सगळं जग ज्याला ‘ झहीर अब बस कर ‘ असं म्हणायचे त्याला गावस्करांनी आउट केलेलं…

क्रिकेटमध्ये सगळ्यात उत्तम खेळाडू म्हणून सर डॉन ब्रॅडमन यांना ओळखलं जातं. पण पाकिस्तानचा एक खेळाडू होता ज्याला पाकिस्तानचा सर डॉन ब्रॅडमन म्हणून ओळखलं जायचं. पाकिस्तानच्या सगळ्यात यशस्वी क्रिकेटर्सपैकी एक खेळाडू म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. असंही म्हटलं जात कि फाळणी झाली नसती तर तो खेळाडू आज भारताचा महान खेळाडू ठरला असता. तर जाणून घेऊया हा खेळाडू कोण होता.

झहीर अब्बास. सगळ्यात खास आणि क्लास बॅटिंग करणारा खेळाडू म्हणून अब्बासकडे बघितलं जायचं. २४ जुलै १९४७ रोजी पंजाबच्या सियालकोटमध्ये मध्ये झहीर अब्बासचा जन्म झाला. हा भाग त्यावेळी भारताचा हिस्सा होता. फाळणीमुळे अब्बासच्या कुटुंबाला पाकिस्तानात जावा लागलं. अबबसची खेळायची एक युनिक स्टाईल होती ती म्हणजे तो चष्मा लावून खेळायचा.

`१९७०-८० च्या दशकातील सगळ्यात जबरदस्त आणि स्फोटक खेळाडू म्हणून झहीर अब्बास प्रसिद्ध होते. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १०० सेंच्युरी करण्याचा विक्रम झहीर अब्बासने केला होता. इतकंच नाही तर पहिल्यांदा वनडेमध्ये सलग तीन शतकं झळकावण्याचा पराक्रमसुद्धा अब्बासने केला होता. टेस्टमध्ये ४ डबल सेंच्युरी ठोकून अब्बासने सगळ्यांनाच हैराण केले होते.

१९६९ मध्ये झहीर अब्बासने क्रिकेटमध्ये डेब्यू केला आणि दुसऱ्याच टेस्टमध्ये त्याने डबल सेंच्युरी झळकावली. इंग्लंडविरुद्धच्या त्या मॅचमध्ये अब्बासने २७४ रन ठोकले होते.

झहीर अब्बासचा खेळायचा अंदाज हा सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी साम्य दाखवणारा होता, त्यामुळे अब्बासला आशियाचा ब्रॅडमन म्हणून संबोधलं जायचं.

झहीर अब्बासची बॅटिंग इतकी खतरनाक होती कि विरोधी संघाचे खेळाडू अक्षरशः रडकुंडीला यायचे. १९७० च्या काळात झहीर अब्बास रन मशीन म्हणून ओळखला जायचा.

एका भारत पाकिस्तानच्या मॅच वेळचा किस्सा सांगताना गावस्कर म्हणतात कि अब्बास क्लास खेळाडू होता, एका मॅचमध्ये त्याने इतका वेळ बॅटिंग केली होती कि खेळाडू अब्बासला ‘ झहीर अब बस कर ‘ असे म्हणायचे.

सगळीकडे आपल्या बॅटिंगने हवा करणाऱ्या अब्बासला सुनील गावस्करांनीच आउट केलं होतं. सुनील गावस्करांची हि एकमेव विकेट असेल ज्यात त्यांनी रन मशीनची विकेट काढून सगळ्यांना चकित केलं होतं. हा तो काळ होता जेव्हा बॉलर्स झहीर अब बस करो म्हणत असायचे.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अब्बासने तब्बल ३४८४३ धावा तडकावल्या होत्या. झहीर दोन वेळा पाकिस्तानचा कर्णधार होता. १९८५ मध्ये झहीर अब्बासने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. थोड्या काळासाठी आयसीसीचे रेफ्री म्हणून सुद्धा अब्बासने काम पाहिलं. पाकिस्तान क्रिकेट टीमचे मॅनेजर म्हणून सुद्धा ते कार्यरत राहिले.

झहीर अब्बास हा भारतीय क्रिकेटर रोहित शर्माचा जबरी फॅन आहे. रोहित शर्माची बॅटिंग बघताना अब्बास म्हणतात ,

रोहित शर्मा के पास जो ब्युटीफुल स्ट्रोक हे मुझे देखके बडी तसल्ली होती है, और जिस तरह से वो बॉल बनाके मारता है वो भी बहुत खूबसूरत खेलता है….! रोहित शर्मा खेळत असताना मी टीव्हीसमोरून हलत नाही.

अब्बासने इंटरनॅशनल क्रिकेट करियरमध्ये अब्बासने ७८ टेस्ट मॅचमध्ये ५ हजार ६२ रन केले तर ६२ वनडेमध्ये २ हजार ५७२ धावा अब्बासने केल्या. पण फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये केलेला पराक्रम झहीर अब्बासच्या क्रिकेट करियरची पावती आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.