असा कोणता प्रोटोकॉल आहे भिडू की, योगी पंतप्रधानांच्या गाडीच्या मागे चाललेत..

निवडणुका आल्या की सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली  असते, समोरच्याला कसं ट्रोल करता येईल, त्याच्यावर कसा निशाण साधला जाईल. वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या प्रतिस्पर्ध्याची एखादी चूक पकडली जावी. याची वाटचं सगळे बघतं  असतात. आता कधी कधी ही ट्रोलींग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारे होते. पण सध्या या ट्रोलींगचा शिकार बनवेत योगी आदित्यनाथ.

सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लक्झरी कार मध्ये बसलेले दिसत आहेत. त्यांच्या गाडीमागे त्यांच्या झेड सिक्युरिटीचा ताफा आहे. आणि त्याच्याबरोबर दिसत आहेत. योगी आदित्यनाथ, जे पायी पायीचं त्या गाडीच्या मागे चालताना दिसत आहेत.

आता या व्हिडिओ वरून योगी आदित्यनाथ यांना ट्रोल केलं जातयं. काही ट्रोलर्स म्हणत आहे की, जनतेच्या आधीच पंतप्रधानांनी मुख्यमंत्री योगींना पायी चालवलं.

योगींचा हा व्हिडिओ अनेकांनी ट्विट केलाय ज्यात विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांच्याही नावाचा सामावेश आहे. अखिलेश यांनी एक शेर लिहून योगींचा मस्करी उडवली आहे.

आता राजकारण म्हंटल की, या सगळ्या गोष्टी येणारचं, पण तुम्हाला माहियेत योगींच्या या पायी चालण्यामागे एक प्रोटोकॉल आहे. जो माहित करून घ्यायचा असेल तर स्टोरी पार शेवट पर्यंत वाचा.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी १६ नोव्हेंबरला यूपीच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान त्यांनी सुलतानपूरमध्ये पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे उद्घाटन केले. आणि योगी आदित्यनाथ यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा त्यावेळचाचं आहे. योगी आदित्यनाथ आपला प्रोटोकॉल फॉलो करत होते.

ते कसं असतं ना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यांबाबत काही विशिष्ट प्रोटोकॉल पाळावे लागतात. यामध्ये पाहुण्यांचे स्वागत, त्यांचा मुक्काम, प्रवास, खाणेपिणे याबाबत नियमावली करण्यात आली आहे. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान त्यांच्या अधिकृत दौऱ्यावर कोण स्वागत करणार याबाबतही काही नियम करण्यात आले आहेत.

प्रोटोकॉल ब्लू बुक’मध्ये या नियमावलीचा उल्लेख आहे. त्याला हिंदीत ‘ब्लू बुक’ म्हणतात. हे पुस्तक इंटरनेटवर सापडणार नाही, कारण ते गोपनीय आहे.

प्रोटोकॉलनुसार, पंतप्रधानांच्या एखाद्या राज्याच्या अधिकृत भेटीच्या वेळी म्हणजे स्वागत आणि निरोप दोन्ही वेळी राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक, सरकारचे सचिव, पोलीस आयुक्त, संयुक्त सचिव आणि प्रोटोकॉल संचालक, जिल्हा दंडाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना उपस्थित राहणं आवश्यक आहे, पण हा हे जिल्हाधिकारी वगळता इतरांना बंधनकारक नाही.

तर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार पंतप्रधान विमानतळावर उतरले, तर प्रोटोकॉलनुसार जे त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले आहेत, ते लॉबीमध्ये थांबतात. पंतप्रधानांना भेटायचे असेल तर ते येऊन भेटतील. पंतप्रधान विमानतळावर किंवा हवाई पट्टीवर उतरत असल्यास, जिल्हा दंडाधिकारी त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर प्रोटोकॉल संपतो. पण आज आयुक्त, मुख्यमंत्री आणि इतर लोकही रिसिव्ह करायला जातात. आणि आजकाल ही एक परंपरा बनली आहे.

सोबतचं या नियमात असेही म्हंटले आहे की, जर मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर ते पंतप्रधानांना रिसीव्ह करू शकतात किंवा पंतप्रधानांची इच्छा असेल तर सीएम त्यांना नंतर भेटू शकतील. पण या दरम्यान देखरेखीसाठी एक कार्यकारी अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी नियुक्त केला जाऊ शकतो.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.