शेअर मार्केटचा ‘बिग बुल’ आता ७० विमाने खरेदी करून एअरलाइन कंपनी सुरू करणार

प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न असतं की आपण आयुष्यात एकदा तरी हवाई सफर करावी. पण या विमान प्रवासाचा खर्च पाहून अनेकांची स्वप्न ही स्वप्नचं राहतात. त्यात आपल्या देशाच्या एअरलाइन्स कंपन्यांची हालत खिळखिळी होऊन बसलीये. विमान कंपन्या अक्षरश लिलावात निघाल्यात. मात्र, अशा परिस्थितीत सुद्धा एकानं नवीन एअरलाइन कंपनी सुरू करणार असल्याचं म्हटलंय.

ती व्यक्ती म्हणजे भारतीय शेअर मार्केटचे ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे अब्जाधीश राकेश झुनझुनवाला. ज्यांना भारताचा वॉरेन बफे सुद्धा म्हंटल जात. माहितीनुसार झुनझुनवाला लवकरच आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार असून नवीन एअरलाइन कंपनी सुरू करणार असल्याचे समजतयं.

या एअरलाइन कंपनीसाठी ते ७०  एयरक्राफ्ट विकत घेण्याचा प्लॅन आखतायेत.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, झुंनझुंनवला पुढच्या चार वर्षांत तब्बल ७० विमान खरेदी करणार आहे. त्यांची इच्छा आहे की, भारतात जास्तीत जास्त लोकांनी विमान प्रवासाचा आनंद घ्यावा.

दरम्यान झुंनझूनवाला यांना अद्याप इंडियन एव्हिएशन मिनिस्ट्री कडून एनओसी मिळालेली नाही. पण येत्या पंधरा वीस दिवसांत मंत्रालयाकडून त्यांना एनओसी मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राकेश झुनझुनवाला आपल्या नवीन एअरलाइन कंपनीची माहिती देताना म्हटले की, ही एक परवडण्याजोगी एअरलाइन आहे. त्यात सामान्य लोकसुद्धा सहजतेने विमान प्रवास करू शकतील.

या नवीन एअरलाइन कंपनीत ते ३.५ कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहेत. या गुंतवणूकीच्या माध्यमातून ते एअरलाइन्स कंपनीत ४० टक्के हिस्सेदारी घेण्याची शक्यता आहे.

अकासा एयर अँड द टिम असं या कॉस्ट बजेट एयरलाइन कंपनीचं नाव असणार आहे. झुंनझुंनवाला यांनी सांगितलं की, ते अशी विमान खरेदी करण्याच्या विचारात आहे, ज्याच्यात एकाच वेळी 180 प्रवाशांची क्षमता आहे.

झुंझुनवाला यांना बिझनेस आणि मार्केटचा मास्टर म्हंटलं जातं.

कोण कधी शेअर मार्केट गाजवणारे अन कोण तोंडघशी पडणार याचा त्यांना चांगलाच अभ्यास आहे. अनेकजण त्यांना फॉलो करूनच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. म्हणूनच आता जर त्यांनी इंडियन एव्हिएशन फील्डमध्ये पाऊल टाकायचं ठरवलं असेल तर त्यांना यात नक्कीच काही मोठी संधी दिसली असणारं.

दरम्यान, भारतात असे बरेच लोक आहेत जे हवाई प्रवास करण्यास असमर्थ आहेत, कारण त्यासाठी जास्त खर्च येतो. परंतु, जर झुंझुनवाला लोकांना परवडणार्‍या दराने विमान प्रवास करण्याची संधी देत असतील, तर ते सगळं एव्हिएशन मार्केट बदलून टाकतील. याचा थेट फायदा विमान कंपनीलाच होणार आहे.

भारतात भलेही एअरलाइन्स कंपन्यांची मोठी संख्या असेल, परंतु गेल्या काही वर्षांत तोट्यांमुळे कंपन्यांनी आपले हात वर केल्याचे दिसून आलेय. पहिल्यांदा किंगफिशर एअरलाइन्स आणि नंतर एअर इंडियामध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळाली.

त्यानंतर कोरोना साथीच्या काळात एव्हिएशन सेक्टर वरचा बोजा जास्तच वाढला. ज्यातून रिकव्हर होण्यासाठी बराच काळ लागू शकेल.

दरम्यान, झुंनझूनवालाच्या म्हणण्यानुसार त्यांच्याजवळ जगातील सर्वोत्तम विमान कंपन्यांमधील लोक असतील, जे पार्टनर म्हणून त्यांच्याबरोबर असतील.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.