या वेड्यांच्या इस्पितळात वेड्यांपेक्षा भूतचं जास्त असल्याचं म्हंटल जातं

मेंटल हॉस्पिटलची भीती कोणाला नाही वाटत ? सामान्य माणसापासून ते मनोरुग्ण असणाऱ्या लोकांना सुद्धा याची भीतीच वाटते.

पण अमेरिकेच सेंट्रल स्टेट हॉस्पिटल.. याची गोष्टच निराळी आहे.

असं म्हणतात इथं भूतं आहेत.

हे वेड्यांचं इस्पितळ अमेरिकेत जॉर्जिया इथं आहे. जगातलं सर्वात मोठ वेड्यांच आश्रयस्थान म्हणून या इस्पितळाची गणना केली जाते. पण इथं आता वेड्यांवर उपचार होत नाहीत. ते आता पर्यटनाचं केंद्र बनलंय. पण लोक इथे जायला घाबरतात कारण लोकांच असं म्हणणं आहे की इथं भुतं राहतात.

असं म्हणतात, एकेकाळी हे जगातल सर्वात मोठ वेड्यांचं इस्पितळ होतं. त्यानंतर हळूहळू तिथली वेड्यांची संख्या कमी होत गेली आणि या रुग्णालयाच्या अनेक इमारती भग्नावस्थेत बदलल्या. इथं अजूनही काही लोक आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या इस्पितळाचा वर्तमान जितका रंजक आहे, तितकाच त्याचा इतिहासही रंजक आहे.

ही गोष्ट सुरू होते १८४२ मध्ये. हे इस्पितळ १८४२ मध्ये बांधण्यात आलं. इथं एकाच वेळी १२ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले जायचे इतकं ते मोठं होत. मात्र, या इस्पितळात आलेल्या रुग्णांना अत्यंत अमानुष पद्धतीने उपचार दिले जायचे. त्यांना डांबून ठेवलं जायचं. मनोरुग्ण मुलांना लोखंडापासून बनवलेल्या पिंजऱ्यात ठेवल जायचं, तर प्रौढांना थंड पाण्याने, स्टीम बाथ करण्यास भाग पाडलं जात होतं.

याची परिणीती अशी झाली की, लोक घरी बरे होऊन जाणं लांबची गोष्ट लोक तिथंच जीव द्यायला लागले. जीव सोडा..लोक त्या डॉक्टरांनी दिलेल्या ट्रीटमेंटनेच मरायला लागले.

तब्बल २५ हजारांहून अधिक रुग्ण या इस्पितळात मेले. त्या लोकांना त्या इस्पितळाच्या आवारातच दफन करण्यात आल्याचेही एका अहवालात नमूद करण्यात आलयं. त्या रुग्णांच्या नावाच्या धातूपासून बनवलेल्या पाट्या तिथं पुरल्या आहेत.

पुढं हळुहळु या हॉस्पिटलची अवस्था बिकट झाली. इथ उपचार घेणाऱ्या लोकांची संख्या कमी होऊ लागली. शेवटी शेवटी तर सुमारे हजार एकर जागेत बांधलेल्या या रुग्णालयाच्या २०० हून अधिक रिकाम्या इमारतींमध्ये भुत पकडणारी लोक येऊ लागली. लोक म्हणतात की रिकाम्या इमारती पछाडलेल्या आहेत.

सध्या, या संपूर्ण रुग्णालयाच्या इमारतीचा एक छोटासा भागच सक्रिय आहे. इथं आज फक्त ३०० ते ३५० लोक उपचार घेत असावेत. आता उपचाराच्या पद्धती खूप बदलल्या आहेत. जानेवारी २०२० मध्ये हे इस्पितळ पर्यटनासाठी खुलं करण्यात आलं. आता पर्यटनासाठी सुद्धा लोक तिथं जातं नाहीत ही दुसरी गोष्ट. इस्पितळाच्या आवारात काळी कुत्री दिसतील एवढं मात्र नक्की.

टीप – बोल भिडू कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.