“काल सायगॉन, आज अफगाणिस्तान अन उद्या तैवान?”

“कालचा सायगॉन, आजचा अफगाणिस्तान आणि उद्याचा तैवान?”

अंतराष्ट्रीय मिडिया पाहायला गेलात तर अशा प्रकारच्या काही पोस्ट तुम्हाला हमखास दिसतील,  तैवान मधील काही इंटरनेट युजर्सने पोस्ट टाकल्या आहेत, आता याचा अर्थ असा की तैवानन वर देखील उद्या -परवा अशी परिस्थिती येऊ शकते ?

अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याची माघार आणि अफगाण सरकारचा पराभव यामुळे चीनच्या आक्रमणानंतर आता काय होईल यावर तैवानमध्ये चर्चा सुरू झाली आहे. तैवानच्या बचावासाठी अमेरिका समोर येईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सर्वप्रथम एक मुद्दा मांडणे गरजेचे आहे कि, तैवान आणि अमेरिका यांच्यात सामाजिक सुरक्षेबाबत करार आहे.

थोडक्यात या कराराअंतर्गत, जेव्हाही तैवानला धोका निर्माण होईल तेंव्हा तेंव्हा अमेरिका त्यांच्या मदतीसाठी पुढे येईल हे त्यांचं ठरलंय !

त्यामुळे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा बनतो, कि अफगाणिस्तानातून सैन्य माघार घेणारी अमेरिका पुढे जाऊन तैवानच्या बचावासाठी समोर येईल याची काय शाश्वती ?

दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी अफगाणिस्तानतल्या समस्येबद्दल म्हटले आहे की ते आपल्या सैनिकांना अफगाणिस्तानात असुरक्षित सोडू शकत नाहीत. ते असेही म्हणतात की या समस्येसाठी अफगाणिस्तान सरकार जबाबदार आहे, आम्ही नाही. अफगाणिस्तान सरकार मैदान सोडून पळून गेली. अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने तर हात वर केलेत त्यामुळे आता अमेरिकन सैनिक तैवानला चीनपासून खरंच वाचवू शकतील का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तैवानच्या पंतप्रधानांनी चीनला अप्रत्यक्ष आव्हान दिले.

अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्य माघारी घेतल्यानंतर आणि तालिबानचे वर्चस्व निर्माण झाल्यानंतर तैवानचे पंतप्रधान सु तेंग चांग यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. चीनला अप्रत्यक्ष इशारा देताना ते म्हणाले की, बीजिंगने तैवानच्या विलीनीकरणाच्या भ्रमात राहू नये. पंतप्रधान म्हणाले की, चीनने आमच्यावर हल्ला जरी केला तरी तैवानची परिस्थिती अफगाणिस्तानसारखी होणार नाही. तैवानला स्वतःचे संरक्षण कसे करायचं हे माहित आहे.

तैवानच्या पंतप्रधानांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेत आहेत आणि अफगाण सैन्याने तालिबान लढाऊंसमोर आपली शस्त्रे टाकली आहेत.

देशाचे रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत

अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाप्रमाणे तैवानचेही पंतप्रधान शत्रूपुढे गुडघे टेकतील का, देश सोडून पळून जातील का ? असे प्रश्न माध्यमांनी त्यांना केले असता, 

सु म्हणाले की, तैवानमध्ये १९४९ ते १९८७ पर्यंत मार्शल लॉ होता, देशात हुकूमशाही होती, पण त्याला अटक किंवा मृत्यूची भीती वाटत नव्हती. ते म्हणाले की तत्कालीन तैवान आणि आजच्या तैवानमध्ये बरेच बदल झाले आहेत. आपण एक शक्तिशाली देश आहोत. चीनकडे बोट दाखवत ते म्हणाले की ज्यांना लष्कर आणि शक्तीद्वारे आपल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे, ते संभ्रमात आहेत. ते म्हणाले की, देशाचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

तैवानच्या नागरिकांमध्ये आणि व्यवस्थेमध्ये एकजूट आहे त्यामुळे ते स्वतःचा बचाव करण्यास सक्षम आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, अफगाणिस्तानात जे घडले ते दर्शविते की जर एखादा देश अंतर्गत अराजकाच्या काळात जात असेल तर बाहेरील मदतीमुळे काही फरक पडत नाही. ते म्हणाले की तैवानला स्वतःच्या  एकजुटतेवर विश्वास ठेवावाच लागणार आहे. तरच ते स्वतःचा बचाव करू शकतील.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, तैवानने कोरोना विषाणूच्या संक्रमणाची परिस्थिती अगदी जलद गतीने नियंत्रित केली आहे, यावरूनच तैवान एकत्र आल्यावर काय साध्य करता येईल हे आम्ही दाखवले आहे. त्यांनी त्यांच्या विधानातून परकीय शक्तींना सावध केलेय.

तैवानवर आक्रमण करण्याची किंवा वर्चस्व गाजवण्याची स्वप्न बघू नका असा थेट संदेश च त्यांनी त्यांच्या बोलण्यातून दिला आहे.

चीनच्या ग्लोबल टाइम्सने त्यांच्या संपादकीयमध्ये याच मुद्द्याशी धरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

चीनच्या ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीयात म्हटले आहे की, “अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याचे माघार घेणे हे सु त्साई यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीसाठी एक धडा आहे.  अफगाणिस्तानमध्ये जे घडले त्यावरून त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, एकदा का तैवानमध्ये युद्ध झाले तर त्यांच्या बेटाचे संरक्षण काही तासातच कोसळू शकते. आणि तेंव्हा त्यांच्या मदतीला अमेरिकन सैन्य देखील येणार नाही.  फुटीरतावादी शक्तींना त्यांच्या स्वप्नांमधून जागे करण्याची क्षमता देखील तैवान कडे असली पाहिजे”.

अमेरिका तैवानचा आंतरराष्ट्रीय समर्थक आणि शस्त्र पुरवठादार आहे हे तर स्पष्ट च आहे. जगातील बहुतेक देशांप्रमाणे अमेरिकेचे तैवानशी कोणतेही अधिकृत राजनैतिक संबंध नाहीत, परंतु तैवान हा  अमेरिकेचा सर्वात महत्वाचा आंतरराष्ट्रीय समर्थक आणि शस्त्र पुरवठादार आहे. चीनचा हल्ला झाल्यास अमेरिका त्याला किती पाठिंबा देईल याची तैवानला फार पूर्वीपासून चिंता होती आणि अजूनदेखील आहे. तैवान ची सुरक्षा आणि भविष्य अमेरिकेच्या हातात आहे, पण अमेरिका याला कितीपत ‘खरी’ उतरते हे पाहणे महत्वाचे आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.