हा आहे जगातला सर्वात जूना बार.

दारू जितकी जूनी तितकी चांगली अस म्हणतात. युरोपात तर शे-पाचशे वर्षांपुर्वीची दारू मिळते म्हणे. आपला भाग देशीवाल्यांचा. सकाळी हातभट्टीची पहिल्या धारेची चांगली अस आपल्याकडच मत. म्हणजे हे दारू जितकी जुनी तितकी चांगली हे खूळ फॉरेनर लोकांनीच पेरलेलं आहे हे फिक्स.

असो, त्याच टेन्शन नाय. पण बोलभिडूवर विषय शोधत असताना मनात आलं जगातला सर्वात जूना बार कोणता असेल. मग गुगल केलं तेव्हा पोत्यानं दावे केलेल्या बारची नावं आली. बाहेरच जावुद्या पुण्यातले काही बार देखील आम्हीच सर्वात जुने आहेत म्हणून सांगत होते. मग जरा डिटेलमध्ये माहिती मिळवली तेव्हा कळलं, जगातला सर्वात जूना बार आयर्लंडमध्ये आहे.

बर इथपर्यन्त देखील विशेष नव्हतं, पण सर्वात चक्कीत जाळ करणारी माहिती अशी होती की हा बार तब्बल १,१०० वर्ष जूना आहे. किती तर अकराशे वर्ष जूना. म्हणजे इसवी सन ९०० च्या दरम्यान म्हणजेच दहाव्या शतकात या बारची स्थापना झाली.

हुर्र… बोलभिडूवाल्यांना चढली बहुतेक.

भावांनो चढली बिढली काय नाय. खरच अकराशे वर्ष जूना बार हा जगातला सर्वात जूना बार म्हणून ओळखला जातो. आणि यावर गिनीज बुकनं रितसर शिकामोर्तब केलय. आयर्लंडच्या शेनोन नदीच्या काठावर हा बार आहे. बाहेरुन सर्वसाधारण युरोपीयन बारसारखा दिसणारा हा बार म्हणजे जगातील सर्वात जूना बार आहे.

तर आत्ता आपण जावू इतिहासात.

कसय आयर्लंड हा पुर्णपणे हिवाळ्यातला देश. वर्षाचं तापमान २० डिग्रीच्या आतच राहतं. त्यामुळे लोकांना गरम व्हायची सवय. वातावरण जास्तच गार आहे, जरा जरा मारू म्हणून इथे सर्रास सगळेच पितात. बर थंडी इतकी असते की आपल्यासारखं पिवून गावभर शिव्या देत तर्राट होणारी माणसं इथे नसतात. शांतपणे प्यायचं आणि शांतपणे बसायचं असा नियम. त्यामुळे व्यसनाचे दुष्परिणाम सारखे निबंध इथल्या मुलांना लिहायला लागत नाहीत.

इसो तर विषय असा की. खूप खूप वर्षांपुर्वी वहाने नव्हती तेव्हा लोक घोडे वापरायचे. काहीजण पायीच प्रवास करायचे. तेव्हा ठिकठिकाणी मुक्कामाची ठिकाणे तयार झाली होती. एखाद्या ठिकाणी मुक्कामाला थांबल की तिथ दारू पित बसायचं असा नियम. कारणं देणारी थंडीच कारण द्यायचेच. पण अशा प्रकारामुळे एकूणच संपुर्ण युरोपमध्ये बारची संख्या चांगलीच वाढू लागली होती.

त्यातलाच पहिला बार म्हणजे हा, SEANS बार. 

सुरवातील या बारच नाव लुएेंस इन अस होतं. त्या काळात हा बार फुल्ल टू भरलेला असतायचा. एका व्यापाऱ्यानेच हा बार सुरू केल्याचे दाखले दिले जातात. गेल्या हजार वर्षात वेगवेगळ्या लोकांकडे या बारची मालकी येत गेली. प्रत्येक मालक नवं काहीतरी करत गेला. म्हणजे सुरवातीला चिखल आणि घोड्याचे केस वापरुन बांधलेल्या भिंती होत्या. आत्ता त्या प्रकारची एकच भिंत या बारमध्ये राहिली आहे. पण बारची जागा बदलली नाही, बदल झाला तो छोट्या मोठ्या गोष्टीत.

हिच ती जून्या बारची शिल्लक असलेली एकमेव भिंत

१९५० मध्ये हा बार शान नावाच्या माणसाने विकत घेतला तेव्हा पासून तो ‘शान्स बार’ म्हणून ओळाखला जावू लागला. याच काळात बार ने स्वत:च्या नावाने विस्की बनवण्यास सुरवात केली ती ही लोकप्रिय झाली.

पुढे हा बार अजून एका माणसाने विकत घेतला त्याचे ही नाव योगायोगाने शानच होते. शान्स बार आज आयर्लंड मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू बनला आहे. दूर दुरून लोक हा बार शोधात येतात. इथल्या मल्ट व्हिस्की, जीन, बीअरचा आस्वाद घेतात. आजही तिथे स्थानिक आयरीश संगीत चालूच असते.

आत्ता जगभरातले दारूडे किंग या ठिकाणी जाण्याच स्वप्न बघतात. मस्तपैकी जगातल्या सर्वात जून्या ठिकाणी दारू पिण्याचा आनंद घेत असतात. असो तुम्ही जाणार असाल तर जावू शकताच.

शक्य नसेल तर गालिब म्हणूनच गेला आहे की, 

जाहिद शराब पिने दे मस्चिद मैं बैंठकर

या फिर वो जगा बता दे जहां पर खुदा ना हो….. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.