पहिलवान अब्राहम लिंकन..?
अब्राहम लिंकन.अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची आपल्याला ओळख. अमेरीकेमधली गुलामगिरी नष्ट करून निग्रोनां जगण्याचा अधिकार मिळवून देण्याच्या दिशेन पाहिलं पाऊल त्यांनी टाकलं. एक थोर विचारवंत म्हणून जगप्रसिद्ध.
पण जर तुम्हाला अब्राहम लिंकन हे महान कुस्ती पहिलवान होते असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ते पटेल काय ?
हो. अब्राहम लिंकन हे राजकरणात येण्यापूर्वी हौशी पहिलवान होते. इतकच नव्हे तर काही इतिहासतज्ञ असं म्हणतात,
की त्यांनी खेळलेल्या ३०० कुस्त्यांपैकी फक्त एकाच कुस्ती मध्ये त्यांना हार मिळाली होती, इतर २९९ कुस्ती सामन्यात लिंकन यांनी समोरच्या मल्लाला चीत केले होते.
वयाच्या विशीमध्ये अब्राहम लिंकननी आई वडिलांचे घर सोडले. पोटापाण्यासाठी धंदा शोधत तो इलिनॉय राज्यातल्या न्यू सालेम नावाच्या खेड्यात आला. तिथे त्याला एका जनरल स्टोअर मध्ये नोकरी मिळाली. नित्यनियमाने कामाला जायचं, प्रामाणिकपणे काम करायचं, वेळ मिळाल्यावर पुस्तक वाचायचं असा त्याचा दिनक्रम असे.
अब्राहमच रूढ अर्थाने शालेय शिक्षण झाल नव्हत. पण शाळेची पुस्तकं वाचून त्याने स्वतः स्वतःच आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेला होता.
अब्राहम लिंकन ची उंची ६ फुट ३ इंच अशी दांडगी होती. तब्येत सुद्धा तशीच कमावलेली.लहानपणी लाकुडतोड्याच काम केल्यामुळे हात सुद्धा तसेच राकट. स्टोअर मध्ये येणारा जाणारा प्रत्येकजण या धिप्पाड कामगाराकडे बघत असे. निवांत क्षणी कोपर्यात बसून काहीना काही वाचत बसलेला लिंकन वर काही लोकल टग्यांचे लक्ष गेले.
“क्लॅरीज ग्रूव्ह बॉईज ” नावाच्या या उडाणटप्पू पोरांच्या क्लबचा सरदार होता जॅक आर्मस्ट्रॉंग. एक दिवस या जॅक ने लिंकन ला कुस्तीचे आव्हान दिले. खर तर जॅक हा त्या भागातला नावाजलेला मल्ल होता.क्लब मध्ये कुस्ती खेळणे हा त्याच्या चरितार्थाचा भाग होता. तरी पडाकू शिष्ट वाटणाऱ्या लिंकन ला त्याने चॅलेंज त्याने दिले.
क्लॅरीज ग्रूव्ह बॉईज च्या रोजच्या शेरेबाजीला वैतागलेल्या अब्राहम ने त्याचं चॅलेंज स्वीकारलं. त्याच्या स्टोअर पुढे या दोघांची कुस्ती बघायला गर्दी जमली. नियमाप्रमाणे दोघांनी एकमेकाला शेकहँड केले आणि कुस्ती सुरु झाली. जॅकला जशी अपेक्षित होती तशी ही मॅच सोपी नव्हती. अब्राहम बराच चिवट होता.
कुस्तीचे कोणतेही प्रशिक्षण न घेता सुद्धा त्याला खेळाचे अंगभूत ज्ञान होते. जॅकची बराच वेळ दमछाक अब्राहम ने केली. तासभर चालेल्या या सामन्यात अखेर अब्राहम जिंकणार हे दिसू लागल्यावर जॅकच्या साथीदारांनी मध्ये धुड्कुस घालून सामना मध्येच रोखला.अब्राहमला चीटिंग करून हरवले.
हार कर भी जितने वाले को बाजीगर कहते है असं म्हणतात. अब्राहम लिंकनच सुद्धा तसंच झालं. खुद्द जॅक आर्मस्ट्रॉंगला ज्याला हरवायला चीटिंगचा सहारा घ्यावा लागला अशा लिंकनची चर्चा गावभर झाली. पुढे क्लॅरीज ग्रूव्ह बॉईज बरोबर सुद्धा त्याची दोस्ती झाली. त्यांच्या क्लब मध्ये तो नियमित कुस्ती खेळू लागला.
लिंकनच नाव न्यू सालेम मध्येच नव्हे तर आसपासच्या गावात सुद्धा फेमस झाले.
याचं त्याच्या प्रसिद्धीमुळे इलिनॉय राज्याच्या स्टेट असेंब्लीच्या निवडणुकीत तो उमेदवार म्हणून उभा राहिला. सुरवातीला राजकारणात त्याला यश मिळाले नाही. पण नंतर नंतर त्याने अमेरिकेतल्या राजकरणाच्या यशाच्या सगळ्या पायऱ्यावर संघर्ष करत विजय मिळवला आणि एक दिवस प्रेसिडेंटच्या खुर्चीवर जाऊन बसला.
मात्र त्याच्या राजकारणाचा पाया त्याची कुस्तीच होती.
१९९२ साली अब्राहम लिंकनचा समावेश अमेरिकेच्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या हाॅल ऑफ फेम मध्ये करण्यात आला. याचाच अर्थ अमेरिकेच्या महान पहिलवानांच्या यादीत त्याला मानाचं स्थान देण्यात आलं होत.
हे ही वाचा.
- अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, ज्यांना मारून भर चौकात टांगण्यात आलं होतं !
- रक्ताचा एकही थेंब न सांडता मार्टिन ल्युथर किंग यांनी हि लढाई जिंकली !
- बरं झालं दूसरं महायुद्ध झालं, त्यामुळेच तर बिकनीचा शोध लागला..
- हिटलर नसता, तर तुम्हाला आज फंटा प्यायला मिळाला नसता.