा कुटुंबातल्या अनेकांनी पिढ्यानी या समूहाचे नेतृत्व केलयं. सध्या ही सूत्र रतन टाटा यांच्या हातात आहेत. टाटा ग्रुप नेहमीच आत्मनिर्भर भारताचं उदाहरण मांडतो.  म्हणजे आज असं कोणतंच सेक्टर नाहीये, जिथे टाटा उतरलं नाही. बरं इतक्या सगळ्या सेक्टरमध्ये काम करतेय म्हंटल्यावर ग्रुपचं इनकम सुद्धा भरभक्कम आहे.  पण तरी सुद्धा  श्रीमंत लोकांच्या यादीत टाटा नेहमीच बँकफूट राहिलेत.

आता यामागचं कारण तर सगळ्यांनाच माहितेय. म्हणजे असं म्हणतात कि, टाटा ग्रुप आपल्या इनकम मधला मोठा भाग हा चॅरिटीसाठी देत असतो. त्यामुळेच भसघोस कमाई असून सुद्धा टाटा श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या १० मध्ये सुद्धा पोहोचू शकले नाहीत.

याच उदाहरण आपल्याला कोरोनामध्ये पाहायला मिळाली. वाढत्या रुग्णांचा आकडा पाहता जेव्हा रुग्णालयात बेडची कमतरता जाणवत होती, त्यावेळी टाटा ग्रुपने आपली कंपनीचं दवाखान्यात बदलली होती. एवढंच नाही तर बाकीच्या रुग्णालयांमध्ये बेडमध्ये उपलब्ध करण्यापासून, ऑक्सिजन पुरवण्यापर्यंत सगळीच मदत टाटा ग्रुपने केलेली.

आता कोरोना काळातचं नाही तर याआधीही जेव्हा जेव्हा संकटाच्या काळात देशाला मदतीची  गरज असते , तेव्हा टाटा ग्रुप नेहमीच पुढाकार घेताना पाहायला मिळतो. अगदी स्वातंत्र्याआधीही… 

म्हणजे १९४२ सालचा एक किस्सा आहे. देशात स्वतंत्रलढ्याचे वारे वाहत होते. अनेक दिग्गज मंडळींपासून, सर्वसामान्यांपर्यंत तरुणांपासून महिलांपर्यंत सगळ्यांनीच स्वातंत्र्याचं बिगुल फुकलेलं. स्वातंत्र्य मिळवूनचं राहून असा विडा जणू काही सगळ्यांनीच उचलला होता. 

याचं स्वतंत्रलढ्यात टाटा ग्रुपच्या कामगारांनी सुद्धा भागं घेण्याचं ठरवलं. कारखान्यातील कामगारांनी आपला स्वातंत्र्याच्या चळवळीला  पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी संपावर जायचं ठरवलं.

आता कामगार संपावर जाणार आहे म्हंटल्यावर कुठलाही मालक त्याला विरोध करणारचं. कारण संपामूळं अख्ख काम खोळंबत आणि मोठ्या नुकसानीला सामोरं जायला लागतं.

आता सध्याचं उदाहरण घ्या ना, कित्येक दिवसांपासून एसटी कामगार संपावर आहेत. कामगारांना योग्य तो पगार मिळावा आणि एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करावं अशा मागण्या  कर्मचाऱ्यांनी लावून धरल्यात.

आता सरकारने त्यातल्या काही मागण्या मान्य केल्या.  पण विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अजूनही सरकार आणि कर्मचार्‍यांचे एकमत झालेले नाही त्यामुळे  कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे.

पण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला खूप मोठा फटका बसला.  थोडथोडकं नाही तर करोडो रुपयांचं नुकसान झालयं. त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आदेश दिले अन्यथा निलंबनाची कडक कारवाई करण्यात येईल, असही म्हटलयं.

असो….पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, त्यावेळी कामगारांच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी संपावर जाण्याच्या निर्णयाला जे.आर. डीं. टाटांचा फूल सपोर्ट होता. आणि ते सुद्धा पगारासकट. 

स्वातंत्र्यलढ्यासाठी कामगारांच्या या संपावेळी एम. एन. रॉय येथे होते. कामगारांच्या चळवळीचा त्यांचा गाढा अभ्यास. पण ते सुद्धा त्यावेळी चॅट पडले की, इथं कामगार संपावर चालले आणि मालक त्यांना पगार देऊन खुशाल जा असे सांगतायेत !

अर्थातच ही गोष्ट कामगार चळवळीच्या जगाच्या इतिहासात अपूर्व आहे.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.