वारणेच्या मातीत विकासगंगा आणणारे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे !
साखर कारखाना सुरू झाला की तात्या पहाटे उठून कारखान्याच्या परिसरात फिरायचे. सोबत एक दोन गार्ड असतं मग रस्त्यावर फिरताना आसपास ऊसाची दांडकी पडलेली असत. ती तात्या उचलत. सोबतचे गार्ड पण ती उचलत आणि मग ते सारं कारखान्याच्या गव्हाणीत आणून टाकलं…