यहीं होता प्यार है क्या !!!

बऱ्याच दिवसांनी ‘नमस्ते लंडन’ हा चित्रपट पाहीला. कुठल्यातरी वाहिनीवर लागला होता. माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. का आवडतो असे विचारलं तर कधी नव्हे तर अक्षय कुमारने अभिनय वगैरे केलाय असे सांगेन. अर्थात त्याच्या एकंदरीत वकुबानुसार ह्याला चांगला अभिनय म्हटले पाहिजे. कथा जरा वेगळी होती (ढापली असेल तर म्हणेन नक्कल चांगली केली होती.) आणि विपुल शहाने दिग्दर्शन छान केले होते. तेव्हा तो जमिनीवर होता. नंतर त्याने काही भिक्कारडे चित्रपट बनवले. असो. या चित्रपटाला हिमेसभायने संगीत दिले होते. अर्थात बहुतांशी गाणीदेखील त्यानेच गायली होती. माझे प्रामाणिक मत आहे की हिमेस जर चड्डीत राहून हिरोगिरी न् करता आणि सगळी गाणी मीच गाणार असा हट्ट न धरता जगला असता तर पुढे गेला असता. निदान रिक्षावाल्यांचा तरी आर डी बर्मन झाला असता. आता ते कुणाला पटो वा ना पटो. हिमेसने सर्वोत्तम संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट असे मला वाटते.

या चित्रपटातील एक गाणे म्हणजे यही होता प्यार. मला ‘लिपसिंक’ गाणी फारशी आवडत नाहीत. ह्या गाणे ऐकायला तर मस्त आहे पण बघायला देखील मस्त वाटते.विपुल शहाने छान चित्रित केले आहे. ह्या गाण्याच्या दोन आवृत्या आहेत. एक जी चित्रपटात दिसते आणि दुसरी महफिल मिक्स.

गाण्याच्या सुरुवातीला कतरिना आणि अक्षय दिसतो.

कतरिना म्हणते…

’आय नो…मैंने तुम्हारे साथ बुरा किया. तुम शायद..जिंदगीभर मुझसे नफ़रत करो. लेकिन मैं ?

’ अक्षय तिला थांबवतो आणि थंडपणे म्हणतो,

‘मैं तुमसे नफ़रत नहीं करता. ना कर सकता हूँ और ना करूँगा. तुम्हे देखतेही मुझे तुमसे प्यार हो गया था और इसीलिए मैंने तुमसे शादी कि. हा, कुछ देर ऊपर तुमसे नफरत करने कि कोशिश कि लेकिन हुई नहीं. लेकिन जबरदस्ती तुम्हारा पती भी नहीं बनूँगा. और नाही हिम्मत हारूँगा. ना यहाँ से जाऊंगा. और जसमीत, तबतक नहीं जाऊँगा कि जबतक तुम और चार्ली एक दुसरे के साथ रहने कि कसम नहीं खाते. तब तक मैं तुम्हारा इंतजार करूंगा और उम्मीद करूंगा की तुम मेरे पास लौट के वापस आओ. पता है क्यूँ?’

एवढे बोलून पॉज घेतो जो बोलका असतो. त्यात एक आशेचा किरण असतो. आणि म्हणतो,

’ तुम्हे पहिली बार देखते ही मुझे तुमसे प्यार हो गया था.’ गाणे सुरु होते. कतरिना अचंबित होऊन त्याच्याकडे बघत असते. तिच्या मनात असेल, हा काय यडाबिडा आहे काय? माझे दुसऱ्यावर प्रेम आहे हे सांगूनसुद्धा हा मला प्रेमाच्या गोष्टी सुनावतोय.

जर मेहफिल मिक्स ऐकत असाल तर जावेद अख्तर म्हणतो,

नींद के बादलों के पीछे है…मुस्कराता हुआ कोई चेहरा…चेहरे पर बिखरी एक रेशमी लत…सरसराता हुआ कोई आँचल…और दो आँखे हैराँ हैराँसी….कतरिना त्याच्याकडे बघतेय आणि विचार करते आहे की हा कुठल्या मातीचा बनलाय. एवढे स्पष्टपणे सांगूनपण ह्याचे आपले एकच तुणतुणे! ती निघते.

हिमेस सुरु होतो….तेरा बनेगा वो जो तेरा नहीं है….अक्षय आपल्या वेड्या आशेवर हसतो…आणि म्हणतो…ऐ दिल बता क्यूँ तुझको…इतना यकीं है…तो तिकडेच आहे बघून कतरिना मागे फिरते. ती त्याला निघुया असे खुणावते. अक्षय पुढे गातो…मेरे दिल-ए-बेकरार…हाँ….दिल-ए-बेकरार…यहीं होता प्यार है क्या…पुढच्याच दृश्यात कतरिना केस सुकवताना दिसते…तिच्या रूमचा दरवाजा उघडा आहे. ती तो बंद करायला धावते. अक्षय बाहेर उभा आहे. तो तिला बघतो. पुढे होतो आणि दरवाजा बंद करून निघून जातो. तिला काही सुचत नाही. ती दरवाजा आडून पाठमोऱ्या अक्कीला बघत राहते. तिला हा अजून अगम्य वाटायला लागतो.

मेहफिल मिक्समध्ये जावेद अख्तर म्हणतो…नींद के बादलों के पीछे है….इक मुलाकात इक हसीं लम्हा…झील का ठहरा ठहरासा पानी…पेड़ पर चहचहाती एक चिड़िया…घास में खिलते नन्हे नन्हे फूल….खुबसूरत लबों पे नर्म सी बात….क्या बात है…इकडे अक्षय दिसतो…वनातून फिरताना….त्याला कतरीनाच दिसतेय जी नाहीय…सोबत बासरीचा आवाज घुमतोय…तो गातो…ख्वाबों में कोई क्यूँ है यूँ रहता…..ऐ दिल तू क्यू मुझसे है ये कहता…ह्यावेळी कतरिना चालतेय आणि तिची चप्पल तुटलीय. ती वैतागलीय. समोर बघते तर अक्षय येतोय. त्याचाही लोचा झालाय पण मस्तपैकी लेसने बुट धरून फिरवतोय. तिला बहुधा आपल्या खुजेपणाची जाणीव होते.

ती गाते..वो मेरा रस्ता भी है…और वोही मंजील…मग तीपण चप्पल फिरवत निघते. अक्षय हळूच मागे बघतो. गालात हसतो आणि म्हणतो..वो मेरा सागर भी है..और वोही साहिल…आता अक्षय एकटाच बसलाय..गातोय…कैसी बता ये बेताबियाँ है..हम चलते चलते आये कहाँ है…गर्दीत असूनही अक्षय एकटाच…दिल-ए-बेकरार! यहीं होता प्यार है क्या…मेरे दिल-ए-बेकरार…हाय…यहीं होता प्यार है क्या….

पुढेच कतरिना दिसते. पाण्याच्या तुषारात न्हावून निघणारी. अक्षय तिला बघतोय. त्याला खुश बघून ती मनात काय येडपट आहे म्हणून हसतेय. आणि त्याला पाण्यात भिजवतेय. जावेद अख्तर बोलतो…नींद के बादलों के पीछे है..दोपहर एक पिली पिली सी…लोहे की ठंडक के लहजे  में….टुटा आईना..उड़ते कुछ कागज…किर्चुम किर्चूम…बिखरता एक मंजर…पलकों पे झील मिलाता एक आँसू….ठेहरा सन्नाटा…शोर करता हुआ…नींद के बादलों के पीछे है! आता…अक्षय आणि कतरिना ट्रेनमध्ये भेटतात. अक्षयला पाहून कतरिना स्तब्ध! बहुधा ट्यूबमध्ये. अक्षय सुरु…सुनता हूँ..मैं तेरी ये दास्ताँ….दोघे आगेमागे बसतात. सिमटेगी इक दिन तो ये दूरियाँ…अक्षय तिला बघून खुश तर ती गोंधळलेली…ती म्हणते…उम्मीद तुने ऐ दिल खोयी नहीं है…आणि त्याच्या बाजूला येऊन बसते. अक्षय तिला न बघताच हसतो…त्याला हवे ते झालेले असते. तो गातो..तेरी जिद पे मेरे ऐ दिल…सद आफरीं है…..ट्रेन थांबते…क्यूँ ये जुनून है..क्या जुस्तजूं है….अक्षय खिन्न होतोय. ती जाते निघून…तो म्हणतो.. आखिर तुझे क्यूँ ये आरजुं है! दिले-बेकरार…यहीं होता प्यार है क्या! पण ती कार्ड विसरलीय. अक्षय खुश…कारण त्याचे फासे नीट पडत आहेत. तो जातोच.

मेरे दिल-ए-बेकरार…तिला मदत करतो…दोघे बाहेर येतात. कतरिना छत्री फिरवत आपल्याच दुनियेत खुश दिसते तर अक्षय अजूनही माझे कसे होणार या चिंतेत ! गाणे संपते.

मला आठवते जावेद अख्तर एका मुलाखतीत बोलला होता की, ‘या चित्रपटाची गाणी मी जशी लिहिली आहेत त्यात थोडाही बदल हिमेशने केला नाही. त्याच शब्दांना त्याने चाल लावलीय.’ हिमेसला कितीही शिव्या घातल्या तरी हे गाणे सुंदर आहे यात वाद नाही. किंबहुना हिमेसच्या खूप चांगल्या कामात याचा समावेश होतो. लिपसिंक नसल्याने गाणे अजूनच उठावदार होते.

त्यापैकी हे एक! मेहफिल मिक्स पण मस्तच आहे. गाण्याचे चित्रीकरणसुद्धा भारी केले आहे. बघा एकदा अनुभवून…

  • अविनाश वीर 

Leave A Reply

Your email address will not be published.