फेसबुकचा झुक्या चोरून टिकटॉकचे व्हिडीओ बघताना सापडलाय.

तर भिडूनो एकदम खरंखरं सांगा. टिकटॉकवर तुमच्या पैकी कितीजण आहे? तिथ त्या नाचणाऱ्या पोरी,  डबल मिनिग जोकवर ओव्हर अॅक्टिंग करणाऱ्या आंट्या, ब्रेकअप झालंय म्हणून शेंबूड वर ओढत रडणारी पोरं या सगळ्याला एन्जॉय करायला तुम्ही तिकड जातायासा आम्हाला माहित आहे. (आम्ही पण जातोय कधीकधी.)

रोज रात्री टिकटॉकच ट्रॅफिक दणक्यात वाढतंय. ज्यांच्याकडे टिकटॉक नाही ते इन्स्टावर, फेसबुकवर, व्हाटसअॅपवर , युट्युबवर जाऊन जाऊन ते व्हिडिओ बघत बसत्यात आणि अंबानीच्या कृपेच्या डाटाची विल्हेवाट लावत्यात. लईजण लाजून मान्य करत नाहीत.

एकएकजण बाहेर मिशी पिळत्यात आणि हळूच फेक अकाऊंट काढून टिकटॉक करत बस्त्यात. 

पण एक गोष्ट मान्य करायला पाहिजे,  टिकटॉक म्हणजे व्यसन हाय. व्हिडिओ बनवणाऱ्यानां तर ते व्यसन लागतेच पण आपल्यासारखी बघणारी पण एकदा बघायला लागली की एकापाठोपाठ एक बघतच सूटत्यात. मग कधी तुमची आई येऊन कावत्या जाळून टाक त्यो मोबाईल अशा शिव्याशाप देत्या तरी भान राहात नाही.

असच एका माणसाबरोबर झालंय. दुसरा तिसरा कोण नाही तो हाय आपल्या सगळ्यांचा लाडका मार्क झूकरबर्ग

तर झालय अस की तुम्हाला सगळ्यांना माहिती असल्याप्रमाणे गेले काही वर्ष फेसबुकवर म्हाताऱ्यांच प्रस्थ वाढलंय. पेपरमध्ये तोंड खुपसून बसणारी ही मंडळी फेसबुकवर आल्यापासून नाईनटीज किड्सनां अंकल म्हणणाऱ्या स्वतःला मिलेनियम कीडस म्हणवून घेणाऱ्या यंग जनरेशनचं अवघड झालं. आपल्या दहा स्टेप पुढ असलेली ही चौदा पंधरा ते वीस वयोगटातील पोरापोरींनी आपला नवीन अड्डा शोधून काढला.

आपण नाही का याहूवर चॅटग्रुपवर मज्जा करायचो तस ही पिढी  टिकटॉक, इन्स्टावर बवाल करू लागली.

फेसबुकचा व्होल अंड सोल बॉस असणाऱ्या मारक्याला (मार्क झुकरबर्ग ओ) दोनतीन वर्षापूर्वीच जाणवलेलं की कूछ तो गडबड है. त्याने तेव्हाच शोध घेतला. तेव्हा त्याला कळाल की चीनमध्ये एक अॅप हाय तिथ काय तर गडबड सुरु हाय.

खरंतर चीनवाल्यानी फेसबुकला बॅन करून ठेवलंय म्हणून तिथ काय सेटिंग लागत्या का बघायला झुक्या तिकड गेलेला.

(व्हय तसल्या सेटिंग असत्यात वरच्या लेव्हलला.) तिथल्या पुढार्यांनी त्याच्याबरोबर गप्पा मारल्या फोटो काढला आणि वाटाण्याच्या अक्षता लावून परत पाठवलं. त्या दौऱ्यात झुक्याला कळाल की चीनमध्ये एक म्युजीकली नावाचं अॅप लई फेमस झालंय.

आता तुम्हाला तर झुक्याचं धोरण माहीतच आहे. विरोधी पक्षाला संपवायला बघायचं, नाही जमल तर थेट विकत घ्यायचं.

व्हाटसअॅप, इन्स्टाग्राम तसच विकत घेतलेलं नां त्यानं. आता त्याचा डोळा चीनच्या म्युजीकलीवर होता. चाणक्यच्या भाषेत सामदामदंडभेद की काय म्हणत्यात ते तसली आयडिया केली. म्युसिकलीच्या मालकांना अमेरिकेला भेटायला बोलवलं. चाय पे चर्चा केली. पण ती बेनी पण चाणक्यची बाप निघाली. त्यांनी कंपनी विकली पण चीनवाल्या आपल्या भाईबंधूला.

म्युजीकलीचं नाव झालं टिकटॉक !!

इकड आपलं झुक्या चिडल पण हात चोळण्या शिवाय काय पर्याय नव्हता. त्याला वाटलं बर जाऊ दे चीनमध्ये चालेल हे फक्त. पण आज २०१९ उजाडलं तस शिकागो ते शिंगणापूर आणि सिंगापूर ते जयसिंगपूर सगळीकडं टिकटॉकची लाट हाय. दिसेल ती गाबडी आपल असल नसलेलं टॅलेंट टिकटॉकवर बाहेर काढत सुटली आहेत. कोण गाण म्हणताय, कोण डान्स करतय, कोण जोक सांगतंय तर कोण नुसताच चाय पिलो म्हणून बोल्वतंय.

गुगलच्या प्लेस्टोअरवर टिकटॉक हे व्हाटसअॅपच्या खालोखाल डाऊनलोड केलं जाणार अॅप हाय. टिकटॉक ची टाळकी कधी फेसबुकला मागं टाकतील सांगता येत नाही. कधी सांगत नाहीत पण सगळ्या फेसबुकची टिकटॉकमुळं फाटल्या.  

मारक्या झुकरबर्गन भल्याभल्यांना संपवला पण टिकटॉकला संपवण त्याला जमलेलं नाही.

कधी कधी अस होत की आपला शत्रू नेमक काय करालाय याची आपल्याला उत्सुकता असते. किती जरी नाही म्हटल तरी रहावत नाही आपण हळूच तिकड काय चाललाय ते बघायला जातो. तसच झुक्याच्या बाबतीत घडलं. त्यानं टिकटॉकवर @finkd नावाचं एक फेक अकाऊंट काढलं.

आता कितीजरी हुश्शार फेसबुकचा बाप असला तरी झुक्याच झालंय वय. त्यानं बेसिक चूक केली. चुकून आपल ऑफिशियल इन्स्टा अकाऊंट टिकटॉकला लिंक केलं. मग काय त्याच्या मित्रांना फोलोवर्सनां सापडला की गडी. मग बिचाऱ्यानं स्वतःचच नाव अकाऊंटला दिल.

74595287 2429433603941306 679579747394519040 n

आता पण तुम्ही ते अकाऊंट जाऊन बघू शकता. फोटो त्याचाच आहे. जवळपास ४ हजार लोक त्याला फॉलो करतात. त्यो ६९ जणाना फॉलो करतो. पण नावापुढ ब्ल्यू टिक नाही.

पण अकाऊंट त्याच हाय यात शंका नाही. तरी उद्या माझा मोबाईल हॅक झालेला म्हणून बोंबाबोंब करायची चीप आयडिया केला तर माहित नाही.

भिडूनो तुम्ही आपले हाय म्हणून अनुभवाचे नसलेले बोल सांगतो. तर कुठल्याही अॅपवर फेक अकाऊंट काढताय तर काळजी घ्या. आपली अधिकृत अकाऊंट त्याला जोडू देऊ नका. नाही तर जाशीला टिंडरवर आणि सापडशीला बायकोला रंगेहाथ. तेवढी काळजी घ्या. नाही तर झुक्यासारखं गावभर बाजार व्हायचा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.