७४ वर्षांचे आजोबा : कधीकाळी होते इंग्लिशचे प्राध्यापक, आज रिक्षा चालवतात ते पण आनंदाने..
ही गोष्टय ७४ वर्षांच्या आजोबाची. ते आजोबा एकेकाळी मुबंईतल्या एका प्रतिष्ठित कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक होते. आज ते बंगलुरच्या रस्त्यांवर रिक्षा चालवतायत. तुम्हाला गोष्ट वाचताना कुठेतरी हळहळ वाटेल, दुख वाटेल पण तस नाहीए.
ही गोष्ट आहे आनंदाची..
कारण आजोबा त्यांच काम आवडीने करतात आणि खुष असतात…
गोष्ट अशी आहे की निकीता अय्यर नावाची एक मुलगी बंगलोरच्या आयडी सेक्टरमध्ये काम करते. ऑफिसला जाण्यासाठी रोज रिक्षा वापरते. निकीतासाठी तो दिवस पण रोजच्या सारखाच होता. आवराआवर झाली आणि ऑफिसला जाण्यासाठी ठरलेल्या स्टॉपवर थांबली…
इतक्यात एक रिक्षा आली. रिक्षात ७०-७५ वर्षांचा एक वृद्ध व्यक्ती होता. तो माणूस रिक्षातूनच निकीताला म्हणाला,
प्लीज कम इन मॅन, यू कॅन पे वॉट यू वॉन्ट…
निकीता हे इंग्लिश ऐकून आश्चर्यचकित झाली. रिक्षा चालवणारा एक म्हातारा इतकं सफाईतदार इंग्लिश कस बोलू शकतो. ती रिक्षा बसली..
तिने पहिलाच प्रश्न विचारला,
तूम्ही इतकं चांगल इंग्लिश कसं बोलू शकला…
तेव्हा तो व्यक्ती म्हणाला,
माझं MA, Med शिक्षण झालं आहे. मी यापूर्वी मुंबईतल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो. ते ही इंग्लिशचा. त्यामुळं मला उत्तम इंग्लिश बोलता येत.. अस बोलून तो हसला…
निकीता पुढचा प्रश्न विचारणार तोच तो व्यक्ती म्हणाला,
आत्ता तुम्ही हळहळ व्यक्त कराल. अरे इतक्या चांगल्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीवर म्हातारपणा रिक्षा चालवण्याची वेळ का यावी? पण तस काही नाहीए. मी गेल्या १४ वर्षांपासून रिक्षा चालवतोय आणि ते पण अगदी आनंदाने…
अस सांगून तो आपली गोष्ट सांगू लागला..
त्याचं नाव पट्टाबी रमण. कर्नाटकात नोकरी मिळत नव्हती म्हणून आयुष्याच्या तारुण्यात ते बंगलुरवरून मुंबईला आले. इंग्लिश विषयात पोस्टग्रज्युएशन झालं होतं. सोबत Med ची डिग्री देखील होती. याच्या बळावर त्यांनी एका खाजगी शिक्षण संस्थेत प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली..
पण ही नोकरी सरकारी नव्हती. रिटायर झाल्यानंतर पेन्शन वगैरे मिळणार नव्हती. पट्टाबी रमण यांनी मुंबईत नोकरी केली आणि रिटायर झाल्यानंतर बंगलुरमध्ये आले. हळुहळु हातातलं सेव्हिंग संपत गेलं. पण मुलं हाताखाली आली. मुलांच्या पैशावर पुढचं आयुष्य सहजपणे जगता येवू शकत होतं..
पण त्यांनी स्वत: पैसे कमावयचं ठरवलं. मुलाने आग्रह धरला म्हणून त्यांनी आपल्या भाड्याच्या घराचे पैसे पोरांनी द्यावे अस ठरवण्यात आलं. आजही महिन्याला येणारं घराचं भाड मुलं देतात आणि हे घरखर्च पाहतात. सेव्हिंग करतात आणि अगदी आनंदात रिक्षा चालवतात..
दिवसाचे हजार दिड हजार रुपये मिळतात. यात मी आणि माझी गर्लफ्रेन्ड दोघेही खूष असतो अस त्यांनी निकीताला बोलताना सांगितलं. निकीताने तुम्हाला गर्लफ्रेन्ड आहे अस विचारताच ते म्हणाले मी माझ्या बायकोला गर्लफ्रेन्डचं बोलतो…
ही गोष्ट ऐकताच निकीताने आश्चर्याने विचारले तुम्हाला गर्लफ्रेन्ड आहे..? तेव्हा खूषीखुषीत त्यांनी सांगितलं मी माझ्या बायकोला गर्लफ्रेन्ड म्हणतो…
शेवटी निकीता त्यांच्याबद्दल लिहताना सांगते, मुल त्यांच्या आयुष्यात खुष आणि हे त्यांच्या आयुष्यात खुष…
हा अनुभव निकीता यांनी सोशल मिडीयावर लिहल्यानंतर व्हायरल झाला..
https://www.linkedin.com/embed/feed/update/urn:li:share:6912671110782234624
हे ही वाच भिडू
- आजोबांचं स्वप्न पूर्ण करत दोघा बहीण भावांनी inc 5 ब्रँड उभा केला
- फॉरेन ब्रँडच्या रेसमध्ये मागून येऊन हा भारतीय ब्रँड १००० कोटींची उलाढाल करतोय
- ड्रग्ज विरोधात जनजागृतीसाठी 81 वर्षाच्या आजोबांनी 5 लाख किमीचं अंतर चालून पूर्ण केलंय.