शेती you tube वर नेली. आज महिना दोन लाख कमावतोय पण कसे ? आम्ही सांगतो की.

एक भैसे न बदली किस्मत. दिड लाख लोकांनी पाहिलेला व्हिडीओ. यात काय आहे तर तो एका शेतकऱ्याच्याकडे जातो तिथे त्याला जो फायदा झाला त्याचा व्हिडीओ करतो आणि यु ट्यूबवर टाकतो. सायवाल राठी गाय का सच. यात काय गायीच्या या जातीमुळे खरच फरक पडतोय का.

जुगाड करून करण्यात आलेली शेतीची अवजारे, शेती करायला लागणारी खतं, ती वापरल्यानंतर झालेला फायदा, आजूबाजूला काय चालू आहे हे सगळं तो व्हिडीओ करुन यु ट्यूबवर अपलोड करतो. आत्ता त्याच्या व्हिडीओत नेमकं काय आहे हे सुरवातीलाच सांगायच असलं तर खालचा व्हिडीओ बघा. 

महाराष्ट्राकी शान खिल्लार…! 

हा माणूस पंजाबचा. पण तो महाराष्ट्रात येवून व्हिडीओ करतो. माहिती मिळवतो. संपुर्ण देशभरातल्या शेतकऱ्यांची विविधता लक्षात घेवून कुठे काय चालू आहे ते सांगतो. हे सांगत असताना त्याला फायदा देखील होतो.

अनेकांना प्रश्न पडतो कोण देतं पैसे.

पैसे यु ट्यूब देत. साध गणित काय असतं तर तुम्ही पाच मिनीटाचा व्हिडीओ केलात तर मध्ये एखादी दूसरी जाहिरात दिसते. ती जाहिरात दाखवण्यासाठी जाहिरातदार कंपन्या यु ट्यूबला पैसै देतात. जाहिरातीच्या पैशातून यू ट्यूबचा फायदा होतो. तो फायदा ते तुम्हाला देतात. आत्ताच सांगायच झालं तर हा लेख वाचताना देखील तुम्हाला मध्ये-मध्ये जाहिराती दिसतील. त्या जाहिराती जितक्या वाचल्या जातीत तितके आम्हाला म्हणजे बोलभिडूला पैसे मिळतात. आत्ता या माणसासारखं आम्ही लाखात खेळत नसलो तरी आमचं पोटापाण्याचं नक्की भागतं. 

असो, तर आपण मुळ मुद्याकडं येवू. 

दर्शन सिंह हे मुळचे हरियाणाचे. हरियाणात त्यांची १२ एकर जमिन. हरियाणाची १२ एकर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील ४० एकर. जमिनीतून मिळणार उत्पन्न भारी. त्यात वर्षातून दोन ते तीन पिक घेणारे इथले शेतकरी. त्याने आपल्या शेतीत प्रयोग करण्यास सुरवात केली. सुरवातील आपल्या शेतातील प्रयोग त्याने व्हिडीओ स्वरुपात पुढे आणले. त्यानंतर ओळखीच्या शेतातून, राज्यभरातील कृषी प्रदर्शनातून हा प्रवास पुढं सरकत राहिला. एका वर्षात त्यांच्या चॅनेलला २० लाख लोकांनी सबस्काईब केलं. 

या चॅनलची सुरवात झाली ती २०१७ साली. सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे. कारण आज मोठ्या प्रमाणात गावखेड्यात मोबाईल वापरले जात आहे. याच्यासारखं दूसरा आणि दूसऱ्यासारखा तिसरा व्हिडीओ करण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांची अशी समजूत आहे की तुम्ही खूप उशीरा व्हिडीओ सुरू करत आहात. तुम्हाला फायदा होणार नाही.

पण तस नसतं तुम्ही लोकांना वेगळ सांगत राहिला तर वेगळेपणासाठी तुम्ही इतर लोकांहून पुढे जावू शकता. दर्शनसिंह यांनी नेमकं तेच केलं. आपल्या शेतातले जुगाड दाखवण्यापेक्षा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी केलेले जुगाड त्यांनी दाखवायला सुरवात केली. 

उदाहरणार्थ खाली दिलेला हा व्हिडीओ, 

यात काय आहे तर जनावरांना चोवीस तास पाणी मिळू शकेल म्हणून एका शेतकऱ्याने केलेलं जुगाड. खाद्य देत असताना सिमेंटला गोलाकार दिलेला आकार. खूप छोट्या पण महत्वाच्या गोष्टी. त्यामुळे काय झालं तर अशा छोट्या आयडिया वापरणारे शेतकरी तर फेमस झालेच पण त्यांना फेमस करतो म्हणून हा खूपच फेमस झाला. या व्हिडीओला ५ मिलियन व्हू आहेत. म्हणजे ५० लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

आत्ता दर्शनसिंग यांच दूसरा युनिक पॉइन्ट काय तर ते उगीच सक्सेस स्टोरी सांगत बसत नाहीत. शेतकरी सहज ज्या गोष्टी आपल्या शेतीत करु शकतो अशा गोष्टी ते दाखवतात. लोकांना त्या करायला सांगतात. 

याच कारण दर्शनसिंह यांनी ज्या गोष्टींसाठी सुरवात केली त्यात लपलं आहे. त्यांना एका अवजाराची आवश्यकता होती. नेटवर ते मिळत होतं पण ते कस वापरायचं त्याचा फायदा आहे का याची माहिती नव्हती. अखेर शेजारच्या गावात एकाकडे ते अवजार असल्याची माहिती मिळाली. ते सोबत कॅमेरा घेवून गेले. जे दिसतं ते शूट केलं आणि यु ट्यूबवर अपलोड केलं. तिथून या चॅनेलला सुरवात झाली. 

आत्ता असच तुम्ही करू शकता का ? 

तर शंभर टक्के. याबद्दल आमचा अनुभव सांगायचा झाला तर आम्ही इतकच सांगू शकतो कधीही व्हिडीओ सुरू करा पण वेगळपण टिकवा. लोकांना कशाची गरज आहे ते समजून घ्या. जास्त नाही पण तुम्ही आणि तुमचे मित्र ज्या गोष्टी युट्यूबवर सर्च करतात त्यांची माहिती घेतली तरी तुम्हाला पुढच्या गोष्टी समजून जातील. नाहीतर गावाकडच्या गोष्टी चालतं म्हणून तसेच व्हिडीओ करत राहिलात तर काही काळापुरते पैसै मिळतील पण दर्शनसिंह सारखं मैलाचा दगड ठरेल अस काम होणार नाही. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.