‘ट्रिपल एच’ च्या सासऱ्याने WWE सुरू केलं होतं…

डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजे काय आहे हे सांगायची गरज नाही. अंडरटेकरचा चॉकस्लॅम, रेंडी ऑरटनचा आरकेओ, ब्रॉक लेसनरची सुप्लेक्स सिटी अशे सगळे मास्टर शॉट, एंट्रीला वाजणारे फटाके, लोकांचा जल्लोष, बेल्ट साठी भांडणारे खेळाडू हे प्रकरण सुरवातीला मजेदार वाटायचं पण नंतर हे wwe वाले इतके ओळखीचे झालेत की आपणच त्यातले एक आहोत असं वाटायचं.

अजूनही पहाटे पहाटे सुरू होणाऱ्या wwe च्या मॅचेस अनेक लोकं आवर्जून बघतात. इतका मोठा स्टारडम wwe ने मिळवला. आताच्या काळात wwe ओव्हररेटेड झालं असेल तरी जुन्या wwe फॅन्स साठी तो काळ म्हणजे सुवर्णकाळ होता.

इतकं भव्य दिव्य रूप wwe ला कसं आलं आणि मुख्य म्हणजे wwe सुरू कोणी केलं त्याबद्दल आज जाणून घेऊ.

विंस मॅकमोहन या भिडूने wwe जगासमोर आणलं. (सुरवातीला wwf होतं) विंस मॅकमोहन हे नाव ध्यानात येत नसेल तर ट्रिपल एचचा सासरा म्हणून जो म्हातारा चालू मॅचमध्ये येतो, ऑन द स्पॉट रुल बनवतो, मॅच बंद पाडतो, अचानक फायटिंग करायला लागतो. तो म्हणजे विंस मॅकमोहन.

सुरवातीला NWA नावाची कंपनी होती, ज्यात या मॅचेस व्हायच्या पण विंस मॅकमोहनचे वडील यांनी wwf नावाची कंपनी सुरू केली आणि त्यात नियम केला की यामध्ये खेळणारे सगळे फक्त फायटिंग रिलेटेडचं असतील, हा काळ होता 1970-80चा.

हॉल्क हॉगन हा पहिला फायटिंग स्टार होता पण त्याने हॉलिवूडच्या एका सिनेमात काम केलं आणि विंस मॅकमोहनच्या वडिलांनी त्याला काढून टाकलं. पुढे कंपनीची सूत्र आली ती विंस मॅकमोहनकडे. विंस हा महत्वकांक्षी होता, वडीलांपेक्षा जास्त डोकं तो चालवायचा. त्याने सगळ्यात अगोदर कंपनी आपल्या ताब्यात घेतली आणि फक्त ठराविक ठिकाणी नाहीतर जगभर हे wwe पसरवायचं त्याने ठरवलं.

त्याला हल्क हॉगनचं स्टारडम माहिती होतं त्याने पुन्हा त्याला आपल्या कंपनीत घेतलं आणि wwe जोरात सुरू झाली. हा त्याचा निर्णय मोठा मानला गेला कारण पुढची 10 वर्ष हॉगनहा wwe चा किंग होता.

पूर्ण देशभरात wwe चा धुरळा उडवायचा असा चंग विंस मॅकमोहनने बांधला होता. सगळ्यात अगोदर त्याने त्याचे विरोधी असणारे त्यांना गोडीत घेऊन आपलं प्रमोशन सुरू ठेवलं. NWA तेव्हा विंस मॅकमोहनला असे प्रकार करायला नकार देऊ लागली तेव्हा विंसने NWA शी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं आणि आपली कंपनी पुढे सुरूच ठेवली. विंसने ठरवलं की देशभर आपण टूर केली पाहिजे पण प्रमोशन साठी तितका पैसा कंपनीकडे नव्हता. मग यावर उपाय म्हणून एका नव्या इव्हेंटची निर्मिती झाली.

1980 सालचा तो इव्हेंट होता रेसलमेनिया. रेसलमेनिया इतका मोठा इव्हेंट पहिल्यांदा होत होता, फायटर लोकांनी कॉन्ट्रॅक्ट साइन करून मॅचेस खेळणं ही नवी संकल्पना होती. विंसने हॉलिवूडच्या स्टार लोकांकडून रेसलमेनियाचं प्रमोशन करून घेतलं आणि हा शो भयंकर हिट झाला. लाखो लोकांनी या शोसाठी मैदानात हजेरी लावली होती.

हा रेसलमेनिया चांगलाच चालला पण विंस मॅकमोहनने अजून एक शो आणला जो प्राईम टाइममध्ये सुरू करण्यात आला तोम्हणजे मंडे नाईट रॉ. अमेरिकेतल्या सगळ्या टिव्हीवर हा शो दिसू लागल्याने wwe ची क्रेझ लोकांमध्ये तुफ्फान वाढली होती.

ही कन्सेप्टचं वेगळी होती की प्राईम टाईमला रेसीलिंगचा शो एकाच वेळी दाखवण्यात येईल. मंडे नाईट रॉ मधून विंस मॅकमोहनने बरेच स्टार घडवले. पण पुन्हा हा शो काही काळ चालल्यावर एक अजून नविन शो आला 1990 ला तो म्हणजे स्मॅकडाऊन. या शो मुळे अंडरटेकर नावाचा जबरदस्त प्लेयर लोकांना बघायला मिळाला.

Wwe च्या काळात विंस मॅकमोहन वर आरोपही लावले होते की आपल्या फायद्यासाठी तो खेळाडूंना प्रोटीन खाऊ घालून त्यांच्या शरीराचं नुकसान करतोय वैगरे पण त्याचा फार फरक wwe वर पडला नाही.

2002 नंतर wwf चं wwe करण्यात आलं पण मालक हा विंस मॅकमोहनचं राहिला. वडिलांचं व्हिजन घेऊन आणि आपली बुद्धी वापरून विंस मॅकमोहनने कंपनी आशा प्रकारे वाढवली. आजही wwe चे फॅन कोटींच्या संख्येत आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.