We Transfer वरती सरकारनं बंदी आणली, हे म्हणजे आधीच हौस त्यात पाऊस अस झालय.

मुंबई मिरर या वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली. यानुसार फाईल शेअरिंगसाठी सध्या वापरण्यात येणारी वेबसाईट we transfer बंद करण्यात आली आहे. सध्या फक्त एअरटेल द्वारे we transfer सुरू असून ते देखील लवकर बंद होईल अस सांगण्यात येत आहे.

आत्ता हाय का बोंबाललं सगळं…

बातमी देवून झाल्यावर आम्ही आमच्या मुळ मुद्यावर येतोय. कारण काय तर सगळं जग सध्या घरातून काम करतय. अशा वेळी we transfer हे जन्नत आहे. एक दिड जीबीची फाईल झटक्यात शेअर करण्यासाठी याहून दूसरा चांगला ऑप्शन नाहीए.

मग नक्की मॅटर काय आहे, सरकार फाटक्यात पाय का टाकायला लागलय हा प्रश्न पडणं साहजिक आहे.

तर सरकारनं we transfer वरती बंदी आणण्यासाठी सार्वजनिक हित आणि राष्ट्रीय सुरक्षेच कारण दिल आहे. आत्ता राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आला की सगळं काही माफ असतं. त्यामुळे या विषयाच्या खोलात जाण्यात काहीच अर्थ नाही. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपण झटाझट चायना ॲप डिलीट करत सुटलो असताना हे we transfer काय चिझय.

तर सखोल मॅटर असा आहे की,

१८ मे रोजी टेलिकॉम डिपार्टमेंन्टने देशभरातल्या इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्सना एका नोटीस दिली. यामध्ये we transfer चे URL बॅन करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार अनेक सर्विस प्रोव्हायडनी we transfer चे URL बॅन केले आहे.

आत्ता जे लोक या सगळ्यांपासून कोसो दूर आहेत त्यांच्यासाठी…

we transfer म्हणजे थोडक्यात ब्लू टूथ. ब्लू टूथनं कसं जवळं असणाऱ्या माणसाच्या मोबाईल मधून तुम्ही डेटा शेअर करुन घेता तसच we transfer ने इथून जगभरातल्या कुठल्याही व्यक्तीला डेटा ट्रान्सफर होतो. यासाठी ही वेबसाईट एका मध्यस्थी व्यक्तीप्रमाणे काम करते.

म्हणजे गुगलवर जायचं, we transfer टाकायचं. तिथ फाईल अपलोड करायचा ऑप्शन येतो. त्यावर क्लिक करुन 2 जिबी पर्यन्तची कुठलीही फाईल सिलेक्ट करायची आणि ज्याला पाठवायची आहे त्याला मेल आयडी टाकून द्यायचं सोडून. त्यानंतर सर्वात कष्टाचं काम म्हणजे किती टक्के डेटा सेंन्ड झालाय तो आकडा बघत बसायचं असतं.

समोरच्याचा मेलवर we transfer ची लिंक जाते, त्यावर क्लिक केलं की त्याला फाईल डाऊनलोड करून घेता येते. आत्ता गंम्मत म्हणजे हा सगळा प्रकार तुम्हाला आत्ता सांगणं म्हणजे मढ्याचं कौतुक केल्यासारखं आहे. मेल्यावर कौतुक करुन काय उपयोग.

मग मुद्याचं सांगितलं पायजे.

तर आत्ता we transfer सोडून आपल्याकडे काय पर्याय आहेत का?

समजा तुम्हाला we transfer चं वापरायचं असेल तर वर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क वापरून हा कार्यभाग साध्य करु शकता. त्यासाठी VPN सॉफ्टवेअर पाहीजेत व ते गुगलवर मिळून जातील.

हा उपाय अवघड वाटतं असेल तर

गुगल ड्राइव्ह आणि ड्राप बॉक्स सारख्या क्लाऊड सर्विसचा वापर करता येईल. एन्ड्राइड वाल्यांसाठी file mail सारखे ॲप आहेत. ते we transfer सारखच काम करतात. त्याचा वापर सध्या होवू शकतो. 

ही बंदी म्हणजे कसय माहिताय का,

आधीच हौस त्यात पाऊस.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.