वैतागलेले यश चोप्रा म्हणाले, मिस्टर परफेक्शनिस्ट नही, पागल हे लौंडा…

आमीर खानला बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं. याच्या मागचं कारण म्हणजे त्याची चित्रपट करताना दिसणारी जीवापाड मेहनत. प्रत्येक गोष्ट अचूक असेल तरच तो काम करतो. तर दुसऱ्या बाजूला बॉलीवूडच्या इतिहासातले सर्वोत्तम फिल्ममेकर असं बिरूद ज्यांना मिळालं ते म्हणजे यश चोप्रा.

एकदा एका चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही महारथी मिस्टर परफेक्शनिस्ट आणि लिजंड फिल्ममेकर एकत्र आले खरे पण आमिरच्या अति परफेक्शनिस्ट पणामुळे ते आमिरवर इतके वैतागले आणि म्हणाले होते की,

” इस लौंडे ने नाक में दम कर दिया हे, इसका ये काम करने का तरीका पता होता तो इसके साथ कभी काम नहीं करता “

यानंतर आमीर खान आणि यश चोप्रा यांनी परत कधीच एकत्र काम केले नाही.

बघूया नक्की काय किस्सा होता तो.

बॉलीवूडमधल्या कैक अभिनेत्यांना ज्यांनी सुपरस्टार बनवलं ते म्हणजे यश चोप्रा. ज्यावेळी यश चोप्रा यांनी स्वतःच ” यशराज बॅनर ” उभारलं त्यानंतर त्यांनी इतर कोणासाठीही काम केलं नाही. पण फिरोज नाडियादवाला हा यश चोप्रांचा खास मित्र होता केवळ त्याच्या आग्रहाखातर त्यांनी १९९३ मधल्या त्याच्या परंपरा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.

हा चित्रपट मल्टीस्टारकास्टवाला होता. यात आमिर खान सोबतच सुनील दत्त, विनोद खन्ना, सैफ आली खान, राम्या, अश्विनी भावे, रविना टंडन आणि नीलम अशी तगडी फौज होती.

या चित्रपटातील एक गाण होतं जे कॉलेजमध्ये चित्रित होणार होतं. या गाण्यात काही वाद्यांचा वापर होणार होता ज्यात पियानो, ड्रम, गिटार अशी वाद्ये होती. या एका सीनमध्ये आमिर खान पियानो वाजवत आहे अस दाखवायचं होतं. दिवसभरात यश चोप्रांना हे गाणं संपवून टाकायचं होत. कारण बरेच दिवस शूट चालू होतं आणि चित्रपट रेंगाळत चालला होता.

आज हे गाणं संपवून पुढचं शूट लावायचं या विचाराने यश चोप्रा सेटवर आले. पण त्या दिवशीचं शूट आमीरमुळे थांबलं असल्याचं त्यांना कळल कारण त्या दिवशी अमीर खान परफेक्ट बनायच्या नादात पियानोवर वाजवत बसला होता.

ज्यावेळी पॅकअपची वेळ झाली तेव्हा अमीर म्हणाला की आता मी रेडी आहे. खरतर पियानोवर एखाद्या पटाईत वादकाचे बोटं कशी फिरतील याचा सराव अमीर करत होता. आमिरचा त्या दिवशी पियानो वादनावर लूप लागला होता. वारंवार तो त्याची प्रॅक्टिस करत राहिला. आमिरचा हा प्रकार पाहून यश चोप्रा भडकले.

आजवर त्यांनी बॉलीवूडच्या मोठमोठ्या लोकांसोबत कामे केली होती पण इथ आमिर खान त्यांना थकवत होता. यश चोप्रांनी आमिरला समजावून सांगितले की,

“अरे भावा तुझे बोटं दिसणार नाहीये स्क्रीनवर, ह्या सीनमध्ये बाकीची मंडळी आहे, पाठीमागे नाचणारे डान्सर्स आहेत, इतक्या छोट्या गोष्टीसाठी इतका वेळ का वाया घालवतोस ?

आमिरखान हा आमिरखानचं होता. तोही म्हणाला जोवर माझे बोटं योग्य रीतीने पियानोवर फिरत नाही तोवर मी शूट करणारं नाही.

इतर अभिनय करणाऱ्या लोकांनी त्यांचे सीन लवकर लवकर दिले होते एकट्या आमिरमुळे शूट थांबलं होतं. वैतागलेल्या यश चोप्रांनी ठरवलं आणि सीनचा सीक्वेन्सचं बदलून टाकला. पियानोवर अमीर न बसता सैफ बसेल आणि आमिरला पियानोच्या बाजूला उभं केलं. आणि

दुसरं एखाद वाद्य आमिरला द्यायचच असेल तर ड्रमच्या काड्या फक्त त्याच्या हातात द्या. टेक्नीकल वाद्य त्याला देऊ नका.

एवढ्या सगळ्या बदलानंतर ते गाणं शूट झालं. हे गाणं होत आधी रात को पलको कि छाओ में….

आमिरच्या या हरकतीने वैतागलेले चोप्रा म्हणाले होते,

  यानंतर मी आमीरसोबत काम करणार नाही. तो मिस्टर परफेक्शनिस्ट कमी आणि वेडा जास्त आहे.

पुढे २००६ मध्ये यशराजच्या अंडर ‘ फना ‘ हा चित्रपट आला त्यात आमीर खान आणि काजोल ही जोडगोळी होती मात्र या चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल कोहली हा होता.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.