दक्षिण भारतात भाजपच्या अडचणीत वाढ, येडियुरप्पा यांचा पाय खोलात जातोय..

दक्षिण भारतात भाजपसाठी राजकीय गोंधळ संपण्याचं नाव घेत नाहीये. एकीकडे कर्नाटकात मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांना पुन्हा  एकदा खुर्चीवरून हटवण्याची मागणी जोर धरू लागलीये. तर  केरळात पैशांच्या लुट प्रकरणी भाजप नेत्यांना कचाट्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही  राज्यांत सुरु असलेल्या या गोंधळामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली असून हे प्रकरण आता थेट दिल्ली दरबारी जाऊन पोहोचलय.

येडीयुरप्पांना यांच्या मुख्यमंत्री पदाला पुन्हा एकदा झटका 

कर्नाटकात भाजपची सत्ता अजून येडीयुरप्पा मुख्यमंत्री पदावर आहेत.  मात्र त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा विरोध सुरुवातीपासूनच सुरु आहे. २०१८ मध्ये जेव्हा येडीयुरप्पा  यांना मुख्यमंत्री बनवण्यात येत होत, तेव्हा सुद्धा त्यांच्या वयामुळ त्यांना विरोध केला जात होता. मात्र भाजपनं याकड दुर्लक्ष केलं.

दरम्यान, २०१८ मध्ये शपथविधीनंतर फ्लोर टेस्टच्या आधी येडीयुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर जेडीएस  आणि कॉंग्रेसने मिळून सरकार बनवलं होत आणि एचडी कुमारस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्री पद गेलं होत. मात्र त्याच्या काही दिवसानंतरचं पक्षातले काही  आमदार भाजपात गेले. परिणामी पुन्हा भाजपच सरकार आलं आणि २६ जुलै २०१९ ला ७८ वर्षीय येडीयुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले.

गेल्या वर्षीपासूनच सुरुये वाद 

आत्ताचा उरकून निघालेला वाद हा गेल्या वर्षीच सुरु झाला होता. विधानसभांमध्ये निधी वाटपासंदर्भात झाल्या एका बैठकीत भाजपचे काही आमदार येडियुरप्पा यांच्याविरोधात बोलले होते. यानंतर मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात काही आमदार बंडखोरीवर आले होते. नुकताच भाजपचे आमदार बासनागौडा यत्नाल यांनी पंचमशाली लिंगायत आरक्षणाच्या मुद्यावरून येडियुरप्पा यांना घेरले होते. एवढचं नाही तर अनेक मंत्री आणि आमदारांनीही कोविड व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्र्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गेल्या मार्च महिन्यातच कर्नाटकाचे ग्रामीण विकास मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी येडीयुरप्पा यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांनी आरोप केला होता कि, मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा किवा  मजुरीशिवाय त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित अनेक महत्वाचे निर्णय घेत आहेत.  ईश्वरप्पा  यांच्यासोबतच आमदार बासनागौडा यांनी खुलेआम येडीयुरप्पा यांना पदावरून हटवण्याची मागणी करतायेत.

दरम्यान, येदियुरप्पा यांच्या विरोधात अनेक आमदार उभे असले तरी, महसूल मंत्री आर. अशोक आणि उप- मुख्यमंत्री सीएन अश्वतनारायण त्यांच्या सोबत आहेत. या दोघांच्या मते येडीयुरप्पा राज्यातील पक्षाचा चेहरा  आहेत आणि लीडरशिप चेंज करण्याच्या चर्चेवर पूर्णविराम लावला पाहिजे.

केरळ भाजप अध्यक्षांच्या विरोधात तक्रार 

एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास लाच दिल्याबद्दल भाजपच्या केरळ प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात  एफआयआर दाखल करण्यात आलीये. बसपचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणारे के. सुंदरा यांनी आरोप केला होता कि, मांजेस्वरम मतदार संघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपाने त्यांना अडीच लाख रुपयांची लाच दिली होती.  याप्रकरणी सीपीएम नेते व्ही.व्ही. रमेशन यांच्या याचिकेवर कारवाई करत स्थानिक कोर्टाने पोलिसांना निवडणुकीत लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

भाजप वादाच्या भोवऱ्यात

७ एप्रिल २०२१ ला धर्मराजन  नावच्या एका व्यक्तीने केरळ पोलिसांत तक्रार नोंदवली कि, काही गुंडांनी त्यांच्या कारमधून २५ लाख रुपये चोरून नेले. पोलिसांनी केलेल्या तपासात आढळले कि, चोरी केलेली रक्कम ३.५ कोटींपर्यंत असू शकते. महत्वाच म्हणजे ही तक्रार विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधीची होती. ज्यानंतर विरोधी पक्षांनी आरोप केला कि, भाजप या पैशांचा वापर निवडणुकीत करणार होती.  दरम्यान, केरळात पिनराई विजयन यांनी कित्येक वर्षाचा रेकॉर्ड तोडून मुख्यमंत्री बनलेत. 

केंद्राकडून चौकशी समितीची नेमणूक 

या केरळातल्या या मुद्द्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १९ लोकांना अटक केलीये. त्यामुळे केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन वादाट सापडले आहेत. SIT ने भाजप प्रदेश अध्यक्षांचे ड्रायव्हर आणि सहकाऱ्यांचीही चौकशी केलीये. तपास अधिकारी सुरेंद्रन यांचा मुलगा हरिकिशन यांना समन्स बजावण्याच्या तयारीत आहेत. तर कॉंग्रेसपक्षाकडून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी सुरु आहे.

दुसरीकडे भाजप याला एलडीएफ सरकारचे सुडीचे राजकारण म्हणत आहे. भाजपच्या आरोपानुसार  राज्य पोलिस माकपच्या आदेशानुसार काम करीत आहे.  केरळ भाजप अध्यक्ष म्हणाले की,

राज्य सरकार हे प्रकरण भाजप आणि त्यांच्या  नेत्यांना अपमानित करण्यासाठी उठवित आहे.

दरम्यान,  हे प्रकरण आता केंद्रापर्यंत जाऊन पोहोचलेय. त्यामुळ प्रकरणाच्या चौकशीसाठी भाजपाने अंतर्गत समिती स्थापन केली आहे. ज्यात  ई. श्रीधरन, निवृत्त आयपीएस जेकब थॉमस आणि सेवानिवृत्त आयएएस सीव्ही अनदा बोस  यांचा समावेश आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.