येवले चहात मेलोमाईन टाकतात अशी चर्चाय, आम्ही सांगतो मेलोमाईन काय असतं ते..

चहाचा ब्रॅण्ड असू शकतो हे सांगणारी लोकं म्हणजे येवले बंधु आणि प्रेमाचा चहा. गेल्या वर्षी लाखोंचा चहा विकणारे येवले बंधु अशी बातमी आली. काही दिवसातच येवले चहाच्या शाखा निघाल्या. पाठोपाठ प्रेमाचा चहा होताच. त्यामागोमाग कित्येक ब्रॅण्ड तयार झाले. चौकाचौकात चहाची शोरूम निघाली. इथला चहा भारी असतो म्हणून प्रत्येकाने चहाचा मनसोक्त आनंद घ्यायला सुरवात केली. 

पण काल या चहात माशी पडली. झालं अस की कोंढव्यामध्ये असणाऱ्या येवले चहांच्या पावडर कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने रेड मारली. त्यामध्ये त्यांना चुकीच्या गोष्टी आढळून आल्या. चहा पावडरचे उत्पादन थांबवण्यास सांगितले. कधीपर्यन्त तर पुर्ण चौकशी करुन हिरवा कंदिल मिळत नाही तोपर्यन्त. 

या कारवाई का करण्यात आली हा पहिला मुद्दा. 

अन्न व औषध प्रशासनाला येवले चहामध्ये मेलामाईन आहे असा संशय होता. त्यावरून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन केंद्रावर छापा टाकण्यात आला. इथे काय होतं तर राज्य आणि देशभरात असणाऱ्या येवलेच्या शाखांवर चहा पावडर, साखर, चहा मसाल्यांच उत्पादन करण्याच काम या ठिकाणावरून होतं.  

कारवाई दरम्यान प्रशासनाला काय आढळलं. 

एक साधा नियम असतो. आतमध्ये काहीही असो पण पॅकेटवर आतमध्ये काय आहे हे लिहावं लागतं. उदाहरण पॅकेटमध्ये चहा पावडर असली तर वरती चहा पावडर व त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते लिहावं लागतं. येवले पहिल्यांदा इथे सापडले. पॅकेटच्या वरती आतमध्ये कोणकोणते घटक आहेत त्यांची माहिती देण्यात आली नव्हती. ज्यावेळी चहा पावडर सारख्या गोष्टींच किंवा कोणत्याही गोष्टींच उत्पादन घेतलं जातं तेव्हा तिथे एका तज्ञ व्यक्तिची नियुक्ती केली जाते.

उदाहरण साखर कारखाना असेल तर साखरेत PHd टाईप काम करणारा इसम उत्पादन करताना असावा. असा नियम आहे. छापा टाकला तेव्हा असा व्यक्ती तिथे नव्हता. पदार्थांची गुणवत्ता तपासणी प्राधिकृत प्रयोगशाळेकडून करुन घेणे बंधनकारक असते ते देखील येवलेकडून करण्यात आलं नाही. 

थोडक्यात येवले चहा कडून नियमांचे उल्लघंन केल्याच सांगण्यात आलं. ते जे उत्पादन करतात त्या पदार्थांचे म्हणजेच चहा पावडर, चहा मसाला इ. नमुने अन्न व औषध प्रशासनाने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तिथे मेलामाईन असल्याचं निष्पन्न झालं तर येवलेंना मोठ्या कारवाईला समोर जावू लागू शकतं. 

तर आत्तापर्यन्त तुमच्या लक्षात आलं असेल ही सगळी भानगड ऐका मेलामाईन घटकामुळे सुरू झाली आहे. 

तर हा मेलामाईन घटक काय असतो. 

मेलामाईनचा शोध १८३० साली जर्मनीत लावल्याच सांगण्यात येत. एका जर्मन शास्त्रज्ञाने मेलामाईनला फॉर्नेहलाईड्स सोबत मिळवल्यावर त्याला असा पदार्थ मिळाला जो सहजासहजी तुटू शकत नव्हता. मेलामाईनच्या या गुणामुळं त्याचा उपयोग प्लॅस्टिक तयार करण्यासाठी केला जावू लागला. त्यानंतरच्या काळात शास्त्रज्ञांच्या आणि विशेषकरून किडे असणाऱ्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की याचा उपयोग जनावरांच्या खाद्यात भेसळ म्हणून देखील केला जातो. पुढे ते दुधात भेसळ करण्यासाठी देखील वापरण्यात येवू लागला. 

मेलामाईनमध्ये ७६ टक्यांपर्यन्त नायट्रोजन असतं. दूधात असणाऱ्या प्रोटीनची संख्या वाढवण्यासाठी मेलामाईन हा घटक वापरण्यात येत असल्याचं सांगितलं जातं. 

मेलामाईन या घटकांची तिव्रता खऱ्या अर्थाने कळली ती चीनमध्ये गुगल करून मिल्क सॅन्डल चीन अस सर्च केलं तरी २००८ साली झालेलं हे प्रकरण आणि त्याची तिव्रता आपणाला लक्षात येईल. यामध्ये कित्येक लहान मुलं दगावली होती. किडनी फेल होणं, मुत्राक्षयाचे आजार होणं हि प्रमुख परिणाम या घटाकामुळे होत असल्याचं सांगण्यात येत. 

मेलीमाईन बद्दल सांगताना अस सांगण्यात येत की याची मायक्रोमिली इतकी छोटी मात्रा देखील खूप मोठ्ठे दुष्परिणाम घडवून आणते. मेलीमाईन चे छोटे कण आतड्यामध्ये गोळा होवून जातात. हे कण किडनीच्या हान पेशींना डॅमेज करतात. याच लहान कणांमुळे मुतखडा देखील होवू शकतो.

तर हा घटक दूधात असलेल्या भेसळीमुळे दूधाची कमी झालेली प्रोटीनची ताकद वाढवण्यासाठी टाकला जातो. त्याच मुळे दुधात इतर गोष्टींची झालेली भेसळ लक्षात येत नाही. 

आत्ता दूसरा आणि महत्वाचा मुद्दा मेलोमाईनवर हे खरोखरच बंदी आहे का? 

काही लोक सांगतात की यावर बंदी नाही. पण FSSAI ने  २७ नोव्हेंबर २०१८ रोजी एक प्रेस नोट काढली होती. त्यात अस सांगण्यात आल की मेलोमाईनवर सरकारद्वारा बंदी आहे. त्यापुर्वी जागतिक आरोग्य संघटनेने देखील यावर बंदी घातली होती. FSSAI ने कृत्रीम रित्या खाण्याच्या पदार्थात मेलोमाईन असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल अस सांगितलं. यात कृत्रीम आणि नैसर्गिक अशा दोन पद्धती वापरण्यात आल्या.

पैकी नैसर्गिक म्हणजे प्लॅस्टिकमध्ये वापरण्यात आलेल्या मेलोमाईन या घटक किंवा जनावरांच्या खाद्यामध्ये मेलोमाईन वापरल्यामुळे तो घटक दुधात येतो.

असो तर याच मेलोमाईनच्या संशयावरुन कारवाई झाल्याच सांगण्यात येतय पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे आत्ता हे मेलोमाईन खरच चहात आहे की नाही हे प्रयोगशाळेतील रिपोर्ट आल्यानंतर कळेल, तुर्तास कोणत्याची उद्योगाची बदनामी करण्यात काहीच अर्थ नाही. टाकत असतील तर कारवाई नाहीतर पुन्हा त्याच जौमाने चहाविक्री सुरू हे साधं समीकरण आहे. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.