अपयशापासून सुरू झालेल्या ब्रँडने जगभरात ‘वाव’ कामगिरी करून दाखवलीये
सौंदर्य प्रसाधने हे सध्या मोठं मार्केट झालं आहे. अगदी स्त्रिया, पुरुष ते लहान लेकरांना देखील विशिष्ट ब्रँडच्या कॉस्मेटिक्स उपयोगाला प्राधान्य दिलं जातं. अशात हर्बल, नॅचुरल एकंदरीतच नैसर्गिक वनस्पती, संसाधनांपासून तयार होणाऱ्या प्रोडक्टसला जास्त मागणी आहे. तेव्हा अशा ब्रँड्समध्ये स्वतःचं नाव केलंय ते ‘वाव स्किन सायन्स’ने.
२०१५ सालचं हे स्टार्टअप जे सुरुवातीला फक्त ५ प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणण्यापासून सुरुवात झाली होती आज ते जवळपास २०० स्किन आणि हेअर प्रोडक्ट्स विकत आहेत. त्यांचा खप इतका वाढलाय की अमेझॉनसारख्या ऑनलाइन खरेदी-विक्री ऍपवर ते टॉपचे ब्रँड म्हणून नावारूपाला आले आहेत.
मात्र अशा या ब्रँडची सुरुवात एका अपयशापासून झाली होती.
मनीष चौधरी नावाचा कार्यकर्ता. २०१५ पर्यंत तो आयटीचे प्रोडक्टस विकण्याचं काम करायचा. मात्र जेव्हा त्याला त्याच्या कंपनीची वाढ होत नाहीये हे लक्षात आलं तेव्हा त्याने स्वतःचं अपयश मानून जास्त वेळ घरच्या लोकांसोबत घालवणं सुरु केलं. अपयश जरी आलं होतं तरी निराशा नव्हती. काही तरी करून दाखवण्याची जिद्द कायम होती आणि याच जिद्दीपोटी ते अभ्यास करत होते.
मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे याचा शोध निरंतर चालू होता. अशात त्यांच्या लक्षात आलं की नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांना सध्या खुप मागणी आहे. त्यांनी याकडे लक्ष देण्याचं ठरवलं आणि तसं आपला भाऊ करण चौधरी याला सांगितलं. पण जर अक्ख्या भारताचं मार्केट ग्रॅब करण्याचा विचार असेल तर अजून मनुष्यबळ आणि डोकॅलिटी लढवणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज होती. तेव्हा त्यांची मदत घेतली आपल्या जिगरी मित्रांची. अश्विन आणि अरविंद सोक यांची.
चौघांनी मिळून एक मार्केट अनालीसिस सुरू केलं. यासाठी सुरुवातीला शॅम्पू बनवण्याचं ठरवलं.
मार्केटमध्ये अनेक ब्रँड्स आधीच होते, मग त्यात आपण काय वेगळं देऊ शकू की ज्याने ग्राहक अनेक ब्रँड्समधून फक्त आपलं प्रोडक्ट निवडेल, हा विचार करून त्यांनी शॅम्पू बनवण्याचं ठरवलं. मनीष यांनी जवळपास नऊ वेळा अमेरिकेचा दौरा केला फक्त फॉर्म्युला बनवणारे आणि सायंटिस्ट त्यांची भेट घेण्यासाठी. या दौऱ्याचं फळ स्वरूप तयार झाला लोकप्रिय सल्फेट आणि पॅराबेन्स-मुक्त ऍपल सायडर व्हिनेगर शॅम्पू.
त्याच दरम्यान ते इन्वेस्टर्सला देखील भेटत होते. मात्र इन्व्हेस्टर्स त्यांना ‘पागल’ म्हणून संबोधत होते, कारण आधीच प्रस्थापित बाजारात नव्याने शॅम्पू लॉन्च करण्यात काहीही फायदा होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र हे धाडस चौधरी आणि ग्रुपने केलं आणि बघता बघता वर्षभरातच वावच्या शॅम्पूने मार्केटवर अधिपत्य स्थापित केलं आणि कंपनीचा ‘हिरो प्रोडक्ट’ म्हणून नावारूपाला आला.
चौधरी यांचं म्हणणं आहे, तुमचा हिरो सापडणं ही पहिली स्टेप असते मग त्याची किंमत लावणे.
याच धोरणानुसार या कार्यकर्त्यांनी आधी हिरो तयार केला आणि जेव्हा त्याची किंमत ठरवण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी भारतीय लोकांच्या मागणीचा विचार केला. यावेळी इतर ब्रँड २०० एमएल शॅम्पू जवळपास १९०० च्या रेंजमध्ये विकत होते. अशात त्यांनी फक्त चारशे रुपयांमध्ये आपला शॅम्पू बाजारात आणला पण क्वालिटी एक नंबर ठेवली. हेच नेमकं त्यांच्या ग्राहकांच्या पसंतीस पडलं.
वावणे आधीपासूनच डिजिटल माध्यमाचा उपयोग विक्रीसाठी केला होता. कारण येणारा काळ ऑनलाइन असणार हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. एका शॅम्पूपासून सुरुवात झाली आणि हळूहळू त्यांना ग्राहकांकडून इतर प्रोडक्टसची मागणी होऊ लागली, तेव्हा त्यांनी फेसवॉश, मॉइश्चरायजर अशा इतर सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती सुरू केली. दरम्यान त्यांना अनेकदा इन्वेस्टर्सनी गळ घालत मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्याची संधी दिली मात्र या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे,
नेहमी तुमच्या ग्राहकांना ड्रायव्हर सीटवर असू द्या, इन्व्हेस्टर्सना नाही. कारण प्रॉडक्ट हेच पहिलं प्राधान्य असतं आणि त्यासाठी ग्राहकच हवे असतात.
केवळ चार वर्षांमध्ये वावणे अशी प्रगती केली की त्यांचा रेवेन्यू २०२० च्या आर्थिक वर्षाच्या शेवटापर्यंत ३४० करोडच्या पार गेला होता. ऑनलाईन विक्री सुरू केलेल्या या ब्रँडची मागणी वाढल्याने ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका अशापासून ते ऑफलाईन दुकानांमध्ये, मेडिकलमध्ये विक्रीला देखील सुरुवात झाली. आयुर्वेद आणि योगा जगाला दिलेल्या या भारताच्या वस्तुंना देखील ग्लोबल मार्केट मिळावं या विचाराने त्यांनी भारताच्या बाहेरही विक्री सुरू केली आणि आजच्या घडीला अमेरिके सहित इतर देशांतून वावच्या प्रोडक्टसना खूप मागणी आहे.
हे ही वाच भिडू :
- अनेक मिडल क्लास भिडूंच्या डोळ्यातलं स्वप्न कार्यकर्त्यांनी टिपलं आणि जन्म झाला कार्स २४ चा
- ४०० कोटीची उलाढाल करणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता शेतकरी भिडू….
- कॉपी करूनही कसं यशस्वी होता येतं याचं उदाहरण म्हणजे या ब्रँडचा मालक चीनचा स्टिव्ह जॉब्स