पक्षाचा पदाधिकारी दारू पितो म्हणून त्याच्या घराची पायरी देखील न चढणारा मुख्यमंत्री.

 यशवंतराव चव्हाणांनी आग्रहाने बाहेरचे उमेदवार असणाऱ्या डॉ. झाकेरिया यांना उमेदवारी दिली होती. औरंगाबादच्या कॉंग्रेस कमिटीने सुरवातीला हिरूभाई जगताप यांचे नाव सुचवले होते. मात्र ते रद्द करुन चव्हाण साहेबांच्या आग्रहामुळे डॉ. झाकेरिया यांना उमेदवारी देण्यात आली.

गोविंदभाई विरुद्ध डॉ. झाकेरिया असा सामना झाला होता व डॉ. झाकेरिया विजयी झाले होते.

ही उमेदवारी देण्याच कारण म्हणजे यशवंतरावांच्या मते मराठवाडा विकासाच्या बाबतीत मागे रहात असून इथून शिक्षित उमेदवाराला निवडून आणण्याची आवश्यकता आहे. त्यानूसार डॉ. झाकेरिया यांना उमेदवारी देण्यात आली व मुंबईचे झाकेरिया औरंगाबादमधून निवडून आल्यानंतर यशवंतराव चव्हाणांचे वारंवार औरंगाबाद दौरे होवू लागले.

याच कालावधीत जिल्हापरिषदेच्या निवडणूका लागल्या होत्या. त्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण औरंगाबादमध्ये येणार होते. याच वेळी राज्यात बाळासाहेब देसाई मात्तब्बर मंत्री म्हणून गणले जात होते.

नाही म्हणायला, बाळासाहेब देसाई पुढील मुख्यमंत्री असणार असा अंदाज बांधला जात होता व त्या दृष्टीने बाळासाहेब देसाईंनी हालचाल करुन आपला गट बांधण्यास सुरवात केली होती.

याच गटातले औरंगाबादचे नेते विनायकराव पाटील हे यशवंतरावाचे स्नेही मात्र बाळासाहेब देसाईंच्या विरोधातले होते. विनायकराव पाटील हे प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. तर बाळासाहेब यांच्या गटाकडून हिरू जगताप होते. बाळासाहेब देसाई यांच्यामुळेच त्यांना औरंगाबाद जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष करण्यात आले होते.

हिरू जगताप हे प्रचंड दारू प्यायचे. मात्र हि गोष्ट चव्हाण साहेबांना माहित नव्हती. जेव्हा दौरा आखण्याची वेळ आली तेव्हा हिरू जगताप यांच्या घरी जेवणाची सोय करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी घेतली व त्याला पाठिंबा देखील दिला.

ठरल्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण औरंगाबाद येथे आले. रात्रीच्या सुमारास कार्यक्रम संपवून नियोजनाप्रमाणे आत्ता हिरू जगताप यांच्या घरी जेवणाला जाण्याचं ठरलं. जेवणाची पुर्ण तयारी झाल्याचा निरोप मिळाला होता. इतक्यात कुणीतरी चव्हाण साहेबांच्या कानात जावून सांगितलं,

जगताप बहूत ड्रिंन्क करता हैं !! 

चव्हाणसाहेबांनी तात्काळ जगतापांच्या घरी जाण्याचा बेत रद्द केला. खूप आग्रह केल्यानंतर ते म्हणाले, 

अशा माणसाच्या घरी मी जेवायला गेलो तर चांगल्या माणसांच्या मनात काय भावना येतील आणि अनैतिकतेला प्रोत्साहन दिल्यासारखं होईल, तेव्हा गेस्ट हाऊसमध्येच स्वयंपाक करा, मी येथेच जेवण करेल. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.