WWE चा कर्दनकाळ असलेल्या उमागाचा शेवट इतका वाईट झाला की पाहायलाही कोणी आलं नव्हतं….

WWE हा आपला अतिशय जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे आता कितीजरी नावं ठेवली तरी एकेकाळी आपल्यासाठी खऱ्याखुऱ्या हाणामाऱ्या असण्याचा तो काळ. आताच WWE बघताना तो फिल नाहीए म्हणजे तेव्हा WWE बघून निदान पोरं उश्या घेऊन एकमेकांना बदडायचे पण आता ते सगळं इतिहासजमा झाल्यागत वाटतंय.

आता कोण नवीन WWE सुपरस्टार आलेत हे पण आपण लक्ष देऊन बघत नाही पण तेव्हाचे बरेचं सुपरस्टार आपल्याला अजूनही माहिती आहेत अंडरटेकर, द ग्रेट खली, बुगीमॅन, रेंडी ऑरटन, जॉन सीना, बटीस्टा, रे मेस्ट्रीयो, बिग शो असे बरेच जण होते पण यात एक होता…

उमागा

उमागाचं बलदंड,अवाढव्य शरीर, तोंडावर एक विचित्र पद्धतीने काढलेलं गोंदण असा हा उमागा होता. त्याची एन्ट्री पाहूनच समोरचा जागेवरच गारद व्हायचा. उमागाचं खरं नाव होतं एडवर्ड स्मिथ फाटू. उमागाचं सगळं खानदानचं WWE क्षेत्रात होतं. वडिलांपासून ते चुलते वैगरे सगळे रेसलर होते. 1995 साली उमागाने आपल्या काकासोबत WWE मध्ये पदार्पण केलं होतं. 1995 ते 2000 या काळात उमागा छोट्या मोठ्या रेसीलिंग मॅचेस खेळत होता पण खरं त्याचं करिअर बदललं ते म्हणजे 2001 साली.

आपल्या भावासोबत (रोझी) त्याने टीम बनवली आणि थायलंड बॉईज म्हणून ते पुढे आले. दोघा भावांनी भल्या भल्या रेसलर लोकांना चित करून हवा केली. दोघा भावांनी त्याकाळातल्या नामांकित चॅम्पियनशिप जिंकून राडा केला होता. जशी जशी ही दोन भावांची जोडी जिंकत होती तसं तसं त्यांना नवनवीन स्पॉन्सर मिळत होते.

दोघा भावांनी रेफ्रिपासून ते महिलांसकट सगळ्यांनाच चोपून काढायला सुरवात केली होती. 

Samoa असं पोटावर गोंदवून आलेला उमागा रिंगमध्ये चांगल्या चांगल्या रेसलर लोकांचा काळ बनून राहिला होता. उमागा WWE ला खरा गेम मानून खेळायचा आणि तो बेदम पहिलवान लोकांना तुडवायचा, त्याच्याविरुद्ध इतर लोकांच्या तक्रारी वाढू लागल्या. त्यामुळे WWE फेडरेशनने त्याला हाकलून लावायचा निर्णय घेतला. 

WWE मधून उमागाला काढून टाकण्यात आलं आणि त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आलं. उमागाचं खरं नाव हे जमाल होतं पण TNA मध्ये तो फायटिंगला आला तेव्हा त्याचं नाव उमागा झालं. TNA मधला धुमाकूळ पाहता 2005 साली WWE ने त्याला परत बोलावून घेतलं आणि कॉन्ट्रॅक्ट साइन केला. 2005 नंतर एडवर्ड फाटू, जमाल पासून उमागा हा त्याचा प्रवास सुरू झाला.

मरण्याच्या शेवटच्या वेळी जे दर्द होतं ना त्याला उमागा म्हणतात आणि तेच नाव उमागाने धारण केलं होतं. 

WWE स्टार रिफ्लेअरला उमागाने इतकं डेंजर हरवलं होतं की अजूनही WWE ची ती सगळ्यात भयानक मॅच मानली जाते. नंतर मात्र उमागाने जॉन सीना, ट्रिपल एच, शॉन मायकल अशा नामांकित सुपरस्टार लोकांना झोडपून अजूनच दहशत निर्माण केली. जेफ हार्डीला हरवून उमागाने चॅम्पियनशिपवर कबजा केला. त्याचा गळ्यात अंगठा मारण्याचा शॉट फेमस होता. तो शॉट इतका डेंजर असायचा की समोरचा थेट भोज्याला शिवून यायचा.

अमेरिकेचे माजी डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा WWE मध्ये मॅनेजर म्हणून ऍक्टिव्ह होते तेव्हा त्यांच्या एका पहिलवानाने उमागाला विंझी मॅकमनच्या एका कॉन्ट्रॅक्ट मॅचमध्ये हरवून लोकांना दाखवून दिलं की तो काय लेव्हलचा खेळाडू आहे.

यात डोनाल्ड ट्रम्प आणि त्याच्या पहिलवानाने विंझी मॅकमनचं भर स्टेजवर मुंडन केलं होतं ही मॅचचं उमागाच्या करिअरची शेवटची मॅच ठरली. WWE चे रुल मोडल्याने आणि CM पंक विरुद्ध हरल्याने उमागा WWE मधून बाहेर पडला.

4 डिसेंबर 2009 साली एका खोलीत अत्यंत दुर्दैवी अवस्थेत उमागाचा मृतदेह सापडला. नाकातून रक्त येत असल्याने घरच्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तोपर्यंत तो गेला होता. एकेकाळी WWE मध्ये सगळेजण टरकून असलेल्या उमागाला नंतर त्याच्या वाईट काळात कोणी पहायलाही आलं नाही. पण WWE मध्ये त्याने केलेले पराक्रम आजही अनेक लोकांच्या मनाला सुखावून जातात.

बालपण समृद्ध करणारा उमागा अजूनही लोकांच्या लक्षातून गेलेला नाही हीच त्याच्या जबऱ्या खेळाची पावती….!

हे हि वाच भिडू :

English Summary: WWE Superstar Umaga’s death is so hurtful for his fans. today also he is known as one of the best WWE superstars of all time.his finishing moves were so dangerous that no can was able to beat him.

Web title: WWE wrestling superstar Umaga’s death was so fearful.

 

Leave A Reply

Your email address will not be published.