जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्रपती बनले तर चीनमध्ये ते माओपेक्षाही मोठे ठरतील…

नेहमीच चर्चित असणाऱ्या देशांच्या यादीत चीनचं नाव आघाडीवर असतं. सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे असावं म्हणून काही ना काही कुरापती करणं हा त्यांच्या शेड्युलचा एक भाग असतो. आताही चीन चर्चेत आलंय ते आपल्या राष्ट्रपतींच्या निवडीवरून. 

चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या काँग्रेसच्या बैठकीकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. कारण ही  बैठक अत्यंत महत्वाची असते. याच बैठकीत निश्चित होईल कि कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व कोण करणार, कोण चीनच्या १ अब्ज ३० कोटी लोकांचा राष्ट्रपती म्हणून समोर येणार. कारण हीच व्यक्ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था चालवणार आहे, ज्याचा परिणाम पाहायला मिळतोच. 

त्यामुळे जिनपिंग तिसऱ्यांदा देशाचे राष्ट्रपती बनणार, का दुसऱ्याला संधी मिळणार असे प्रश्न सुद्धा तयार झाले आहेत.  

तर सगळ्यात आधी आपण चीनच्या राष्ट्रपती निवडीची प्रक्रिया समजून घेऊ. 

खरं तर चीनमध्ये एकाच पक्षाची म्हणजेच कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे. पण अध्यक्षपदासाठी म्हणजेच पक्षाच्या सरचिटणीसपदासाठी निवडणूक होत असते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सीपीसी देशभरातील प्रतिनिधींची नियुक्ती करते.  यानंतर पक्षाच्या सुमारे २,३०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत बीजिंगच्या ग्रेट हॉलमध्ये बैठक होते. 

CPC केंद्रीय समितीची निवड करते, ज्यात २०० सदस्य असतात. ही समिती पॉलिट ब्युरोची निवड करते आणि पॉलिट ब्युरो स्थायी समितीची. चीनच्या पॉलिट ब्युरोमध्ये सध्या २४ सदस्य आहेत, तर स्थायी समितीमध्ये सात सदस्य आहेत. पण सभासदांची संख्या बदलत राहते. या दोन्ही समित्या चीनमधील खरे धोरण निर्णय घेणार्‍या संस्था आहेत.

आता जरी चीनमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया असली, तरी हे नाव आधीच ठरलेलं असत. केंद्रीय समिती पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचीही निवड करते. ज्यांना कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस म्हंटलं जात. ते सीपीसीचेही सरचिटणीस असतात. आणि पुढे हाच व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होतो. जो पाच वर्ष कायम असतो. 

यावेळीही शी जिनपिंग यांची पक्षाच्या सरचिटणीस म्हणजेच अध्यक्षपदी निवड झाल्याचे मानले जातंय. त्यामुळेच तेच पुढच्या पाच वर्षांसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष राहणार असल्याचं बोललं जातंय. 

कारण, कम्युनिस्ट पक्षात जिनपिंग यांची स्थिती पहिली तर आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात जिनपिंग यांनी पक्षांतर्गत भाव जास्तचं वधारलाय. या ताकदीमुळे जिनपिंगला अनेक टायटल देखील मिळालेत. त्यांना चीनचा कोअर लीडर ही पदवीही देण्यात आली होती.  या पदवीमुले ते चीनचे महान नेते माओ त्से तुंग यांच्यासारख्या शक्तिशाली नेत्यांच्या पंक्तीत उभे राहिले. अर्थात काय तर जिनपिंग यांची तुलना थेट माओ यांच्याशी केली जातेय.  

 आता जर पुन्हा जिनपिंग यांना पक्षाचे सरचिटणीस घोषित केले तर तो कम्युनिस्ट पक्षामध्ये आणि चीनमध्येही नवा इतिहास ठरेल.  जिनपिंग तिसऱ्यांदा देशाचे राष्ट्रपती होणार आहेत. तशी त्यांची लोकप्रियता देखील अफाट आहे. 

जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीन जागतिक स्तरावर अनेक बाबींमध्ये स्पष्टपणे बोलला आहे.  यामध्ये विशेषतः दक्षिण चीन समुद्र आणि वन बेल्ट वन रोडचा विस्तार महत्त्वाचा आहे.  जिनपिंग यांच्या हाँगकाँग धोरणाबाबत, त्यांनी देशाबाहेर आणि चीनमध्येही त्यांची क्षमता सिद्ध केली.  विशेषत: हाँगकाँग आणि तैवानच्या मुद्द्यावर जिनपिंग यांच्या एकीकरणाच्या धोरणाबाबत देशात मोठा पाठिंबा आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील परिस्थितीत त्यांनी चीनला पर्यायी महासत्ता म्हणून स्वत:ला सादर केले आहे.

तसेच २०१२ मध्ये जेव्हा जिनपिंग पहिल्यांदा अध्यक्ष झाले तेव्हापासून भ्रष्टाचारविरोधी मोहीम प्रभावीपणे राबवली.  चीनमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दहा लाखांहून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

मात्र, जिनपिंग यांच्या या कृतीचा तीव्र निषेध करण्यात आला.  चीनमधील अनेकजण याकडे विरोधकांच्या विरोधात एक पाऊल म्हणूनही पाहतात.  चिनफिंगच्या नावाने आंदोलनही झाले.  त्यामुळे तेथील माध्यमांमध्येही चिनफिंगची प्रतिमा चमकली.  याच कारणांमुळे जिनपिंग यांना चीनमध्ये ‘शी दादा’ हे टोपणनावही दिले गेले.

आता जिनपिंग यांच्या निवडीचा भारतावर होणार परिणामही काही नवीन नसेल.कारण जिनपिंग यांची भारत विरोधी भूमिका आपल्याला गेल्या १० वर्षांपासून पाहायला मिळतच आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.